Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

अर्धा तास

अपर्णा शेंबेकर मार्च 17, 2026
0
1000562004.jpg
अर्धा तास
भाग  तिसरा
भर दुपारी सानिका अशी बाहेर कधी जातच नसे.सोमवार ते शनिवार ग्रंथालय.रविवारी आठवड्याची राहिलेली कामे.दुपारी थोडी झोप. एखादेवेळी संध्याकाळी  कुठे बाहेर जाणे होत असे. तिला नेहमी वाटायचे की आयुष्य छान सुखात जगता यावे म्हणून आपण नोकरी करतो आणि ही नोकरी रोज आपल्या आयुष्याचा घास घेते.शेवटी त्या चक्रात वर्षानुवर्षे फिरून कधी वेळ मिळाला चुकून तर आपल्यालाच आठवत नाही की नेमके काय करावे त्या वेळेचे…इतके आपण त्या आठवड्याच्या वेळांमध्ये बंदिस्त होतो.तिने ऐकले होते की शेजारच्या प्रियाच्या घरी त्यांनी तीन वर्षे एक पोपट पाळला होता.त्यानंतर एकदा तिच्या घरी आलेल्या एका छोट्या मुलाने पिंजरा उघडून त्या पोपटाला उडण्याचे स्वातंत्र्य दिले पण तो उडू शकला नाही.थोडा पुढे गेला आणि काही वेळाने स्वतःच पिजऱ्याजवळ येऊन उभा राहिला होता. त्यांनी पुन्हा त्याला स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न केला पण तो मात्र जाईना.अखेर मांजरीने त्याचा फडशा पाडू नये म्हणून पुन्हा त्याला पिंजऱ्यात ठेवले.तो शांतपणे आत गेला.सानिकाला वाटले…आपणही असेच होत जातो…..खूप वर्षे एकसुरी काम केले की..!
आज दुपारी ती मोकळी होती पण जीवाला त्या विचित्र पुस्तकाचा घोर लागला होता !
आता ती पुस्तकासहित ग्रंथालयाच्या बाहेर एकटीच होती.काय करावे तिला सुचेना.उन्हामुळे जीव कासावीस झाला होता.तिने ठरवले की पहिले सावलीत बसून विचार करावा.तिला तहान लागली होती.ती एका छोट्या उपहारगृहाजवळ आली.आत गेली. आतापर्यंत एकटी ती कधी अशी उपहारगृहात गेली नव्हती.पण गोष्टीच अशा विचित्र घडल्या होत्या की तिला तसे फार वेगळे काही जाणवले नाही.तिने लस्सी मागवली.थंडगार ,गोड लस्सी पोटात गेल्यावर तिला स्वस्थ वाटले.
तिने बॅगमधून ते पुस्तक बाहेर काढले.पहिले पान तिने वाचले होते .पण ते पलटून दुसरे पान उघडण्याची तिची हिंमत होईना.जबरदस्त दडपण ,कमालीची उत्सुकता आणि बरीच भीती आणि एकूण सगळी रहस्यमयता तिला अस्वस्थ करीत होती.त्या दुसऱ्या पानावर काय लिहिले असेल?
    पुस्तक उघडून बघण्याची तिची हिंमत होईना.अचानक तिला आपण खूप एकटे आहोत असे वाटू लागले.आपल्यासोबत कोणीतरी हवे मग आपण काहीतरी मार्ग शोधू शकू असे तिच्या मनात आले.तिने फोन हातात घेतला आणि मेघनाला ..तिच्या बालमैत्रिणी ला फोन लावलाआणि संध्याकाळी तिला घरी बोलावले.  नंतर सानिका रिक्षाने घरी गेली. जेवण केले.
तेवढ्यात तिचा फोन वाजला.
तिने बघितले तर ग्रंथालयातला कर्मचारी…आशिष मानेचा फोन होता. ती म्हणाली.
“.हॅलो आशिष .कसा काय फोन केलास?”
आशिष म्हणाला,”हॅलो मॅडम.सॉरी तुम्हाला त्रास दिला.पण एक वाचक आलाय.तो म्हणतोय की  त्याचे पुस्तक तुमच्याजवळ आहे.मी त्याला परोपरीने सांगितले की असेल तर ते उद्या मिळेल .आज मॅडम सुट्टीवर आहेत.पण तो ऐकायला तयार नाही.म्हणतोय की एकदा फक्त मॅडमना माझा निरोप द्या.म्हणून तुम्हाला फोन करावा लागला मॅडम.हे ऐकून तिचे हात थरथरायला लागले.तिला काहीच सुचेना.पलीकडून आशिष हॅलो..हॅलो म्हणत होता.मग सानिका एकदम भानावर आली.तिने घाईने बोलायला सुरुवात केली…”आशिष त्याला थांबायला सांग .मी येतेच पुस्तक घेऊन.”
“ठीक आहे मॅडम.ठेवतो फोन.” 
सानिकाला हायसे वाटले की कोणाचे तरी हे पुस्तक आहे…ग्रंथालयात जाऊन त्याला सुपुर्द केले की आपण मोकळे….तिने पटकन बॅग खांद्याला लटकवली. घराला कुलूप लावले आणि ती रिक्षाने ग्रंथालयात पोहचली. रस्त्यात तिने मेघनाला थोडे काम आहे नंतर भेटू म्हणून फोन करून सांगितले. 
 धावत पळत ग्रंथालय गाठले.समोरच आशिष नवीन पुस्तकांच्या यादीतील पुस्तके क्रमांक घालून योग्य ठिकाणी ठेवण्याचे काम करीत होता.
“आशिष…कुठे आहे तो माणूस ?”
सानिकाने विचारले.आशिषने विचारले “अरे मॅडम तुम्ही ?कोणता माणूस ?”
“अरे तू नाही का फोनवर सांगितलेस मला आता अर्ध्या तासापूर्वी?”
“मी कुठे फोन केला तुम्हाला आज ?” आशिषने आश्चर्याने विचारले.
सानिकाच्या पायाखालची जमीन सरकली….
क्रमश:……….
अपर्णा शेंबेकर
१६.०३.२६
#अक्षरयात्री२०२६ 
#सुरपाखरू
1000562004.jpg
1000561990.jpg

लेखक

  • अपर्णा शेंबेकर

    अपर्णा शेंबेकर या नागपुरातील सोमलवार शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.

Post navigation

Previous: घरात सगळे असतानाही माणूस एकटा का वाटतो?
Next: चैत्र गौरी
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

WhatsApp-Image-2026-04-13-at-20.11.49.jpeg
  • ललित

सगळ्याच गोष्टींची विपुलता

वर्षा पतके थोटे एप्रिल 13, 2026 0
IMG-20260412-WA0052.jpg
  • ललित

स्वर स्वामिनी आशा!!

हेमंत नाईक एप्रिल 13, 2026 0
WhatsApp-Image-2026-04-07-at-06.43.24.jpeg
  • ललित

नकार देणं इतकं कठीण का वाटतं?

वर्षा पतके थोटे एप्रिल 7, 2026 0

ताजे लेख

  • सगळ्याच गोष्टींची विपुलता
  • स्वर स्वामिनी आशा!!
  • नकार देणं इतकं कठीण का वाटतं?
  • “विसरणं एक दैवी वरदान!!!”
  • सुरपाखरू(मानसिकता)जून २०२६

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

WhatsApp-Image-2026-04-13-at-20.11.49.jpeg
  • ललित

सगळ्याच गोष्टींची विपुलता

वर्षा पतके थोटे एप्रिल 13, 2026 0
IMG-20260412-WA0052.jpg
  • ललित

स्वर स्वामिनी आशा!!

हेमंत नाईक एप्रिल 13, 2026 0
WhatsApp-Image-2026-04-07-at-06.43.24.jpeg
  • ललित

नकार देणं इतकं कठीण का वाटतं?

वर्षा पतके थोटे एप्रिल 7, 2026 0
Screenshot_20260406_113022_WhatsApp.jpg
  • ललित

“विसरणं एक दैवी वरदान!!!”

हेमंत नाईक एप्रिल 5, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.