अभिषेक किन्हेकर

होतात आरश्याचे हे वार काळजावरतीपारदर्शता जूनी ती माझी, प्रतिमेत राहिली नाही तडजोड ती करावी आपल्याच सावलीशीसंघर्षात त्या...
जगी सज्जनांचे कृपाळू असावेवधी दुर्जनांते पुन्हा ते स्मरावेकटींचे कर सोडूनी देत आतापुन्हा शस्त्र ते आज हाती धरावे....
 चला, सुरुवात करूया सोप्या भाषेत. समजा तुम्ही उशिरा रात्री एकटे बसलात, फोन स्क्रोल करताय, पण मन कुठेतरी...
आमचे एक अत्यंत हुशार, व्यासंगी पण थोडेसे लहरी प्राध्यापक मित्र आहेत. आम्ही सगळे त्यांना “बाळ” किंवा “बाळासाहेब”...
मागच्या लेखांत आपण फिरून या निष्कर्षाप्रत आलेलो होतो की आनंद मिळवायला आपल्याला जागृतावस्थेत शरीर निश्चल, मन शांत...
मागच्या लेखात आनंद आणि सुख ह्यांच्या व्याख्या आणि अनुभव घेण्याचा प्रयत्न केला. कितपत  बरोबर ते सांगता नाही...
अध्यात्म हा काही माझा प्रांत नाही. पण काही गोष्टी खरंच विचार प्रवण करणाऱ्या असतात. कुणाला आपण अगदी...
लहानपणी ओळख झालेला आणि आता सहसा दुर्मिळ झालेला हा प्रकार …. अतिशय बुद्धी चातुर्य, भाषालालित्य अन शब्दप्रभुत्वाचं अमोघ दर्शन घडवून आणणारा….   सहसा एखाद्या राजाच्या दरबारात एक ओळ दिली जाई. उदाहरणार्थ ….. “सिन्दूरबिन्दु विधवा ललाटे” म्हणजे विधवेच्या कपाळी कुंकवाचा टिळा. त्या काळी अत्यंत आश्यर्य चकित करणारी अशी एखादी घटना असे किंवा अगदी निरर्थक चरण दिला जाई, उदा. “ठंठं ठठंठं ठठठं ठठंठ:”  आणि शीघ्र कवींना आव्हान दिले जाई.   आणि  उपस्थित कवींना आव्हान असे की ह्याला धरून कमीत कमी चार चरणांचा एक बंध लिहावा. ह्यात दिलेली ओळ यावी पण कुठेही अर्थाचा अनर्थ नसावा. सर्व श्लीलाश्लीलतेचे, सामाजिक नीतिनियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे. तयार बन्ध हा आनंदायी व चमत्कृतीपूर्ण असावा. शक्यतोवर सहजस्फूर्त परंतू  निरर्थक नसावा.   आता उदाहरणादाखल सांगायचं झाला तर “सिन्दूरबिन्दु विधवा ललाटे”…. ह्यासाठी कवी लिहितात.   किं भूषणं सुन्दर सुन्दरीणाम । किं दूषणं पान्थ जनस्य नित्यम ॥ कस्मिन विधात्रा लिखितम जनानाम । सिन्दूरबिन्दु विधवा ललाटे ॥   अर्थ : सुंदर स्त्रियांचे भूषण काय असते? वाटसरूंना तक्रार, अडथळा काय? विधाता लोकांचे भविष्य कोठे लिहितो? कुंकवाचा टिळा विधवेच्या कपाळी. ...