Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • अवर्गिकृत

नव्या आशयघन लिहिणाऱ्या कवींची माहिती कशी मिळवायची?

तुषार जोशी जुलै 30, 2025

फेसबुकवर कविता लिहिणारे मुबलक आहेत.  त्यातले काही आपल्याला आवडून जातात, त्यांची कविता आपल्या रसिकतेसाठी आशयघन असते असे म्हणुया.  असे आशयघन कवी आपल्याला योगायोगाने जितके वाचायला मिळतात त्याहून त्यांची संख्या कितीतरी अधिक असणार, पण ते आपल्या वाचनात आले नाहीत याच एका कारणाने आपण त्यांच्या कवितांपासून वंचित असतो.

वर्तमान पत्रांमधे पुरवण्यांमधे कवींची ओळख देणारे लेख छापून येतात तेव्हा नवीन कवींची ओळख मिळते.  अनुभव असा आहे की वर्तमान पत्रात ओळख लिहून येते त्या कवींची एकतर पुस्तके प्रकाशित असतात किंवा ते आधीच कविता सम्मेलनांमधे शामिल होत असल्याने त्यांच्या भागात लोकप्रिय असतात.  आंतरजालावर लिहिणारे, ज्यांचे अजून संग्रह छापून आलेले नाहीत असे पण आशयघन लिहिणारे कवी यांचा नंबर यायला तिथे वेळ लागू शकतो.

मराठी कवितांचे फेसबुकवर अनेक गट आहेत, तिथे ज्या ज्या कविता पोस्ट होतात त्यातून काही नवीन कवींची माहिती मिळते पण त्यातही सगळेच कवी कविता गटांमधे कविता पोस्ट करत नाहीत काही आपल्या भिंतीवरच पोस्ट करतात आणि त्यांचा एक छोटा वाचक परिवार असतो. 

यावर उपाय काय याचा विचार मनात सुरू असताना, मला काही लेख वाचायला मिळाले जिथे कवींनी नव्या कवींच्या कवितांवर रसग्रहणात्मक आस्वादात्मक लिहिले होते.  अश्या लेखांमधून नव्या कवींची ओळख होते आणि मग त्यांच्या कविता वाचायला घेता येतात.  असे आवडलेल्या कवींच्या कवितांवर लिहिणारे कवी आणि रसिक फेसबुकावरच आहेत पण त्यांचे लेख प्रत्येकालाच वाचायला मिळतील असे नाही, मग असे लेख एकाच पानावर प्रकाशित करता येतील का यावर विचार सुरू केला.

ऑगस्ट २०१६ मधे फेसबुकवर कवितांमुळेच ओळख झालेल्या काही कवी आणि रसिकांना मी जेव्हा अश्या एका आस्वादपर लेख असणाऱ्या पानाची कल्पना सांगितली तेव्हा त्यांची ती सहर्ष उचलून धरली.  अश्या पानावर आंतरजालावर मुक्तपणे कविता पोस्ट करणाऱ्या कवींची आस्वादपर माहिती आणि ओळख देणारे लेख पोस्ट केले तर त्या लेखकांना वर्तमान पत्रांमधून मिळते तसेच मानधन पण मिळावे अशी माझी इच्छा होती. 

मानधनाची कल्पना कळल्यावर मला आंतरजालावरच कवितांच्या माध्यमाने ओळख झालेल्या अनेक कवी मित्रांची आणि रसिक वाचकांची आर्थिक मदत मिळाली आणि एक निधी उभारला गेला. त्या पानाचे नाव ठरले ‘काव्यास्वाद’.  या पानाच्या प्रकल्पाचे नाव मी ठेवले ‘काव्यास्वाद अभ्यासवृत्ती प्रकल्प’.

कुसुमाग्रज प्रतिष्ठान वर्षाला एका लेखकाला संशोधन करून कादंबरी लिहिण्यासाठी अभ्यासवृत्ती देते. त्याच अंतर्गत मुरली खैरनार यांनी शोध ही कादंबर लिहिलेली आणि ती लोकप्रिय ठरली हे मी अनुभवले आहे. त्या अभ्यासवृत्ती मुळे त्यांना प्रेरणा मिळाली पण शेवटी ती कादंबरी ही त्याच्याच नावे जमा झाली, त्यांचीच राहील. माझी कल्पना ही कवितांवर छापून येणा-या अनुभव कथन आस्वादपर लेखांसाठी अशीच अभ्यासवृत्ती उपलब्ध करून देण्याची आहे. त्यासाठी समाजात लेखक असतील ज्यांना या प्रेरणेची गरज आहे आणि प्रायोजकही असतील ज्याच्या जवळ देवदयेने देण्यासाठी प्रेम आणि साधने आहेत. आणि ज्यांचे कवितांवर अतोनात प्रेम आहे. मी अश्या दोन डेस्परेट parties यांना एकत्र आणणारा पूल बनायचा प्रयत्न केला.

अनेक कवी आशयघन लिहिताहेत. त्यांना अधिक लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. त्यांच्या कवितांची गंभीरतेने दखल घेऊन त्यांना काय चांगले साधले आहे हे सांगणारे लेख लिहिले जाणे आवश्यक आहे. ही अभ्यासवृत्ती सुरु करणे हे माझे असे साहित्य लिहिल्या जाण्याकडे एक पाउल होते.

आतापर्यंत या प्रकल्पात नऊ प्रायोजक बारा लेखक जोडले गेले आहेत आणि एकविस कवींवर आस्वादपर लेख प्रकाशित करायची मला संधी मिळाली.  त्या सर्व जोडल्या गेलेल्या आस्वादकांचे आणि प्रायोजकांचे कवितांवरचे प्रेम मला या प्रकल्पास सुरू ठेवण्याची प्ररणा देते.

फेसबुक वर ‘काव्यास्वाद’ पानास तुम्ही भेट दिली नसेल तर नक्की एकदा भेट द्या.  तिथल्या आस्वादपर लेखांवर अभिप्राय द्या ते शेयर करा आणि कवितांचे तुमचे प्रेम व्यक्त करा असे तुम्हाला आग्रहाचे निमंत्रण आहे.

मधल्या काही वर्षांमधे कामाच्या व्यापात मी या प्रकल्पाचा हवा तसा पाठपुरावा करू शकलो नाही पण या वर्षी पुन्हा नवीन लेखक शोधणे आणि अजून बरेच कवींची माहिती आणि ओळख वाचकांना करून देणे हा संकल्प धरला आहे.

तुम्ही कवितांवर आस्वादपर नवा लेख लिहिणार असाल तर मला संपर्क करू शकता माझ्याजवळ सध्या पुढच्या दहा लेखांचे मानधन तयार आहे जे लेखकांची वाट बघते आहे.  फक्त आपली ओळख नसेल तर मी आधी तुमचे काही लेख वाचून मग तुम्हास कळवेन. 

तुमच्याजवळ आधीच लिहिलेले लेख असतील तर ते मला या पानावर पुन्हा पोस्ट करायला सहर्ष आवडेल. त्यातून तुम्ही निवडलेल्या कवींची अनेकांना नवीन वाचकांना ओळख मिळेल.  सगळे लेख तुमच्याच नावाने या पानावर प्रकाशित होतील.

या पानावरच्या लेखांचे सर्व हक्क त्या लेखकांचेच राहतील फक्त कधी या पानावरील लेखांचा एक संग्रह प्रकाशित करायची संधी मिळाली तर तुमचे लेख तुमच्या नावाने त्या संग्रहात मी शामिल करणार यासाठी तुमची इथे लेख देताना परवानगी आहे असे मी गृहित धरेन.  तसे काही कारणाने तुमच्या लेखासाठी शक्य नसेल तर तेवढ्यापुरते त्या लेखासाठी आपण नोंद ठेऊ शकतो.

आमचे प्रकाशक मित्र संजय शिंदे यांनी मागच्याच वर्षी या लेखांचा संग्रह छापून आणण्याची तयारी दाखवली आहे, मलाच अजून तो संग्रह पुढे नेता आलेला नाही तो पण या नवीन वर्षात नियोजन करून छापून आणण्याची इच्छा आहे.

लेखकांसाठी:

तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या कवींची ओळख देणारा किमान दहा ते २० कवितांचा उल्लेख आणि काही ओळी दाखवून आस्वादपर लेख लिहिणार असाल तर त्या लेखाला या पानावर मला प्रकाशित करायला आवडेल.  ज्या कवी बद्दल लिहिलेले असेल त्यांच्या कविता ब्लाग किंवा इतर ऑनलाईन संकेत स्थळांवर उपलब्ध असाव्या.  कवितासंग्रह प्रकाशित असण्याची आवश्यकता नाही पण त्यांच्या कविता सहज वाचायला उपलब्ध असणे आवश्यक आहे कारण त्यांची ओळख झाल्यावर साहजिकच वाचकांना त्यांच्या कविता वाचायची उत्सुकता वाढेल. 

अश्या लेखाची किमान शब्द मर्यादा १००० शब्दांची असावी असा लेख पोस्ट केल्यावर त्याचे हजार रूपये मानधन सध्या मला देता येते आहे.

कवी असाल तर:

तुमच्या विसेक निवडक कविता मला पाठवल्या तर मी आस्वादकांना त्यावर लेख लिहिण्याची विचारणा करू शकेन आणि कुणी तसा लेख लिहायला तयार झाले तर तो लेख प्रकाशित होईल. त्या लेखाबरोबर तुमच्या फेसबुक प्रोफाईल किंवा ब्लाग ची लिंक असेल.

काव्यास्वाद पान – https://www.facebook.com/kaavyaaswaad/

(काव्यास्वादक)

तुषार

तुषार जोशी, नागपूर
नागपूर, गुरूवार १ मे २०२५

About the Author

तुषार जोशी

Editor

Visit Website View All Posts

Continue Reading

Next: आंतरजालावर कुणीतरी चुकते आहे, त्यांना इंगा दाखवून येतो
चर्चेत सामिल व्हा

संबंधित लेख

kachchaalimbu
  • अवर्गिकृत

कच्चा लिंबू

अपर्णा शेंबेकर ऑगस्ट 4, 2025
bhagwan-nile-cover
  • अवर्गिकृत

सांगायलाच हवंय असं नाही…पण वाचायला मात्र हवाच

यामिनी दळवी ऑगस्ट 4, 2025
देवपूजा
  • अवर्गिकृत

देवपूजा

चंचल काळे ऑगस्ट 4, 2025

ताजे लेख

  • कच्चा लिंबू
  • सांगायलाच हवंय असं नाही…पण वाचायला मात्र हवाच
  • देवपूजा
  • उमटती ज्ञानाची पाऊले….
  • स्त्रीचं मानसिक आरोग्य – भाग १

जुने लेख

  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • अवर्गिकृत

हे वाचून बघा

kachchaalimbu
  • अवर्गिकृत

कच्चा लिंबू

अपर्णा शेंबेकर ऑगस्ट 4, 2025
bhagwan-nile-cover
  • अवर्गिकृत

सांगायलाच हवंय असं नाही…पण वाचायला मात्र हवाच

यामिनी दळवी ऑगस्ट 4, 2025
देवपूजा
  • अवर्गिकृत

देवपूजा

चंचल काळे ऑगस्ट 4, 2025
Art by Amit Borkhade
  • अवर्गिकृत

उमटती ज्ञानाची पाऊले….

अपर्णा शेंबेकर ऑगस्ट 4, 2025
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.