Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

पेशन्स

ऐश्वर्या डगांवकर जुलै 24, 2026 1 minute read
0
gumohor-water
        पेशन्स 
   पेंशनर लोकांचा ' पेशन्स ' नावाचा पत्त्याचा डाव मांडणे हा एकच आवडता खेळ असतो कारण  तेवढाच विरंगुळा जीवाला ! एकदा तो डाव मांडताना हळूच माझी नात माझ्याजवळ येऊन बसली आणि मला डाव मांडण्यात मदत करू लागली. प्रत्येक वेळी वेगळं घर करतांना राजा हवाच. ते पाहून तिने मला ' राजा ' च का ?असा प्रश्न विचारला .मग मी तिला म्हटलं, ” अगं हा खेळण्याचा नियमच आहे .” त्यावर तिने पटकन म्हटलं , ” कोणी बनवले नियम मला नाही आवडलं राणी का नाही बनवू शकत आपलं घर?मी मोठी होऊन माझं घर बनवणार .”असं म्हणून ती रागाने निघून गेली.                                             नकळतच किती कटु सत्य ती बोलून गेली!  मी मात्र विचारात पडले खरच की अगदी लहानपणापासून मुलींना हे बाळकडू कोण पाजतं? हे तुझ घर नाही.एक दिवशी तुला सासरी जायचं आहे ते तुझं घर असणार.पण खरंच तसं होतं का?सासरी गेल्यावर पण तिला सतत पडती बाजू घ्यावीच लागते. लागते.सर्वांना गरम जेवण बनवून वाढताना तिच्या ताटात कधीतरी गरम पोळी पडते का ? मनासारखं जगता येतं का ?असे अनेक प्रश्न निर्माण झाले.आपली समाजव्यवस्था अजूनही पुरूष प्रधान आहे भले दूरदर्शनवर कितीही स्त्रीप्रधान मालिका दाखवू दे!
   एक साधा विचार मांडते ' महिला दिन ' अगदी थाटामाटात साजरा होतो.आजकाल पुरुष पुढाकार घेऊन तो साजरा करतात.पण त्यामागे त्यांचा अहं असतोच .एका महिला दिनाच्या कार्यक्रमात मला बोलण्यासाठी बोलावले मी कटु सत्य बोलले.ते तिथे उपस्थित असलेल्या पुरूषांना पचायला जड गेले.माझ्यानंतर एक महिला बोलायला उठल्या त्यांना तेथील पुरूष मंडळींनी हळूच त्या महिलेला पुरुषांच्या विरोधात बोलू नका असं सुचवले .मी रागानेच त्यांना म्हटले ,” म्हणजे एक दिवस पण स्त्रियांना बोलण्याचे स्वातंत्र्य नाही का मग तुम्ही  काय तिला स्वातंत्र्य देणार?”  यावर ते गृहस्थ खजील झाले ” मला खंत या गोष्टीची वाटते की महिला देखील हे ऐकून घेतात. त्यांना हे कळतच नाही की एक दिवस महिला दिवस साजरा करण्यात अर्थ नाही.तो काही पोळा आहे का? की एक दिवस बैलाला सजवून चांगला पुरणावरणाचा नैवेद्य दाखवला जातो आणि बाकी दिवशी त्याला घाण्याला जुंपण्यात येतं.पुरुष दिवस नाही साजरा होत कारण सर्व दिवस त्यांचेच असतात.एक दिवस महिलांना आराम देण्यातच ते स्वतःचा मोठेपणा सिद्ध करत असतात.
      साध्या पत्यांच्या डावात देखील राजाला वेगळं घर बनवण्याची मोकळीक आहे पण राणीला नाही .मग स्वातंत्र्य दूरची गोष्ट.खूप पूर्वी एक गोष्ट वाचली होती.एका राणीला घरात बसून जगण्याचा खूप कंटाळा आला होता.तिने राजा जवळ हट्ट केला की तिलाही घराबाहेर पडायचं आहे.मोकळा श्वास भरभरून घ्यायचा आहे.राजानं तिला शिकण्याची संधी दिली.हळुहळू राणी घराबाहेर पडू लागली.शिक्षणाने तिच्या विचारांना पंख फुटले.ती नोकरी करू लागली.घरातल्या जबाबदा-या सांभाळून नोकरीसाठी बाहेर जाऊ लागली आणि इथेच ती फसली.कारण तिच्या बाहेर जाण्याचा सर्वात जास्त फायदा राजालाच पण झाला.तो हळूहळू सुखवस्तू झाला.त्याने स्वतःच्या खांद्यावर असलेली सर्व जबाबदारी राणीच्या खांद्यावर टाकली आणि तो मुक्त झाला.राणीला हे लक्षात येईपर्यंत खूप उशीर झाला.नंतर घरीदारी सर्व ठिकाणी तिला गृहित धरू लागले. राणीच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे आली संसाराबरोबर मुलांच्या शिक्षणाची आणि नोकरीची जबाबदारी पण तिनेच सांभाळावी आणि राजा मात्र खुशालचेंडू सारखा जगू लागला.राणीच्या वाट्याला फक्त कष्ट आले!
          

लेखक

  • ऐश्वर्या डगांवकर

    पूर्वाश्रमी-वर्षाराणी दाणे
    शिक्षण-- शालेय आणि महाविद्यालयीन -धुळे
    बी. ए. ऑनर्स इंग्रजी विषयात
    पूना युनिव्हर्सिटी महाराष्ट्र.
    व्यवसाय --लेखिका /कवयित्री --मराठी हिंदी गृहिणी,कथाकथन,रसग्रहण
    भ्रमणध्वनी -९३२९७३६६७५

Post navigation

Previous: Live From The Field
Next: कोटकायन भाग – ०४
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.