Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

जेव्हा ‘डिजिटल आत्मा’ बंद पडतो.

वैभव शिरखेडकर जुलै 19, 2026 1 minute read
0
gumohor-water
दररोजप्रमाणे तयारी करून राणा प्रताप नगरच्या सिटी बसस्टॉपवर बस ची वाट बघत होतो. तेवढ्यात लक्षात आले की, आपण आपले युपीआय ऍप पेमेंट करता पहिलेच सुरू करून ठेवावे. म्हणजे बसमधे बसल्यावर तिकीट काढायला वेळ लागणार नाही. ते सुरू करता करता एकदम स्मार्टफोन बंद पडला. बसची वाट बघेपर्यंत आणि बसमध्ये बसल्यावर, पुढे ऑफिसला पोहचल्यावर तो सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो चार्ज असून सुद्धा सुरू होत नव्हता. त्यात एक गोष्ट आज चांगली केली होती ती म्हणजे, नेहमीपेक्षा आज जरा जास्त कॅश जवळ बाळगली होती. कारण हे किती आवश्यक आहे याचा अनुभव आज येणार होता. 
पुढे थोड्या वेळाने ऑफिसमधील मुलाने काही ट्रिक चा उपयोग करून फोन सुरू करण्याचा प्रयत्न केला. पण तरी सुद्धा तो सुरू न झाल्यामुळे, आता फोनला फोनच्या डॉक्टरची गरज आहे हे लक्षात आले. तरच आपला हा 'डिजिटल आत्मा' सुरू होऊ शकेल हे लक्षात आले.
धरमपेठ मधील एका ओळखीच्या दुकानात फोन दाखवला तर त्याने सॉफ्टवेअर ची समस्या असेल तर ३०० रुपये लागतील आणि हार्डवेअर ची असेल तर २५०० पर्यंत खर्च येऊ शकतो हे त्याने सांगितले. हार्डवेअर ची समया असल्यास माझ्या ऑफिसमध्ये फोन करून मला कळवूनच ते करा असे सांगितले. पण बरीच वाट बघूनही दुकानदाराचा फोन येत नाही हे बघून मी पुन्हा त्याच्या कडे गेलो असता, हार्डवेअर ची समस्या असू शकते. त्यामुळे खर्च २५०० खर्च लागतो की ४००० की त्यापेक्षा जास्त हे सांगता येणार नाही. त्यामुळे आपण आता फोन वापस घेऊन यावा हा निर्णय घेतला. तो स्वतःसुद्धा फोन कुठेतरी पाठवणार होता त्यामुळे त्याचे स्वतःचे सुद्धा कमिशन त्यात असणार हे निश्चित होते. 
दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी १९ जुलै ला ऑफिसचे एक छोटेसे काम होते. सायकोमेट्रिक टेस्ट चे गुगल फॉर्म समोरच्या क्लायंट ला माझ्या नंबरवरून पाठवायचे असल्याने आणि माझा फोन कधी दुरुस्त होईल हे माहित नसल्याने आता काय करावे हा मोठा प्रश्न होता. आमच्या को – बॉस ने शेवटी त्यांचा दुसरा फोन त्यांच्या ऑफिसच्या नंबर सकट मला दिला, जे त्या ऑफिसच्या कामासाठी वापरतात. 
पुढे जेव्हा त्याच फोनवरून काही लोकांना फोन करून समजले की जरा बर्डी ला जाऊन बघितले तर कमी पैशात फोन दुरुस्त होऊ शकेल. बर्डी ला फोनच्या असेसरीज फार कमी किंमतीत मिळतात हे ठाऊक होते पण पुढे जे झाले ते आश्चर्यकारकच. 
बर्डीला जेव्हा माझ्या भावाने एक दुकान सुचवले ज्याचे नाव त्यालाही माहीत नव्हते, ते शोधता शोधता एका वेगळ्याच दुकानात जाऊन पोहचलो तेव्हा, 'जसे दिसते नसे नसते' चा परिचय आला. 
आजूबाजूला चकाचक आणि विविध प्रकारच्या लाइट्स च्या प्रकाशात उजळत असलेले मोबाईलची अनेक दुकाने आणि त्याच्या मधात कुठेतरी जे सहजरित्या दिसत नव्हते. मात्र जेव्हा लक्ष गेले तेव्हा तिथे जायला निघालो तर त्या दुकानाच्या जुन्या प्रकारच्या लाकडी पायऱ्यांची शिडी चढतांना वेगळीच कसरत करावी लागली हे विशेष. दुकानात पोहचल्यावर आपण कुणाच्या घरी आलो की दुकानात ही कळत नव्हते. कॉर्पोरेट लुक नसलेलं ते मोबाईल रिपेरिंग सेंटर होते. 
सदर दुकानात फोन दाखवून तंत्रज्ञाने (जो स्वतः ऑनर आहे) जेव्हा तो दुरुस्त केला त्यात अशी काही मोठी समस्या नव्हती. फोन अगदी चांगलाच आहे भाऊ फक्त आयसी शॉर्ट झाली आहे. एवढे म्हणून जवळपास अर्ध्या तासात त्याने तो ठीक करून ५०० रुपयांमध्ये काम केले.
कुठे २५०० ते ४००० आणि कुठे ५०० हा विचार सहज मनात येऊन गेला. जेव्हा समस्या सुटत नाही आहे हे लक्षात आले होते तेव्हा म्हटले, अरे रामा जरा मार्ग दाखव रे आता आणि त्याने जो मार्ग दाखवला तो बर्डीमधील मोदी नंबर ३ मधील 'श्रीराम मोबाईल रिपेरिंग सेंटर' चा. 'शेवटी राम ते राम आणि पाचशेत काम' असे झाले. 
या अनुभवावरून शिकायला मिळाले ते हे की, 
➡️ कधी कोणती वेळ कशी येईल आणि आपण त्यात मनाने किती प्रमाणात स्थिर राहू शकतो हे महत्त्वाचे. 
➡️ वेळ प्रतिकूल असो की चांगली नेहमी त्या शक्तीचे स्मरण असावे हे सुद्धा तितकेच महत्वाचे. 
➡️ आणि तेवढेच महत्त्वाचे म्हणजे. डिजिटल पेमेंट च्या या काळात काही कॅश जवळ असू द्यावी हे सुद्धा तितकेच खरे. 

लेखक

  • वैभव शिरखेडकर

    वैभव शिरखेडकर, नागपूर
    नागपूरला खासगी क्षेत्रात नौकरी. विविध विषयांवरचे पुस्तके वाचनाची आणि हिंदी, मराठी कविता लिखाणाची आवड. नागपूर विश्वविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी.

Post navigation

Previous: Live From The Field
Next: Live From The Field
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.