Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

लक्ष्मणराव आणि कुटुंब – ०६

वैभव शिरखेडकर जुलै 7, 2026 1 minute read
0
ChatGPT-Image-Jul-7-2026-12_57_56-PM.png
संजय नेहमीच्या वेळात दुकान वाढवून घरी येतो. त्या आधी लक्ष्मणरावांनी सुमनबाईंना विचारून घेतलेलं असतं, संजयसोबत ती बोलणार की ते स्वतः. सुमनबाई स्वतः बोलणार असे ठरते.

नेहमीप्रमाणे जेवतांना किंवा जेवण झाल्यानंतर काही महाभारत घडू शकते याची पूर्वकल्पना लक्ष्मणरावांना आलेली असते.

जेवण झाल्यावर आपण बोलूया जरा शांततेत जेवण करून घेऊया. असे जेव्हा लक्ष्मणराव म्हणतात तेव्हा मात्र संजयला हसू आवरता येत नाही.

संज्या, तुझ्या बाबांनी शांततेत जेवायला लावले आहे रे!

हो आई, पण शांततेत कसे हसणार असे म्हणून पुन्हा संजय हसायला लागतो.

तुम्ही दोघेही बाप-लेक सारखेच, असे म्हणून सुमनबाईही हसायला लागतात. हे बघून लक्ष्मणराव आणि संजय एकमेकांकडे आश्चर्याने बघत असतात.

तिघांचेही जेवण झाल्यानंतर सुमनबाई मुलाला शहरातल्या आलेल्या स्थळाविषयी सांगतात.

बघ संजय, ते कुळकर्णी येऊन गेलेत आज एका स्थळाची माहिती घेऊन. त्यांनी तर म्हटले की  तुझा  वेळ बघून एकदा मुलगी बघायला येऊन जा म्हणून. पण मला वाटते की  आपण त्यांना नकार कळवावा.

का बरं आई, मुलगी न बघता नकार का कळवायचा आपण त्यांना. आणि कारण काय द्यायचे त्यांना. संजय स्पष्टपणे आईला विचारतो.

अरे, मुलगी दिसायला चांगली नाही असे ते कुळकर्णी  म्हणालेत.

सुमनबाई, संजयशी  कशाला खोटे  बोलता.. त्यांनी असे कधी म्हटले की, मुलगी दिसायला चांगली नाही म्हणून. मास्तर काय बोलले हे विसरलात का… मुलगी सावळी आहे पण दिसायला छान आहे. सुमनबाईंचे बोलणे पूर्ण होण्याच्या आधी लक्ष्मणराव बोलायला लागतात.

अहो, आपल्या गोऱ्या संजयला ती शोभेल का.. सुमनबाई संजयकडे बघून बोलतात.

सुमनबाई, आपण अजून मुलगी बघितली का..

आई, बाबा जरा मला बोलू देता का.. संजय दोघांनाही बोलण्याची परवानगी मागतो आणि बोलायला लागतो.

आई, बाबा म्हणतात ते योग्य आहे. मुलगी न पाहताच आपण कसा नकार द्यायचा. आणि सावळ्या  मुली सुंदर नसतात हे कसे काय आपण म्हणू शकतो. दिसायला गोऱ्या असणाऱ्याही बऱ्याचदा सुंदर नसतात. आणि सावळ्या  असणाऱ्या मुली सुद्धा दिसायला सुंदर असतात. आणि त्यातही सुंदरता बघून हो म्हणायचे का.. हा मोठा प्रश्न आहेच ना. हे बघा निर्णय तुम्हा दोघांनाच घ्यायचा आहे पण तुमचे दोघांचे तर एक मत करा.

संजय, तू जरी सर्व आमच्यावर सोपवले असले तरी तुझा पण निर्णय असणार ना रे. असा काय नेहमी नेहमी तुम्ही बघून घ्या सर्व.. तुझे हे म्हणणे योग्यच आहे. पण संसार तुला करायचा आहे. लक्ष्मणराव स्पष्टपणे संजयला समजावून सांगतात.

हो बाबा तुमचे म्हणने बरोबर आहे. पण जिथे मला बोलायचे आहे तिथे बोलणार ना मी. विषय लग्नाचा आहे. तुम्ही सर्व मोठे, अनुभवी आहात.

हो ना आई.. आईकडे हसूनच संजय म्हणतो.

मला काय सांगतो बाबा, मी नेहमी एकटी पडते तुम्ही दोघे एक होता.

पण आई जे खरं आहे ते खरं आहे ना, त्या मुलीच्या सावळे असण्यात तिचा काय दोष.

अरे तू तिला बघितलेही नाही आणि एकदम तिच्या बाजूने बोलतोय . सुमनबाई संजयकडे बघून बोलतात.

आई, तेच तर माझेही म्हणणे आहे. तिला न बघताच कशाला नकार द्यायचा ना.

हे बघ संजय शब्दाला शब्द नको वाढवू. आता सुमनबाईंना राग यायला लागतो.

आई मी अगदी प्रेमाने बोलत आहे. आणि वाद तर मुळीच नाही घालत आहे.

आता संजय खूप स्पष्टपणे  बोलायला लागतो. त्या मुलीच्या जागी जर आपल्या इतर कोणत्याही नातलगांची, आपल्या ओळखीतली जरी असती  तरी आपण असे बोललो असतो का.

बरं आई मला एक सांग, आपली ताई जर सावळी असती आणि तिच्या बाबतीत कुणी तिच्या रंगावरून तिची सुंदरता ठरवली असती तर.

संजयच्या बोलण्यावर काय बोलावे हे सुमनबाईंना कळत नाही.

बाबा, आपण येणाऱ्या गुरुवारी अथवा रविवारी जाऊया मुलगी बघायला.

हो संजय, तसे मी कुळकर्णी मास्तरांना कळवितो सकाळी.. आणि गुरुवार अथवा रविवार जो कोणता वार ठरेल त्यानुसार मग जावई, मुलगी, राकेश आणि सुनबाईंना सुद्धा सांगतो.

क्रमशः 
ChatGPT-Image-Jul-7-2026-12_57_56-PM.png

लेखक

  • वैभव शिरखेडकर

    वैभव शिरखेडकर, नागपूर
    नागपूरला खासगी क्षेत्रात नौकरी. विविध विषयांवरचे पुस्तके वाचनाची आणि हिंदी, मराठी कविता लिखाणाची आवड. नागपूर विश्वविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी.

Post navigation

Previous: नंतर म्हणजे कधी ? भाग १
Next: “बाळ” जन्मला रे भौ “बाळ” जन्मला
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.