Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

अनंताची हाक

सायली कराडे जुलै 23, 2026 1 minute read
0
cj-dayrit-rcdsvUo-5WY-unsplash.jpg

लहानपणीपासूनच माझी फार जपून राहण्याची वृत्ती आहे, पण आता असं होतंय की ती होती असं म्हणावं की काय असं वाटू लागलंय. मला पडण्याची भीती वाटायची म्हणून मी कित्येक दिवस अगदी घसरगुंडीवरुन घसरायला सुद्धा गेले नाही. सायकल शिकायला भरपूरच वर्ष वाट बघितली. शिकताना पडायचं कटाक्षाने टाळलं. नंतर मात्र जोरदार आपटले. 

पण इतक्यात मात्र बदल जाणवू लागला आहे. गाडी शिकायला मी गाडी हातात आल्यावर फार वेळ लावला नाही. अन् नाईलाजाने ती मला लगेच महामार्गावर चालवावी लागली. इथे एक अशी गोष्ट घडली ज्याने मला स्वतः बद्दल गांभीर्याने विचार करायला लावला. 

महामार्गावरून गाडी चालवताना जेव्हा समोरून अवजड वाहन आलं तेव्हा एका क्षणासाठी मला वाटून गेलं की मी वेगाने जाऊन त्या वाहनावर आदळले तर? अर्थात मी प्रत्यक्षात तसं काही केलं नाही पण तो आलेला विचार मला चमकावून गेला – हे कसले विचार करतेय मी? त्यावेळी तर गाडी अधिकच डावीकडे घेऊन मी सावध होण्याचा प्रयत्न केला. पण घरी आल्यावर त्यावर मंथन सुरू झालं. 

नंतर नंतर असं अधिक वेळेला घडू लागलं. आणि लक्षात आलं हे एकच  उदाहरण नाहीय. कठडे नसलेल्या माडीवर अगदी काठावर उभं राहिल्यानंतर ही असाच विचार आलेला – इथून उडी मारली तर काय होईल? किंवा कोणी मागून येऊन ढकळून दिलं तर काय होईल? अगदी तसंच जमिनीच्या उंचीच्या आणि लोखंडी जाळी नसलेल्या विहीजवळ जातानाही अगदी असंच वाटलेलं – मी उडी मारली तर? किंवा कोणी मागून धक्का दिला तर? किंवा एखाद्या डोंगराच्या, टेकडीच्या टोकावर जाऊन खाली बघून असंच उडी मारवीशी वाटणं. 

तुमच्या सोबत झालंय का असं कधी?

मला आजवर स्वतः बद्दल एका गोष्टीची ठाम खात्री होती व आहे, आणि पुढेही असेल अशी आशा करते की मी प्रचंड घाबरट आहे, त्यामुळे आयुष्य कठीण चाललंय म्हणून ते संपवण्याची हिंमत आणि इच्छा माझ्या ठायी कधीच निर्माण होणार नाही. मी ते वारंवार रडून आणि चिडून मोकळं करणाऱ्यातली आहे. मग असे विचार का यावे?

मग सुरू झाला शोध. सध्याच्या काळात शोधाचं लोकप्रिय माध्यम म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता – अहो म्हणजे ए. आय. तसा तो विशेष काही माहिती देतच असेल असं नाही पण तो एका च धाग्यात वारंवार प्रश्न विचारायची सोय देतो – एवढंच काय ते माझ्या सोयीच. 

मला पडलेल्या शंका कुशंका विचारल्यानंतर एका संकल्पनेची ओळख झाली जिला इंग्रजीमध्ये ‘द कॉल ऑफ वॉइड’ अर्थात पोकळीतील अथवा पोकळीची हाक असं म्हणतात. आपण उगाच थोडं दर्जा वाढवणारं नाव देऊया – अनंताची हाक. यालाच काही जण उंच जागेवरील घटना अर्थात ‘द हाय प्लेस फेनोमेनॉन’ असं देखील म्हणतात. 

मला जितकं हे दुर्मिळ आणि विशेष वाटलं तेवढं ते नाही. जगातल्या अर्ध्या तरी लोकांनी हे अनुभवलं आहे असं संशोधकांचं म्हणणं आहे. आणि वरकरणी आत्महत्येकडे नेणारे वाटू शकतात असे हे विचार खरं तर आपला संरक्षणात्मक पवित्रा वर काढू पाहतात. या विचारांना ‘मिसइंटरप्रिटेड सेफटी सिग्नल’ अर्थात सुरक्षेच्या संदेशबद्दलचा गैरसमज असं ही म्हणता येईल.

अर्थात ज्याला कोणाला असं वाटत असेल त्याने ते एखादे वेळी वाटतंय का नेहमी नेहमी? त्यावर तुम्ही प्रत्यक्ष समोर जाता किंवा जायची इच्छा उद्भवते की नैसर्गिकरीत्या धोक्यापासून मागे येता? या गोष्टी महत्वाच्या ठरतात. भीती ही माणसाला मिळालेली अशी देणगी आहे जी त्याला अधिककाळापर्यंत जीवंत अन् सुरक्षित ठेवते. जखमा होण्यापासून वाचवते. 

मी जरी इथे म्हटलं की हे बऱ्याच लोकांबद्दल घडतं तरीही आपण आपले आत्मनिरीक्षण करणं अन् त्यानुसार योग्य दिशेने, योग्य निर्णय घेतलेलं चांगलं. 

#सुरपाखरू #३०दिवसात३० #प्रयोग२०२६

cj-dayrit-rcdsvUo-5WY-unsplash.jpg

लेखक

  • सायली कराडे
    सायली कराडे

Post navigation

Previous: कुटुंबात होणारे बदल
Next: Live From The Field
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.