Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

संत नामदेव

ऐश्वर्या डगांवकर एप्रिल 23, 2026 1 minute read
0
gumohor-water
मनाला पुसावे आपुलिया
पापाचे संचित देहासी दंडण।
तुज नारायणा बोल नाही॥१॥
भावार्थ -आपण वारंवार विचारतो ,” माझ्याच आयुष्यात इतक्या समस्या का?”परंतु तटस्थपणे स्वतःच्या आयुष्याचे मुल्यमापन केले, तर लक्षात येईल की आपल्या चुकीच्या सवयी,घेतलेले चुकीचे निर्णय,वेळेचा अपव्यय आणि आरोग्याकडे केलेले दुर्लक्ष याचेच हे संचित फळ आहे.आपण दोष देवाला किंवा नशिबाला,पण यात ' नारायण 'यांचा काहीही संबंध नाही.हा सृष्टीचा साधा नियम आहे की आपण जे पेरतो, तेच उगवते.
सुख अथवा दुःख भोगणे देहासी।
सोस वासनेशी वाउगाची॥२॥
अर्थात -' वासना ' म्हणजे केवळ इंद्रियभोग
नाहीत,तर सोशल मिडियाचा अतिवापर ,नको असलेली तुलना आणि अवास्तव अपेक्षांचे जाळे पण आहे.दुस-याचे आभासी(भौतिक)सुख/जीवन पाहून स्वतःला कमी लेखणे ही आजची मोठी वेदना आहे.दु:आ हे कधीच बाहेरून येत नसतं ते आपल्या भरकटलेल्या चित्तातून व अतृप्त अपेक्षांमधून जन्माला येते.त्यासाठी आपल्या मनाला आवरणे गरजेचे आहे.
पेरि कडु जीरें इच्छी अमृतफळ।
अर्किवृक्षा केळी येती कैंच्या॥३॥
अर्थात –माणसाला कष्टांशिवाय यश हवे आहे, गुंतवणुकीशिवाय परतावा हवा आहे आणि नात्यात गुंतवणूक न करता प्रेम हवे आहे.रूईचे झाड लावून केळाची अपेक्षा करणे मुर्खपणाचे आहे तसेच चूकीच्या मार्गाने जाऊन सुखाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे.वाईटातून चांगले कधीच निर्माण होऊ शकत नाही.
मुसळाचे धनु न होय सर्वथा।
पाषाण पिळिंता रस कैंचा॥४॥
प्रत्येक गोष्टीत शॉर्टकट शोधण्याची प्रवृत्ती वाढली आहे.आपण अशा ठिकाणी सुखाचा शोध घेतोय ,जिथे त्याचा लवलेशही नाही.खडक कितीही धुतला तरी तो मृदू होईल का ?आणि पिळला तर त्यातून रस निघेल का ?जिथे शक्यताच नाही तिथे अपेक्षा ठेवणे म्हणजे स्वतःच्या विवेकाची फसवणूक करणे आहे.
नामदेव म्हणे देवा का रूसावे।
मनाला पुसावे आपुलिया॥
अर्थात –आपण दुस-यांचा,तज्ञांचा सल्ला घेतो वेळ पडली तर गुगलचा पण सल्ला घेतो.किंवा दोषही देतो.पण कधी स्वतःच्या आत डोकावून पाहिले आहे का?खरा बदल बाहेर नाही ,तो आत्मचिंतनातून सुरू होतो.आपले मनच आपल्याला सांगत असते की आपण कुठे चुकतोय, फक्त ते ऐकण्याची तयारी हवी.जीवन
बदलायचे असेल ,तर देव नशिब किंवा परिस्थितीची वाट पाहू नका.आपल्या सवयी, विचार आणि निवडी बदला.कारण शेवटी आपले आयुष्य हे आपल्याच निर्णयांचे प्रतिबिंब असते.
सौ ऐश्वर्या डगांवकर पुणे
भ्रमणध्वनी -९३२९७३६६७५

 

लेखक

  • ऐश्वर्या डगांवकर

    पूर्वाश्रमी-वर्षाराणी दाणे
    शिक्षण-- शालेय आणि महाविद्यालयीन -धुळे
    बी. ए. ऑनर्स इंग्रजी विषयात
    पूना युनिव्हर्सिटी महाराष्ट्र.
    व्यवसाय --लेखिका /कवयित्री --मराठी हिंदी गृहिणी,कथाकथन,रसग्रहण
    भ्रमणध्वनी -९३२९७३६६७५

Post navigation

Previous: तुम्ही जे समजतात..तो मी नव्हे !!
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

gumohor-water
  • ललित

तुम्ही जे समजतात..तो मी नव्हे !!

हेमंत नाईक एप्रिल 20, 2026 0
WhatsApp-Image-2026-04-20-at-4.37.33-PM.jpeg
  • ललित

काही गाणी आयुष्यभर आपलीच का वाटतात?

वर्षा पतके थोटे एप्रिल 20, 2026 0
gumohor-water
  • ललित

चांदणे शिंपीत जाशी

ऐश्वर्या डगांवकर एप्रिल 16, 2026 0

ताजे लेख

  • संत नामदेव
  • तुम्ही जे समजतात..तो मी नव्हे !!
  • काही गाणी आयुष्यभर आपलीच का वाटतात?
  • चांदणे शिंपीत जाशी
  • सगळ्याच गोष्टींची विपुलता

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

gumohor-water
  • ललित

संत नामदेव

ऐश्वर्या डगांवकर एप्रिल 23, 2026 0
gumohor-water
  • ललित

तुम्ही जे समजतात..तो मी नव्हे !!

हेमंत नाईक एप्रिल 20, 2026 0
WhatsApp-Image-2026-04-20-at-4.37.33-PM.jpeg
  • ललित

काही गाणी आयुष्यभर आपलीच का वाटतात?

वर्षा पतके थोटे एप्रिल 20, 2026 0
gumohor-water
  • ललित

चांदणे शिंपीत जाशी

ऐश्वर्या डगांवकर एप्रिल 16, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.