Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

‘तंबोरा’ एक जिवलग……५

गौरीबाई गोवेकर जुलै 10, 2026
0
gumohor-water
न केलेल्या अभिनयाची गोष्टः अभिनय ही एक स्वतंत्र कला आहे. एखाद्याला गाता येतं म्हणजे अभिनयही येईलच असं नाही. ़़़जसे गाणे मुळात असायला लागते तसेच अभिनयाचेही आहे. तो रक्तात असावा लागतो. प्रत्यक्षात मात्र अनेक गायक गायिकांनी संगीत रंगभूमीवर अभिनय केला. यशही मिळवलं. परंतु त्यांना प्रारंभी नाटक कंपन्यांमध्ये अभिनयाचे धडे गिरवायला लागलेच. कंपन्यांच्या पदरी अभिनय शिकविण्यासाठी माणसे नेमलेली असत. एखाद्या गायक गायिकेला अभिनयात तयार करून घेण्याची त्यांची जबाबदारी. या शिवाय बुजुर्ग नट अशा गायकांना अभिनयाचे धडे देत. यथावकाश अभिनयात तयार होऊन ती गायिका किंवा गायक सराईतपणे अभिनय करू लागे आणि गाणे अधिक अभिनय याच्या जोरावर प्रसिद्ध होई. आईनं काही संगीत नाटकात कामे केली पण तिथं ती रमली नाही. अभिनय सुटला. गाणं राहिलं. सुटला म्हणजे जाणिवपूर्वक सोडला तिनं. मलाही नाटकात काम करण्याविषयी आग्रह झाला पण मी ते नाही केलं. आमच्याकडे नारायण गावकर म्हणून एक गुणी गोड गळ्याचे सुरेल गायक येत. ए. पी नारायण या नावानं त्यांनी चित्रपटांना संगीतही दिलेलं आहे. पूर्वी आकाशवाणीवर त्यांची पुष्कळ गाणी लागायची. “तू चांगली गातेसच तर तू नाटकात काम कर” अभिनय क्षेत्रात येण्याबद्दल ते मला खूप आग्रह करायचे. ते आले की म्हणायचे ” ती पहा…ती पहा नीट ऐक. संगीत रंगभूमी तुला साद घालते आहे. दे तिच्या हाकेला ओ दे आणि नाटकात ये” मी म्हणायची, ” बुवा मला काही तिची साद ऐकू येत नाही हो. मग कसे करायचे? ” असे विनोदी बोलणे चालायचे. ते मनाचे निर्मळ होते. अनेकदा ते यायचे. आता ते नाहीत. एकदा आलेले असताना म्हणाले पहा ” एका नवीन संगीत नाटकाची जुळवाजुळव सुरू आहे. त्यात अमुक अमुक गायिका आहे. तू सुद्धा त्यात भूमिका कर” मी म्हटल बुवा संवाद म्हणायला आले की मी गाणं विसरेन आणि माझं पद आलं की पुढचे संवाद विसरेन. कशाला उगाच त्या नाटकाला जन्माआधीच मारून टाकता? शिवाय माझ्या अभिनयानं ते संगीत नाटक विनोदी होईल ते निराळच.” असे आमचे संवाद चालायचे. एकदा महाराष्ट्रातल्या एका प्रसिद्ध ,गुणी आणि नंतर खूप लोकप्रिय झालेल्या विनोदी लेखक, नट, वादक, अनेक कलांमध्ये पारंगत असलेल्या व्यक्तीला ते घेऊन आमच्याकडे आले. माझ्या आवाजात त्यांना एक ठुमरी रेकॉर्ड करून हवी होती. एका नाटकात काही प्रसंगात पार्श्वसंगीत म्हणून वाजविण्यासाठी त्यांना ती हवी होती. घरीच रेकॉर्ड करायची होती. त्यांना चार ओळीच हव्या होत्या पण रेकॉर्ड मात्र पूर्ण ठुमरी करायची होती. तबला, सारंगीचे साथीदार त्यांनी आणले होते. ते लेखक स्वतः उत्तम पेटी वाजवत. सोबत मोठ्या रिळांचा टेपरेकॉर्डर त्यांनी आणलेला होता. घरातल्याच एका खोलीत आम्ही बाहेरच्या आवाजाचा त्रास न होईल अशा बेताने ती रेकॉर्डही केली. ते सर्व आटोपल्यावर नारायण गावकरांनी पुन्हा नाटकाचा विषय काढला. मला अभिनय करायला सांगा अशी ते त्या लेखकांना गळ घालू लागले. ते लेखक विनोदी होते. म्हणाले, “अहो नारायण गावकर, यांच्या सुरात असलेल्या विजेला मैफिलीचं आकाशच हवं. थेटरातल्या चार भिंतीमध्ये बंदिस्त करून त्या सुरांचा आपटबार कशाला करता?.” तुम्हाला त्यांना नाटकात आलेलं पहायचं आहे ना? मग माझ्या एका नाटकातल्या एका स्त्री पात्राला मी यांचं नाव देतो. खरोखरच पुढे त्यांनी त्यांच्या नाटकातल्या एका भूमिकेला माझं नाव दिल. पुढे मी नारायण गावकरांना म्हणायची, ” बघा बुवा गेले की नाही नाटकात मी?” अशी ही न केलेल्या अभिनयाची गोष्ट. मी नाटकात जरी भूमिका केल्या नाहीत तरी नाट्यसंगीत मात्र गायले. माझ्या मैफिलींमधून अनेक अजरामर नाटकांमधील पदे मी आवर्जुन गात असे. आणि ती श्रोत्यांना अतिशय आवडत असत.



 गौरीबाई गोवेकर.

लेखक

  • गौरीबाई गोवेकर
    गौरीबाई गोवेकर

Post navigation

Previous: लक्ष्मणराव आणि कुटुंब – ०९ ‘सुमनबाईंचे मन परिवर्तन’
Next: नागपूरचा इतिहास – १०
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.