आपल्या समाजाचे डोके ठिकाणावर आहे का ?
“ सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? “ हा ऐतिहासिक आणि जळजळीत अग्रलेख लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी ६ जुलै १८९७ रोजी त्यांच्या 'केसरी' या वृत्तपत्रात लिहिला होता. ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीविरोधात आणि अन्यायाविरोधात What is_this प्रश्न विचारणारा, हा एक अत्यंत प्रसिद्ध व परखड अग्रलेख होता. परंतु आजकाल आपल्या समाजात घडत असलेल्या अनेक घटना पाहता , आता आपल्याच ह्या समाजाचे डोके ठिकाणावर आहे काय, हा प्रश्न मला पडलेला आहे . ह्या सर्व घटना जुन्या नसून जुन, जुलै वा ऑगस्ट २०२६ ह्या कालखंडातील आहेत, आणि आपला हा समाज कोणत्या दिशेने वाटचाल करीत आहे , ह्याची पुरेपूर जाणीव करून देणाऱ्या आहेत.
घटना एक : ठाणे येथील १९ वर्षाच्या एका युवकाने नागपुर येथील १६ वर्षाच्या मुलीशी इंस्टाग्राम वर मैत्री करून नागपूर मधील दिघोरी येथे भाड्याने घेतलेल्या एका घरात केलेल्या विचित्र कृत्याने पोलिस अधिकारी सुद्धा अवाक झाले, अशी घटना माझ्या उभ्या आयुष्यात अन्य कोणत्याही ठिकाणी घडलेली मला माहिती नाही . त्या युवकाच्या ठाणे येथील घरात धारदार चाकू आणि वेगवेगळ्या गर्भ निरोधक आणि संतती नियमक औषधांचा मोठा साठा पोलिसांना आढळून आला होता
घटना दोन : नागपूर येथील एका ४१ वर्षीय विवाहित व्यक्तीने आपल्या पत्नीला आणि मुलांना , आता तुम्ही आपली काळजी घ्यावी , असे निरोपाचे सांगून , स्वतः एका २६ वर्षीय युवतीला लग्नासाठी नागपूरच्या समर्थनगर वस्तीतील एका हॉटेल मध्ये बोलावले . तिच्यासाठी दोन साड्या, दागिन्यांचा डब्बा आणि पलंगावर फुलांची सजावट असे दृश्य त्या हॉटेल मधील खोलीत निर्माण केले. त्याच खोलीत दागिन्याच्या डब्ब्यात प्रत्यक्षात लपवून आणलेल्या चाकूने , फुलाने सजावट केलेल्या त्याच पलंगावर , तिचा गळा कापुन जीव घेतला आणि नंतर स्वत आत्महत्येचा असफल प्रयत्न केला . असा निर्घृण प्रकार कधी कोठे झाला असेल, अशी कल्पना सुद्धा करवत नाही.
घटना तीन : नागपूर मधील १६ वर्षीय तीन मुलांनी आपल्या एका मित्राच्या वाढदिवसाला जात आहे , असे सांगून एकाने आपल्या वडिलांची नवीन कार घेतली. वाढदिवसाच्या पार्टीला अजुन वेळ आहे म्हणून , तिघे मित्र लाँग ड्राईव्ह साठी निघाले आणि सकाळी ५:३० वाजता रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकवर आदळून अपघात केला. त्यात दोघांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला आणि तिसरा गंभीर जखमी. मुलगा अल्पवयीन असल्यामुळे आई वडील तुरुंगात, १६ वर्षीय मुलाचे निधन आणि नवीन गाडी चक्काचूर असे सर्व , काही क्षणात घडले .
घटना चार : पुण्यातील एकमेकांची ओळख असलेल्या दोन सधन कुटुंबात मुलामुलीचे लग्न ठरले आणि २६ वर्षीय त्या मुलीने तिच्या २२ वर्षीय प्रियकराच्या मदतीने लोहगड वरून मुलाला ढकलून देऊन त्या उच्चविद्याविभूषित आणि श्रीमंत असलेल्या एकुलत्या एक २८ वर्षीय मुलाचा नाहक जीव घेतला . कोणत्याही प्रकारे विचार केला तरीही, हे असे कसे होऊ शकते, ह्याचा विचार करवत नाही.
अश्या घटना आजकाल समाजात सतत घडत असतात, असे सर्वांच्याच निदर्शनात येत असेल, म्हणून मला हा प्रश्न पडला आहे . त्याची कारणमीमांसा करण्याची नितांत आवश्यकता मला वाटते. आपल्या समाजात आपली कुटुंबव्यवस्था, त्यातील संस्कारक्षमता, आपली नीतीमूल्ये आपणच विसरलो आहोत का, हा गंभीर प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. माझ्या मते मोबाईल आणि सोशल मीडियावर दिवसरात्र चिपकून राहण्याची सवय आता सर्वच वयाच्या लोकांना लागलेली आहे, आणि नकोशी तसेच बीभत्स असलेली ही माहिती ( ओवरडोज ) जास्त मात्रेत सर्व वयोमानातील लोकांना मिळत असल्यामुळे आपले सर्वांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे. सामाजिक मर्यादांचे भान हरपल्या सारखा आपला समाज आता भावनाशून्य तसेच असंवेदनशील वागतांना दिसतो आहे. जंतरमंतरवर घडलेल्या आंदोलनाच्या पाश्वभूमीवर ह्या प्रश्नांचे भयावह गांभीर्य समाजाने समजून घ्यावे, अन्यथा आपल्या ह्या असंवेदनशील समाजाचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी परत एकदा लोकमान्य टिळकांना ह्या भूमीवर अवतिर्ण व्हावे लागेल , असे मला वाटते.
शिक्षक दिनाच्या अनेकविध शुभेच्छासह आजचा साप्ताहिकी लेख सादर 🙏🙏🙏🙏