Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

माउंट वेलिंग्टनवर चढाई!!

हेमंत नाईक जानेवारी 25, 2026
0
CTJ4858558665890729021.jpg
*माउंट वेलिंग्टनवर चढाई!!*
२५. ०१. २०२६
✍️हेमंत नाईक
जीवनात  शिखर गाठायचे  असेल तर चढाई चढण्याशिवाय प्रर्याय नसतो. यालाच आपण प्रयत्न असही म्हणतो.आज सकाळी  ऑकलंडळा सकाळच्या फेरफटक्यासाठी आलेल्या माऊंट वेलिंग्टनची चढाई चढताना हेव विचार मनात घोगवत होते. अगदी कमी वेळात शिखर गाठायला तिथे निसर्डी अरुंद पाऊलवाट होती. कदाचित वेळ कमी लागला असता पण “डोन्ट टेक शॉर्ट कट ” हे वाक्य मनाशी पक्के असल्याने या मृत ज्वालामुखीच्या सभोंवती फिरत फिरत त्याच्या क्रेटर कडे जाण्यासाठी सुरवात केली सोबत चिरंजीव माहिती देत होता आणि चढताना सभोंवतीअसलेले तमाकी नदीचे टास्मान समुद्राला मिलनाचे आणि हिरव्या सुंदर ऑकलंडचे ३६० डिग्रीत देखणे दृश्य स्मृतित साठवत मार्गक्रमण करत होतो.
“जीवन जगताना घोड्यासारखे झापड लावून फक्त्त ध्येयाकडे लक्ष केंद्रित वाटचाल करणे लवकर यश देत असेल कदाचित.. पण सभोंवती ईश्वराने छोट्या छोट्या गोष्टीत पेरून ठेवलेला त्या आनंदास नक्की मुकतो. काहींतरी प्राप्त करताना काहींतरी सोडावे लागते..हे मात्र नक्की खरं आहे.”
लोकार्थाने खूप यशस्वी ठरलेल्या माणसांना यशाकडे पोहचताना ते प्राप्त करण्याच्या धुंदीत जीवन कसे भर्रकन निघून गेले तेच कळत नाही मग बऱयाच वेळा आपण खूप काही  गमावले केले हीं भावना शेवटी असतें.. म्हणून जीवन धावत पळत नव्हे तर प्रसंगी क्षणभर विसावा घेत आस्वाद घेत जगले तर नक्की असा पश्चाताप करण्यांची वेळ येणार नाही. इकडे  वर्क लाईफ बॅलन्स उत्तम आहे असे काय म्हणतात ते हेच असावे. स्वतः साठी, कुटुंबासाठी वेळ हा हवाच.
न्यूझीलंडमधील ऑकलंडमधील माउंट वेलिंग्टन ज्यांला येथील मूळ रहिवासी माओरी “मौगेरी” संबोधतात, हा एक  मृत ज्वालामुखी आहे. “माउंट वेलिंग्टन” हा सुमारे १०,००० वर्षांपूर्वी तयार झालेला, हा ऑकलंडच्या सर्वात तरुण ज्वालामुखींपैकी एक आहे. जो त्याच्या शिखरावरील विवरातून शहराचे विहंगम दृश्ये देतो, तेथे क्रेटर सभोंवती चालण्यासाठी सुंदर वॉक वे आहे..
या ज्वालामुखी डोंगरावर जाताना बऱयाच उंची पर्यत गोलाकार चढत जाणाऱ्या डांबरी रस्त्याची आम्हाला असलेली  साथ आता संपली होती.आता समोर हिरवळ क्रेटर स्पष्ट दिसत होते. त्याच्या उंच कडेवर व संभोवती फिरण्यासाठी पायऱ्या व लाकडी वॉक वे आखीव रेखीव तेथील बॅंचेस कलात्मक रीतीने मांडलेल्या रस्त्या काठाच्या मोठाल्या शिळा उगवलेली पिवळी जांभळी गवत फुले सारे विलक्षण होते.
कधी काळी तप्त लाव्हा ओसंडून वाहवणाऱ्या सुमारे दोन किमी परीघ असणाऱ्या या क्रेटरच्या सभोंवती उंचावर फिरताना रोमांच वाटत होते. एका बाजूला माऊंट वेलिंग्टनची उतरण आणि दुसरीकडे मधोमध सुमारे तीनशे फुटाचा गोलाकार क्रेटरचा हिरवळीने व्यापलेला खोलगट भाग.. असे देखणे चित्र मी प्रथमच अनुभवत होतो.
सूर्योदयाची वेळ झाल्याने सूर्याची सोनेरी किरणे क्रेटरच्या सभोंवतालच्या डोंगरातून अद्भुत सौदर्य दर्शवीत होते. इथं वातावरणाची जाडी कमी  असल्याने आपल्याकडे दिसते तसें उगवतीचे सौम्य लाल तांबूस रविबिंब बघानायचं भाग्य इथल्या लोकांना नाहीं.
सर्व मेंदूत साठवून परत खाली उतारायला सुरुवात केली.
“डोंगरावरून खाली उतरताना चढण्यासारखा सारखा त्रास होत नसला तरी आयुष्याच्या उतरणीला मात्र शरीर थकले असल्याने त्रास हा सर्वांनाच अटळ असतो.तो सहन करतच पैलतीर गाठता येतो.”
ज्वालामुखी डोंगर उंच तो
तप्त लव्हा ओघळून फार
आग ओकली जिथे कधी
तिथे हिरवळ मऊ मउशार!!
तप्त होते तेव्हा सर्व सारे
भुमी आणि सारे आसमंत
निवू दयायला सर्वच काही
काळच खरा उपाय मात्र!!
उंचावरून दिसले सुंदर
नीट नेटके शहर हिरवे
दुवा जोडे सागरी पुल
स्कायटॉवर मुकुट मिरवे !!
उदय सूर्याचा सोनेरी तो
नित्य असतो आम्हा नवा
निराशेची मरगळ झटके
ज्ञान प्रकाश वाटे हवा हवा!!
✍️हेमंत नाईक

लेखक

  • हेमंत नाईक

    COEP१९८४ चा विद्यार्थी, पेशाने स्थापत्य इंजिनीअर असल्याने घराची सुंदर रचना करताकरता वयाची साठी गाठल्यावर नकळत शब्दांचीही रचना करू लागलो.मित्राच्या प्रोत्साहनाने अशाच एका लिहिण्याची कलेची पर्यटनांची संस्कृती जोपासणाऱ्या मंचावर लिहिण्यास सुरुवात केली.. प्रथम वावर हा :+1::rose::ok_hand::grinning_face_with_smiling_eyes: असा सांकेतिक चिन्हातच होता. मग एखादा शब्द मग आख्खी ओळ पुढे चारोळी मग एखादी कविता पोस्ट करता करता लेखा पर्यंत पोहचलो.या दोन वर्षात निवांत वेळ मिळाल्याने बरंच काही लिहीलं गेलं…

    माझा लेखन प्रवास:

    १. “उरल्या त्या आठवणी…” ही अकरा लेखांची लेखमाला मित्रांच्या मंचावर लिहिली. त्यात आमच्या गल्लीतील बंद पडलेल्या गणेशोत्सवाबद्दल लिहीले होते. कधी काळी जितेंद्र अभिषेकी, अरुण दाते, श्रीधर फडके, आशा खाडिलकर, जयवंत कुलकर्णी, अजित कडकडे, द.मा. मिरसदार, प्रभाकर कारेकर व. पू काळे, अशा अनेक दिग्गज कलाकाराच्या उपस्थितीने त्यांच्या गायनाने, कथाकथनाने आणि मुख्य म्हणजे दिवसभराच्या सहवासाने मला झालेला आनंदानुभव लिहिला होता.

    २. "काहीही!"ही एकवीस ललीत लेखनाची लेखमाला.

    ३. “COEP चे सहजीवन” हा माझ्या अभियात्रिकी महाविदयालयीन आयुष्यच्या सोनेरी स्मृतिचा स्मृतिगंध… मित्रांना खूप आवडला.

    ४. मित्र मैत्रिणीवर तयाच्या वाढदिवशी केलेल्या, आणि इतर प्रासंगिक कविता आणि लेख.

    ५. न्यूझीलंड डायरी हे मित्रांच्या आग्रहाने मार्च २०२४ ते मे २०२५ दरम्यान मित्राच्या मंचावर लिहिलेले न्यूझीलंडचे प्रवासवर्णन सध्या मायबोलीवर पोस्ट करत आहे.

    ६. २०२६च्या नववर्ष दिनापासून मी एक “सुरपाखरू” होऊन त्यांच्या “३० दिवसात ३० प्रयोग २०२६” या थव्यामधे दाखल हौवून लिहिण्याचा आणि वाचनाचा आनंद लुटतो आहे

Tags: सुरपाखरू ३०दिवसात३० प्रयोग२०२६

Post navigation

Previous: दक्षिण दिग्विजय : ५ सुचिंद्रम आणि मेणपुतळ्यांचे संग्रहालय
Next: हम्पी आणि विजयनगर विषयक पुस्तकें
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

gumohor-water
  • ललित

चांदणे शिंपीत जाशी

ऐश्वर्या डगांवकर एप्रिल 16, 2026 0
WhatsApp-Image-2026-04-13-at-20.11.49.jpeg
  • ललित

सगळ्याच गोष्टींची विपुलता

वर्षा पतके थोटे एप्रिल 13, 2026 0
IMG-20260412-WA0052.jpg
  • ललित

स्वर स्वामिनी आशा!!

हेमंत नाईक एप्रिल 13, 2026 0

ताजे लेख

  • चांदणे शिंपीत जाशी
  • सगळ्याच गोष्टींची विपुलता
  • स्वर स्वामिनी आशा!!
  • नकार देणं इतकं कठीण का वाटतं?
  • “विसरणं एक दैवी वरदान!!!”

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

gumohor-water
  • ललित

चांदणे शिंपीत जाशी

ऐश्वर्या डगांवकर एप्रिल 16, 2026 0
WhatsApp-Image-2026-04-13-at-20.11.49.jpeg
  • ललित

सगळ्याच गोष्टींची विपुलता

वर्षा पतके थोटे एप्रिल 13, 2026 0
IMG-20260412-WA0052.jpg
  • ललित

स्वर स्वामिनी आशा!!

हेमंत नाईक एप्रिल 13, 2026 0
WhatsApp-Image-2026-04-07-at-06.43.24.jpeg
  • ललित

नकार देणं इतकं कठीण का वाटतं?

वर्षा पतके थोटे एप्रिल 7, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.