Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

मन????

हेमंत नाईक जुलै 7, 2026 1 minute read
0
1001089903.jpg
        कालच  “मनपाखरू” हा सुंदर लेख वाचण्यात आला.. आणि मग मलाही मनावर लिहिण्याचा मोह आवरता आला नाही आणि मग माझ्या मनाने घेतलेला “मनाचा शोध”  लिहितो आहे.
     मनावर लिहिणं एक खरोखर आव्हान आहे. कोणत्या क्षणी ते कसे वागेल हे सांगता येत नाही अगदी गूढ आहे ते… मनावर जो काबू ठेवू शकतो तो योगी बाकी भोगी. मन जिंकलं की सर्व जग जिंकल्यासारखं आहे.
   “असेल जर मनात
     शक्य  सर्व जगात!!”
     असे एक सुभाषित आज वाचले. त्यात खरंच तथ्य आहे,
     
     “मनाला हरु देऊ नका; कारण प्रत्येक विजयाची सुरुवात मनातूनच होते. कार्य सिद्धिस जाण्यासाठी दोन्ही हात मजबूत सरले की सहज कार्य होते असे प्रत्यक्षात दिसत असले तरी त्या मागे करता करवितेअसतें ते अदृश्य मन “
       मनाचे विश्लेषण कवियत्री बहीणाबाईंनी खालील कवितेत सुरेख केले आहे.
मन वढाय वढाय
उभ्या पीकांतलं ढोर,
किती हांकला हांकला
फिरी येतं पिकांवर.
मन मोकाट मोकाट
त्याले ठायीं ठायीं वाटा,
जशा वार्‍यानं चालल्या
पान्यावर्‍हल्यारे लाटा.
मन लहरी लहरी
त्याले हातीं धरे कोन?
उंडारल उंडारलं
जसं वारा वाहादन.
मन जह्यरी जह्यरी
याचं न्यारं रे तंतर,
आरे इचू, साप बरा
त्याले उतारे मंतर !
मन पांखरू पांखरूं
त्याची काय सांगूं मात ?
आतां व्हतं भुईवर
गेलं गेलं आभायांत.
मन चप्पय चप्पय
त्याले नहीं जरा धीर,
तठे व्हयीसनी ईज
आलं आलं धर्तीवर.
मन एवढं एवढं
जसा खाकसचा दाना,
मन केवढं केवढं ?
त्यांत आभाया मायेना.
देवा, कसं देलं मन
आसं नहीं दुनियांत !
आसा कसा रे यवगी
काय तुझी करामत !
देवा, आसं कसं मन ?
आसं कसं रे घडलं
कुठे जागेपनीं तुले
आसं सपन पडलं !
    खान्देशमधे जळगाव जवळ असलेल्या असोदा येथील कवियत्री बहिणाबाईंनी त्याच्या कवितेत जादुई अद्भुत मनाची अनेक रूप त्याच्या गुण व दोषासह अगदी चपखल दाखले देऊन समजावली आहेत.
      बहिणाबाईं  या कवितेत म्हणतात ईश्वराला पडलेले सुंदर स्वप्न म्हणजे मन.या अद्भुत व जादुई निर्मिती बद्दल त्याला त्या यवगी अर्थात किमयागार म्हणून कौतुक करतात.
        मनाने कसे चिंतावे? कसे वागावे?… याचे मार्ग आणि अचूक वर्णन रामदास स्वामींनी “श्री मनाचे श्लोकात ” केले आहे. एकेक श्लोक लेखनाचा मुख्य विषय होऊ शकतो.
       मन आपल्या सर्वाकडे आहे पण अजूनही मन म्हणजे नेमके काय? त्याची अनेक बदलती रूप आपण अनुभवतो कधी प्रेमळ तर कधी रागीट एखाद्या बाबतीत हळवा असलेला माणूस दुसऱ्याशी कठोर वागू शकतो. मनाच्या रचने बाबत आपण सर्व अजूनही अनभिज्ञ आहोत.
        “मन जिथे सकारात्मक असतं, तिथे यशाचा मार्ग आपोआप तयार होतो”
        त्यासाठी नेहमी सकारात्मक राहणे फार महत्वाचे आहे. तिस लेख पूर्ण होतील का? हा नकारात्मक विचार नको. तिस काय रोज मी काहितरी लिहू शकेल ही सकात्मकता हवी.मी लिहिलेलं कोणी वाचेल का?  ते आवडेल का? अशा नकारात्मकता मनात येऊ देऊ नये.
       “अदृश्य मन हेच कर्ता करवितेआहे!”
         हे सर्व आपण मान्य करत असलो तरी आधुनिक शास्त्रात मन नेमके काय? याबद्दल अजूनही पक्का निष्कर्ष नाही.  विश्वाच्या शोधा प्रमाणे अथांग मनाचा शोध कायम सुरु राहणार आहे…. अगदी अनादी पासून अनंता पर्यंत!! 
       *”मन”* हीच कल्पना मनात घेंवून मला मनावर सुचलेल्या या ओळी लिहून थांबतो.
“मन” आहे खरा कर्ता
बाकी सर्व आहे खोटे.. 
नाही अशक्य या जगीहो 
पूर्ण ते जिद्दी मन करे !!
शरीर मनाचे कह्यात
पोटापुरते हवे त्याला
चोचले मनाचे असता 
फाईव्हकोर्स भोजनाला!!
तन मन दोनआहे रूप
दृश्य एक दुजे अदृश्य
अदृश्यरूपी देव तोही
वसतो तोही या मनात !!
सुंदर गौर काया नेटकी
मनातं ज्यांच्या काळेबेरे
जन्म त्याचा झाला व्यर्थ 
निर्मळ मनी खरे देखणे!!
जसा विचार तसा आचारे
हृदयी त्याच्या वसे ईश्वर
मनात आहे एक गोष्ट
सांगे दुजी..तो लबाड!!
मन अचूक.. काय ते रे
सांगून गेल्या बहिणाबाई
अज्ञात अनंत ते विश्वासम
शोध मनाचा रोज तेच घेई !!
मनात येता लिहिले सत्वर 
साहित्याच्या या दिंडीवर 
अंतर्मन खरं नित्य बोलते 
खुशाल विचारा त्याला प्रश्न 
!!
✍️हेमंत नाईक
7 जुलै 26
#सुरपाखरू#३०दिवसात३०#प्रयोग जुलै २०२६

Yahoo Mail: Search, organise, conquer

लेखक

  • हेमंत नाईक

    COEP१९८४ चा विद्यार्थी, पेशाने स्थापत्य इंजिनीअर असल्याने घराची सुंदर रचना करताकरता वयाची साठी गाठल्यावर नकळत शब्दांचीही रचना करू लागलो.मित्राच्या प्रोत्साहनाने अशाच एका लिहिण्याची कलेची पर्यटनांची संस्कृती जोपासणाऱ्या मंचावर लिहिण्यास सुरुवात केली.. प्रथम वावर हा  असा सांकेतिक चिन्हातच होता. मग एखादा शब्द मग आख्खी ओळ पुढे चारोळी मग एखादी कविता पोस्ट करता करता लेखा पर्यंत पोहचलो.या दोन वर्षात निवांत वेळ मिळाल्याने बरंच काही लिहीलं गेलं…

    माझा लेखन प्रवास:

    १. “उरल्या त्या आठवणी…” ही अकरा लेखांची लेखमाला मित्रांच्या मंचावर लिहिली. त्यात आमच्या गल्लीतील बंद पडलेल्या गणेशोत्सवाबद्दल लिहीले होते. कधी काळी जितेंद्र अभिषेकी, अरुण दाते, श्रीधर फडके, आशा खाडिलकर, जयवंत कुलकर्णी, अजित कडकडे, द.मा. मिरसदार, प्रभाकर कारेकर व. पू काळे, अशा अनेक दिग्गज कलाकाराच्या उपस्थितीने त्यांच्या गायनाने, कथाकथनाने आणि मुख्य म्हणजे दिवसभराच्या सहवासाने मला झालेला आनंदानुभव लिहिला होता.

    २. "काहीही!"ही एकवीस ललीत लेखनाची लेखमाला.

    ३. “COEP चे सहजीवन” हा माझ्या अभियात्रिकी महाविदयालयीन आयुष्यच्या सोनेरी स्मृतिचा स्मृतिगंध… मित्रांना खूप आवडला.

    ४. मित्र मैत्रिणीवर तयाच्या वाढदिवशी केलेल्या, आणि इतर प्रासंगिक कविता आणि लेख.

    ५. न्यूझीलंड डायरी हे मित्रांच्या आग्रहाने मार्च २०२४ ते मे २०२५ दरम्यान मित्राच्या मंचावर लिहिलेले न्यूझीलंडचे प्रवासवर्णन सध्या मायबोलीवर पोस्ट करत आहे.

    ६. २०२६च्या नववर्ष दिनापासून मी एक “सुरपाखरू” होऊन त्यांच्या “३० दिवसात ३० प्रयोग २०२६” या थव्यामधे दाखल हौवून लिहिण्याचा आणि वाचनाचा आनंद लुटतो आहे

Post navigation

Previous: श्रीमदभागवत चिंतन – ७ चतुःश्लोकी भागवत
Next: #30 दिवसात 30# प्रयोग जुलै2026
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.