Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

दक्षिण दिग्विजय : ४ कन्याकुमारी – सूर्योदय

राम किन्हीकर जानेवारी 23, 2026
DSC00173.JPG
२ डिसेंबर २००८
 
पहाटे ४ : ३० ला म्हणजे नियोजित वेळेआधी तब्बल १ तास आम्ही कन्याकुमारीजवळील नागरकोईल नावाच्या स्टेशनवर सहकुटुंब उतरलो. नियोजन केल्याप्रमाणे रेल्वेच्या प्रथम वर्गात निवांत झोप झालेली होती आणि पॅसेंजर गाडीचा प्रथम वर्ग असल्याने खिशाला भुर्दंड पण फ़ारसा बसलेला नव्हता. अनोळखी प्रदेश, अनोळखी गाव. हिवाळा ऋतू त्यामुळे सूर्यदर्शन अंमळ उशीरा होणार त्यामुळे इथून आता कन्याकुमारी कसे गाठायचे ? हा एक प्रश्न होता.
 
आम्हाला इथपर्यंत आणणारी गाडी आता दिशा बदलून क्विलोन च्या दिशेने रवाना झालेली होती. आमच्यासोबत ७ वर्षाची आमची लेक आता पेंगुळत होती. मी स्टेशनच्या बाहेर गेलो आणि एक भला टॅक्सीवाला मला भेटला. त्याने नागरकोईल स्टेशन ते कन्याकुमारी आम्हाला नेण्याचे कबूल केले. भाडेही अगदी वाजवी घेत होता. आम्ही त्याच्या टॅक्सीने जाण्याचा निर्णय घेतला.
 
पहाटेच्या सुखद गारव्यात आमची टॅक्सी नागरकोईल ते कन्याकुमारी हा प्रवास करायला लागलोत. मस्त आणि प्रशस्त ॲंबेसेडर टॅक्सी होती. या गाडीत फ़ार बालपणी आम्ही आमच्या आजोळी भरपूर प्रवास केलेला होता पण जाणते झाल्यावर आणि गाड्यांमधली लेगरूम, हेडरूम, सस्पेन्शन्स या संज्ञा कळायला लागल्यानंतरचा हा पहिलाच प्रवास. अगदी राजेशाही थाटाने प्रवास करतोय हे जाणवत होते.
 
डिसेंबर महिना असूनही हा परिसर समुद्राला जवळ असल्याने गारठा नव्हता. सुखद, गुलाबी थंडी मात्र होती. साधारण अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर आम्ही कन्याकुमारी शहरात दाखल झालो. गाडीनेच आम्ही थोडी हॉटेल्स शोधलीत आणि त्यातल्याच एका ठिकाणी ठिय्या ठोकण्याचा निर्णय घेतला. त्या टॅक्सीवाल्यालाच दिवसभरच्या कन्याकुमारी दर्शनसाठी विचारले तो सुद्धा अगदी रास्त भावात आम्हाला कन्याकुमारी दाखविण्यासाठी तयार झाला.
 
हॉटेलमध्ये जाऊन थोडी विश्रांती घेतली. आमचे कन्यारत्न तर पेंगुळले होतेच पण आम्ही दोघांनीही आमच्या हॉटेलरूमच्या समुद्राकडल्या खिडकीतून त्या दिवशीचा सूर्योदय बघितला. अगदी मंत्रमुग्ध होऊन आम्ही दोघेही ते दृश्य बघत होतो. “डोळ्यांचे पारणे फ़िटणे” या वाक्प्रचाराची अनुभूती येण्याचा तो क्षण. कॅमे-यानेही तो क्षण टिपला पण डोळ्यांनी जे बघितले त्याची अनुभूती कॅमे-याला कशी येणार ? काही मिनीटे निःशब्द होऊन, हातात हात गुंफ़ून आम्ही तो क्षण बघत होतो. आज आमच्या लग्नाचा ८ वा वाढदिवस होता. तो दिवस अशा एका अदभूत क्षणाने सुरू होऊन साजरा होणार होता याची कल्पना आम्हा दोघांनाही नव्हती.
 
– स्वपत्नीत, तिच्या आनंदात, तिच्या सुखदुःखात फ़ार म्हणजे फ़ारच गुंतलेला वैभवीरमणा गोविंदा,
प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर
 
२२ जानेवारी २०२६
 

लेखक

  • राम किन्हीकर
    राम किन्हीकर

Tags: सुरपाखरू ३०दिवसात३० प्रयोग२०२६

Continue Reading

Previous: का आरशास..उगा मी टाळतो!!
Next: दक्षिण दिग्विजय : ५ सुचिंद्रम आणि मेणपुतळ्यांचे संग्रहालय
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

WhatsApp-Image-2026-02-28-at-17.59.33.jpeg
  • ललित

“पुस्तक वाचणारा माणूस कमी का होत चाललाय?”

वर्षा पतके थोटे मार्च 2, 2026
Gemini_Generated_Image_hgaprihgaprihgap
  • ललित

धांदरटपणा की कामाचा ताण 

वंदना लोखंडे फेब्रुवारी 27, 2026
1000544594.jpg
  • ललित

पसारा

अपर्णा शेंबेकर फेब्रुवारी 25, 2026

ताजे लेख

  • “पुस्तक वाचणारा माणूस कमी का होत चाललाय?”
  • धांदरटपणा की कामाचा ताण 
  • पसारा
  • *प्रस्थान*
  • लाईक्सच्या युगात आत्ममूल्य कुठे हरवतंय?

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

WhatsApp-Image-2026-02-28-at-17.59.33.jpeg
  • ललित

“पुस्तक वाचणारा माणूस कमी का होत चाललाय?”

वर्षा पतके थोटे मार्च 2, 2026
Gemini_Generated_Image_hgaprihgaprihgap
  • ललित

धांदरटपणा की कामाचा ताण 

वंदना लोखंडे फेब्रुवारी 27, 2026
1000544594.jpg
  • ललित

पसारा

अपर्णा शेंबेकर फेब्रुवारी 25, 2026
54E7974C-2C73-4DFF-A984-DD6DA199BD13.jpeg
  • ललित

*प्रस्थान*

सुषमा ठाकूर फेब्रुवारी 24, 2026
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.