Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

सर्जनशीलतेचे मोजमाप आणि हिंगाचा खडा

तुषार जोशी जानेवारी 3, 2026 1 minute read
0
hing.png
आम्ही जेव्हा डिजिटल जगासाठी नवीन माणसांच्या मुलाखती घेतो, तेव्हा पहिल्या दहा मिनिटांतच एक गोष्ट स्पष्ट होते– समोरची व्यक्ती आपल्याला हव्या त्या पदासाठी योग्य आहे की नाही? हे ठरवण्यासाठी एक साधे ‘लिटमस टेस्ट’ सारखे तंत्र असते. उदाहरणार्थ, एखाद्या स्वयंपाक्याच्या कामासाठी आलेल्या उमेदवाराला जर विचारले, “गुलाबजामच्या पाकात हिंग किती घालायचे?” आणि त्याने त्याचे गंभीरपणे उत्तर द्यायचा प्रयत्न केला, तर तिथेच कळते की इथे डाळ शिजणार नाही! कारण पाकात हिंग टाकायचेच नसते, हे मूलभूत ज्ञान त्याला नाही, हे तिथेच सिद्ध होते. मग पुढचा वेळ वाया घालवण्यात अर्थ नसतो.
.
मात्र, जे उमेदवार असे मूलभूत प्रश्न लीलया पार करतात, त्यांचीच खरी मुलाखत पुढे तास-दीड तास रंगते. कोणत्याही विषयात आपली गती किती आहे, हे तपासण्यासाठी असे काही प्रश्ण किंवा मूलभूत खुणा असतात.
.
नेमका हाच निकष साहित्यालाही लावता येतो. एका अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून एका कवयित्रीने आपल्या गझलेचे सादरीकरण करण्यापूर्वी अतिशय अभिमानाने सांगितले, “मला ही गझल लिहायला पाच दिवस लागले!”
.
हे वाक्य कानावर पडताच, एका जाणकार रसिकासाठी तिथेच ‘पाकातल्या हिंगासारखा’ प्रकार घडला. एखादी भिंत रंगवायला अमुक तास लागले किंवा डेटा एन्ट्री करायला अमुक दिवस लागले, तसे हे कष्टाचे गणित झाले. पण सर्जनशीलता, प्रतिभा आणि त्याला लागणारा वेळ यांचे असे साचेबद्ध गणित नसते. एखाद्या रचनेसाठी पाच दिवस लागले, याचा अर्थ ती रचना श्रेष्ठ ठरत नाही. उलट, “मी किती कष्ट केलेत” हे सांगावे लागणे, यातच त्या कृतीचा कमकुवतपणा दिसतो. कारण कविता किंवा गझल ही मजुरीने मोजायची गोष्ट नाही, तो एक अनुभव आहे.
.
पुढे सादरीकरण झाल्यावर संशय बळावला आणि दुर्दैवाने तो खरा ठरला. ती गझल म्हणजे काही वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या एका व्हिडिओतील शब्दांची उचलेगिरी करून केलेली मोडतोड होती. त्या रचनेतील मूळ शब्द आणि लय यामुळे अजाण प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या, पण जाणकारांना त्यातील उसनेपण खटकलेच. लवकरच त्या रचनेचे बिंग फुटले.
.
पण, त्या कवयित्रीचे ते वाक्य– “मला ही गझल लिहायला पाच दिवस लागले” – माझ्यासाठी मात्र एक धडा बनून राहिले.
.
जेव्हा जेव्हा मी नवीन काही शिकतो किंवा एखादा विषय मांडतो, तेव्हा मी स्वतःलाच प्रश्न विचारतो– मी विषयाच्या गाभ्याला स्पर्श करतोय, की केवळ कष्टाचे प्रदर्शन मांडतोय? माझ्या तपास यादीत हे वाक्य आता एका ‘चेक-पॉईंट’सारखे झाले आहे. कोणत्याही विषयात आपण ‘गुलाबजामच्या पाकात हिंग किती’ शोधणाऱ्या स्तरावर तर नाही ना, याचे भान ठेवायला मला या वाक्याची खूप मदत होते.
.
तुषार जोशी
नागपूर, शुक्रवार, २ जानेवारी २०२६

लेखक

  • तुषार जोशी
    तुषार जोशी

    तुषार जोशी पर्सिस्टंस्ट सिस्टिम्स कंपनीमधे चीफ आर्किटेक्ट पदावर कार्यरत आहेत.  ते मराठी कविता आणि ललित लेख लिखाण करतात.

Post navigation

Previous: गुन्हेगार, राजकारण आणि सुन्न करणारी वास्तविकता: ‘ब्लॅक वॉरंट’चा रिव्ह्यू
Next: दक्षिण भारतवारी: रामसेतू, मरुत्वमलाई आणि एक काळरात्र
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

gumohor-water
  • ललित

आत्मबल – कवि वि.दा.सावरकर

ऐश्वर्या डगांवकर मे 28, 2026 0
gumohor-water
  • ललित

साप्ताहिक लेखन

ऐश्वर्या डगांवकर मे 21, 2026 0
WhatsApp-Image-2026-05-18-at-5.38.42-PM.jpeg
  • ललित

माणूस बदलतो की फक्त त्याचे मुखवटे बदलतात?

वर्षा पतके थोटे मे 18, 2026 0

ताजे लेख

  • आत्मबल – कवि वि.दा.सावरकर
  • साप्ताहिक लेखन
  • माणूस बदलतो की फक्त त्याचे मुखवटे बदलतात?
  • खिडकीतले आकाश
  • श्रावणबाळ!

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

gumohor-water
  • ललित

आत्मबल – कवि वि.दा.सावरकर

ऐश्वर्या डगांवकर मे 28, 2026 0
gumohor-water
  • ललित

साप्ताहिक लेखन

ऐश्वर्या डगांवकर मे 21, 2026 0
WhatsApp-Image-2026-05-18-at-5.38.42-PM.jpeg
  • ललित

माणूस बदलतो की फक्त त्याचे मुखवटे बदलतात?

वर्षा पतके थोटे मे 18, 2026 0
gumohor-water
  • ललित

खिडकीतले आकाश

ऐश्वर्या डगांवकर मे 14, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.