आपल्या आयुष्यात पहिली गुरू ही नेहमी एक स्त्रीच असते. जन्मा ला आलो तेव्हा पासून कशे खायचे आणि उभे राहणे शिकविणारी आई. आयुष्यातील सर्वात मोठी गुरू असते. अ, आ असो वा A B C D असो पहिले अक्षर तीच गिरवितें आपल्या हातानी.
शाळेला जातांना वह्या पुस्तके दप्तरात कसे आवरून भरायचे कित्ते तिनेच गिरवून घेतले. आपला अभ्यास कसा वेळेत करावा याचे नियोजन सुध्दा तीच आखून घेते. यात मोठे भाऊ, बहीण मदत करतात पण आई कशी सांगेल तसेच करतो पण.
मोठा झालो बाहेर कसे राहायचे याचे धडे सुद्धा तिच्या कळत न कळत आपण शिकतो. शाळेत जाऊ लागलो तिथे सुद्धा स्त्री शिक्षिका आपणास जास्त आवडत असते आणि आपण त्यांनाच अनुकरणीय मानतो.
थोडक्यात काय आयुष्याच्या प्रत्येक पाडावावर एक कोणी न कोणी स्त्री आपल्याला काही ना काही शिकविते.
आणि महत्वाचे बायको ही सुद्धा एक गुरू आहेच भलेही भांडण कसे करावे हे सुद्धा त्यांच्या कडून शिकावे. आणि निस्सिम प्रेम करण्याच्या वेगवेगळ्या तऱ्हा त्यांच्या कडूनच शिकावे.
थोडक्यात आयुष्यात स्त्री ही खूप महत्त्वाची गुरू असते.
#सुरपाखरू #३०दिवसात३० #जुलै२०२६