Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

नागपूरचा इतिहास – राजा बख्त बुलंद शहा

मोहन जोशी जुलै 9, 2026 1 minute read
0
gumohor-water

देवगढ राज्याची स्थापना गोंडवंशिय जमिनदार जटबा याने इ.स. 1590 च्या सुमारास केली. तेव्हा जटबा राजाचे लष्करात 200 घोडदळ ,5000  पायदळ होते  व अनेक हत्ती होते !

पूढे इ.स. 1634 मध्ये कोकशहा देवगढच्या गादीवर बसला. नंतर मोगल सुल्तान शहा जहानचा  फौजदार खान दौरान याने देवगढ राज्यावर हमला केला.  तेव्हा राजा कोकशहाने खानदौरान यास नजराणा देवून मोगलांशी  तह केला आणी मोगंलाना चार वर्षात  तिन लक्ष रूपये खंडणी  देण्याचे मान्य केले.

 राजा कोक शहा नंतर इ.स. 1647 मध्ये  पुत्र केसरी शहा देवगढच्या गादीवर

बसला. मग मोगलांचे फौजदार शहानवाझखान यांने  पुन्हा देवगढवर हमाला केला. तेव्हा मोगलांशी तह  करून 1 लक्ष खंडणी देण्याचे मान्य केले. इ.स. 1660 मध्ये केसरी   शहाचे निधन झाले

नंतर जेष्ठ पुत्र महिपत शहा देवगढ च्या गादीवर बसला. मग मोगल औरंगजेबने देवगढ राज्यावर वक्रदृष्टी टाकली . तेव्हा  मोगल लष्कराने  बु-हाणपूरात छावणी केली होती  या  अफाट मोगल फौजेचा प्रतिकार करणे घातकी ठरणार होते तेव्हा  राजा महिपत शहाने इ.स. 1686 मध्ये औरंगजेबाची  भेट घेतली आणी तहात  मोगलांचे वर्चस्व  स्विकारून   तिन लक्ष वार्षिक खंडणी देण्याचे मान्य.  औरंगजेब तहास मान्यता देण्याकरता  राजा महिपत शहा मुस्लमान होण्याची अट घातली. 

  औरंगजेब हा धर्मांध आणी क्रुर होता.  तसेच खंडणीकरता  हमले मोगल फौजा  फौजा  राज्याला फार उपद्रव करती राजा महिपतशहाने रयतेच्या संरक्षणाकरता   आणी  राज्यरक्षण करता  जड अतंःकरणाने धर्मातराची अट मान्य केली.

तेव्हा औरंगजेब आंनदुन ओरडल, ‘‘ मग आजपासून  तु राजा बख्त बुलंद शहा म्हणजे नशीवान राजा!‘‘

देवगढ राज्यात बैतुल व  छिन्नवाडा हे प्रांत होते   इ.स. 1699 मध्ये  लष्करी मदतीकरता  गढ मंडलाचे राजा नरिंद शहाकडून राजा बख्त बुलंदशहाला  सिवनी डोगंरताल ,व घनसैर हे गढ मंडला राज्याचे  प्रांत प्राप्त झाले.

 नंतर इ.स. 1700 मध्ये राजा बख्त बुलंद शहा स्वतंत्र होवून राज्य करू लागला. पुर्वी पश्चिम विर्दभ हा स्वराज्यात विर्दभ प्रांत म्हणून सामिल होता इ.स. 1689 मध्ये होता मोगलांनी बळकाविलेला स्वराज्याचा विर्दभ प्रांत हा सेना साहेब सुभा  पुरसोजीराजे यांनी जिंकुन घेतला होता. पण पुर्व विर्दभ मोगंलाच्या व-हाड सुभ्यात सामिल होता .  राजा बख्त बुलंद शहाने  मराठयांच्या मदतीने 4 हजार घोडदळ आणी 12 हजार पायदळ जुळवून आणी इ.स. 1702 मध्ये मोगलांच्या व-हाड सुभाचे सुभेदार अलिमर्दानखान याचा पराभव करून व-हाड सुभा जिंकून घेतला. नंतर मोगलांचा खजाना  लुटला! मोगलांच्या पराभवाची व खजाना लुटीची खबर ऐकून औरंगजेबाने नुसता थैयथयाट केला

‘‘तो  बख्त बुलंद  नुसन  निगुन बख्त  म्हण्जे  कम नशिबी  आहे ‘‘

 

 

लेखक

  • मोहन जोशी

Post navigation

Previous: ड्रॉईंग शीट
Next: आनंद
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.