Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

क्षण.

हेमंत नाईक जुलै 13, 2026 1 minute read
0
1001096392.jpg

   पुढचा क्षण आपला आहे की नाही यांची खात्री कोणीच देऊ शकत नाही. सकाळी नाश्ता करताना  चमच्यातला घास चमच्यात राहील त्यांनी मान टाकली क्षणात खेळ संपला. अशा अनेक घटना आपण आजू बाजूस बघत असतो तरीही आयुष्यात आपण स्वतःला खूप गृहीत धरतो जणू आपण अमरपट्टा घेऊन जन्मलो आहोत असे सर्वाना वाटते आणि या भावनेने “नंतर”  या शब्दाचा आपण सर्रास वापर करू लागतो. खरं तर जीवन मरणात फक्त एका श्वासाच अंतर असतें… पण कारण नसताना गोष्टी उद्यावर ढकलायची सवय लागते आणि आपल्या बकेटलीस्टचे वजनही वाढत जाते.

   काही जण आपल्या भूतकाळात इतके रमले असतात.. अजूनही ते कधी काळी असलेली भूतकाळातील  प्रतिष्ठा, मोठेपणा कुरवाळत बसतात किंवा कटू स्मृती आठवून स्वतःला त्रास करून घेतात.
   भूतकाळाच्या कटू स्मृती आणि येणाऱ्या भविष्याची भीती आपला बहुमूल्य वर्तमान बाधित करीत असतें म्हणून फक्त वर्तमानात जगा. जसं जसं वय सरत तशी याची जाणीव प्रकर्षाने होते.
   काहीवेळा आयुष्यात ती घटना घडणारही नसते पण त्या न घडणाऱ्या घटनेची चिंता आजचा आनंद हिरावून घेत असते.समस्यापासून दूर जाऊन ती नष्ट होत नाही किंवा तिला पेंडिंग ठेवली तर काट्याचा नायटा होतो तिला सामोरे जाणे हाच खरा उपाय आहे.. नंतर बघू नंतर सोडवू ही विचारसरणी चूक ठरू शकते.
   नापास होईल या भीतीने सर्व उन्हाळयांची सुटी तणावात घालण्या ऐवजी, आपले प्रयत्न प्रामाणिक होते पेपर कठीण आला पास होणे कठीण आहे असे घरच्या बरोबर त्याच दिवशी शेअर करून जे होईल ते होईल… आल अंगावर तर घेईल शिंगावर वा बचेंगे तो और भी लढेंगे ही वृत्ती हवी.
   वक्त चित्रपटातील एक गीत आठवते त्यात जीवनाचे वास्तव सांगितले आहे.
“आगे भी जाने न तू 
पीछे भी जाने  न  तू 
जो भी है बस 
यही एक पल है l “
हे गीत क्षणाचे महत्व अधोरेखित करते.
   “आता कशाला उद्याची बात”  हे १९३९ मधील व्ही. शांताराम यांच्या अतिशय गाजलेल्या ‘माणूस’ या मराठी चित्रपटातील शांता हुबळीकर  यांनी गायलेले आयकॉनिक  गाणे. ,मास्टर कृष्णराव यांनी संगीतबद्ध केले होते.ते वर्तमानात जगा ही याच अर्थाचे,  त्यावेळी खूप सुपरहिट होते ते.
… हे नंतर करेन,
… हे नंतर सांगेन,
… नंतर विचारेल ,…
… नंतर बघेन..
… हे नंतर लिहीन 
   अशी अगणित नंतरची कामे आपण शिल्लक ठेवतो.या कधीच न संपणाऱ्या नंतरच्या यादीवर या मनात आलेल्या ताबडतोब टा क्षणी लिहून थांबतो..
तीन ती अक्षर…फक्त्त “नंतर”.
वाढवतात दुरी अन तें अंतर..
कार्य जरी उद्याला तुमचे नंतर
उरकुनी टाका आज तें सत्वर..
आज आता दिवस आला
संध्या झाली बघता बघता..
सोमवार हा असे वाटता
रविवार लगेचच तो आला..
महिने संपले,अनेक वर्ष संपली 
नकळत पोहचलो ६०व्या वर्षी..
माता पिता आप्तस्वकीय तें 
आम्हाला सोडून गेले हो काही..
कालचक्र अविरत पुढे जातें 
आता कसे फिरायचे  मागे ?
जो काही वेळ उरला आता 
त्याचा घ्या सर्वं पूर्ण फायदा ..
आयुष्यात रंग भरा हो …
मनमुराद आनंद लुटा हो …
आवडते तें करण्यासाठी
पळभरही थांबायचे नाही..
‘नंतर’  आपुल्या हाती  पक्के 
समजूनी पुढे ढकलतो सगळे?
… नंतर नंतर…नका बोलु हो 
उदया करायचे.. आज कराहो 
काय गोडी त्या चहाची 
चहा थंड झाल्यानंतर …
काय फिरण्याची ती गंम्मत 
उत्साह निघून गेल्यानंतर…
जेवण्यावर येते बंदी 
आरोग्य बिघडल्यानंतर …
श्राधाला गोड खीर ती,
आई-वडील गेल्यानंतर …
आश्वासन कागदी राहिली 
आश्वासन न पाळल्यानंतर…
पश्च्यातापाचा उपयोग नाही …
वेळ ती निघून गेल्यानंतर
आपल्यास मगअवचित कळते…
उशीर तो झाला… अरे बापरे!!..
आपण फक्त्त धावतच होतो .
जीवन जगायचे मात्र राहिले..
उतरणीस वय आले आता 
वादविवाद सर्वं बाजू ठेवा..
उदयासाठी न बाकी काही 
नंतर शब्द तो नित्य विसरा..
आनंदे जगा सर्वं आज हो,
जसा जीवनी, अंतिम हा क्षण..
मनात येईल ते खुशाल करुनी ,
वेचा  आनंदाचे कण अन कण ..
#सुरपाखरू#३०दिवसात३०#प्रयोग जुलै २०२६

Yahoo Mail: Search, organise, conquer

लेखक

  • हेमंत नाईक

    COEP१९८४ चा विद्यार्थी, पेशाने स्थापत्य इंजिनीअर असल्याने घराची सुंदर रचना करताकरता वयाची साठी गाठल्यावर नकळत शब्दांचीही रचना करू लागलो.मित्राच्या प्रोत्साहनाने अशाच एका लिहिण्याची कलेची पर्यटनांची संस्कृती जोपासणाऱ्या मंचावर लिहिण्यास सुरुवात केली.. प्रथम वावर हा  असा सांकेतिक चिन्हातच होता. मग एखादा शब्द मग आख्खी ओळ पुढे चारोळी मग एखादी कविता पोस्ट करता करता लेखा पर्यंत पोहचलो.या दोन वर्षात निवांत वेळ मिळाल्याने बरंच काही लिहीलं गेलं…

    माझा लेखन प्रवास:

    १. “उरल्या त्या आठवणी…” ही अकरा लेखांची लेखमाला मित्रांच्या मंचावर लिहिली. त्यात आमच्या गल्लीतील बंद पडलेल्या गणेशोत्सवाबद्दल लिहीले होते. कधी काळी जितेंद्र अभिषेकी, अरुण दाते, श्रीधर फडके, आशा खाडिलकर, जयवंत कुलकर्णी, अजित कडकडे, द.मा. मिरसदार, प्रभाकर कारेकर व. पू काळे, अशा अनेक दिग्गज कलाकाराच्या उपस्थितीने त्यांच्या गायनाने, कथाकथनाने आणि मुख्य म्हणजे दिवसभराच्या सहवासाने मला झालेला आनंदानुभव लिहिला होता.

    २. "काहीही!"ही एकवीस ललीत लेखनाची लेखमाला.

    ३. “COEP चे सहजीवन” हा माझ्या अभियात्रिकी महाविदयालयीन आयुष्यच्या सोनेरी स्मृतिचा स्मृतिगंध… मित्रांना खूप आवडला.

    ४. मित्र मैत्रिणीवर तयाच्या वाढदिवशी केलेल्या, आणि इतर प्रासंगिक कविता आणि लेख.

    ५. न्यूझीलंड डायरी हे मित्रांच्या आग्रहाने मार्च २०२४ ते मे २०२५ दरम्यान मित्राच्या मंचावर लिहिलेले न्यूझीलंडचे प्रवासवर्णन सध्या मायबोलीवर पोस्ट करत आहे.

    ६. २०२६च्या नववर्ष दिनापासून मी एक “सुरपाखरू” होऊन त्यांच्या “३० दिवसात ३० प्रयोग २०२६” या थव्यामधे दाखल हौवून लिहिण्याचा आणि वाचनाचा आनंद लुटतो आहे

Post navigation

Previous: दक्षप्रजापतींचा यज्ञ आणि सतीचा देहत्याग
Next: पैठणी
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.