Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

एक्सेस ग्रांटेड – संगणकीय हॅकर चे हास्यास्पद सुलभीकरण

तुषार जोशी फेब्रुवारी 22, 2026 1 minute read
0
Screenshot 2026-02-22 at 2.36.29 PM

सहसा चित्रपटांमधे आणि धारावाहिक मालिकांमधे एक विडियो गेम खेळणारे अद्वितीय असे एक हॅकर म्हटले जाणारे पात्र दाखवतात. या पात्राला तुमच्या मनात येईल ते आणि जगात असलेले सगळे काही लिलया हॅक करता येते. म्हणजेच कुणी कितीही अंकीय गुंतागुंतीचे सुरक्षा यंत्रणेचे कुलूप तयार केलेले असो यांना ते उघडता येते, ते देखील त्यांच्या छोट्याच्या हातातल्या लॅपटॉप वरूनच हे सगळे करताना दाखवलेले असते.
.
एक संगणक क्षेत्रात विस वर्षाहून अधिक काम करणाऱ्या अंकीय जगातल्या माझ्यासारख्या प्रेक्षकाला ते अत्यंत हास्यास्पद वाटते हे साहजिकच आहे. यात त्या चित्रपटांचा आणि धारावाहिक मालिकांचा फार दोष मानता येत नाही, कारण त्यांना मनोरंजनासाठी सर्वांना समजेल असे काहीतरी दाखवायचे असते. आपण इतकेच समजायचे की जे दाखवले जाते आहे ते सूचक आहे प्रत्यक्षात त्या पात्राने कष्टप्रद काही केले असेल आणि ती अंकीय कोंडी उकलली असेल.
.
प्रेक्षकांना समजावे म्हणून केलेले हास्यास्पद दिग्दर्शनाचे अजून एक उदाहरण म्हणजे एका काळ्या खिडकीमधे (टर्मिनल) काही तरी करून झाल्यावर तिथेच मोठ्या इंग्रजी लाल अक्षरांमधे एक्सेस डिनाइड किंवा हिरव्या अक्षरांमधे एक्सेस ग्रांटेड असे लिहून येते आणि मग सगळी पात्रे एकमेकांना मिठ्या मारून तो क्षण साजरा करतात.
.
या सगळ्या गोंधळात इतक्यात मी एक अशी धारावाहिक मालिका पाहिली ज्यात दिग्दर्शकाने नवे काही प्रयोग केले आहेत. खूपच गुंतागुंतीची असेम्ब्ली लॅंगवेज प्रोग्रामिंग करतांना दाखवलेली पात्रे आणि त्यांचे हास्यास्पद सुलभीकरण न करता ते काय करताहेत ते एका वेगळ्या दृष्टीकोणातून मांडणे असा हा केलेला प्रयोग मला आवडला.
.
मुख्य म्हणजे इतक्यातच एका नव्या प्रकल्पासाठी मी लो लेवल प्रोग्रामिंग आणि असेम्ब्ली लॅंग्वेज मधे काम करतोय आणि त्याच प्रकारचे क्लिष्ट काम करतांना या धारावाहिक मालिकेतली पात्रे दिसतात, आणि ते काय करताहेत जेव्हा दाखवले जाते ते माझ्या सारख्या अंकीय जगाची ओळख असलेल्या व्यक्तीला कळते आणि कौतुक वाटते की इतकी क्लिष्ट गोष्ट हे दाखवायचा प्रयत्न करताहेत.

Screenshot

लगेच शॉट एका सामान्य व्यक्तीच्या दृष्टीकोणातून काय होते आहे ते समजायला एका वेगळ्या स्तरावर तीच व्यक्ती असे काही करतांना दाखवली जाते जे अंकीय जगापासून दूर असणाऱ्या व्यक्तीला देखील कळावे.

Screenshot
Screenshot
Screenshot

माझ्यासारखेच अंकीय जगात वावरणारे इतर प्रेक्षकांना हे दिग्दर्शन कसे वाटले ते ऐकायला मला आवडेल आणि तुम्ही जर अंकीय जगताशी थेट संबंध नसणारे असाल तर तुम्हाला यात दाखवलेल्या संगणकीय प्रणालीमधे घडत असणाऱ्या घटना कंटाळवाण्या झाल्या की यातल्या वेगळ्या हाताळणीने त्या समजल्या ते देखील मला वाचायला ऐकायला आवडेल. तुम्ही ही धारावाहिक मालिका बघितली नसेल तर नक्की बघा आणि तसे तुम्हाला बघायची संधी मिळालीच तर मला तुमचे मत कळवा.
.
असे नवे प्रयोग झालेले दिसले की प्रयोगकर्त्यांचे कौतुक वाटते.
.
(अंकीय जगातला एक प्रवासी)
तुषार
.
नागपूर, रविवार, २२ फेब्रुवारी २०२६

लेखक

  • तुषार जोशी
    तुषार जोशी

    तुषार जोशी पर्सिस्टंस्ट सिस्टिम्स कंपनीमधे चीफ आर्किटेक्ट पदावर कार्यरत आहेत.  ते मराठी कविता आणि ललित लेख लिखाण करतात.

Tags: सुरपाखरू प्रयोग२०२६ अक्षरयात्री२०२६

Post navigation

Previous: कालाय तस्मै नम:
Next: लग्नगाठ!!
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.