*ll२६, जानेवारी….*
*अर्थात प्रजासत्ताक दिन ll*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✍️हेमंत नाईक
२६. ०१. २६
*जनैः जनहितार्थाय जनानाम् एव निर्मितम्।*
*लोकतन्त्रं भारतस्य वसुधायां विराजते॥*
_सत्ता प्रजेची सांगणारा,_
_आजचा हा सुदिन असे.._
_चिरायू तो नित्य रहावा,_
_ही सर्वांमनी भावना वसे..१_
_संविधान स्वतंत्र भारताचे_
_लागू २६ जाने.१९५०ला_
_सत्यात्तरावे वर्ष तयाचे_
_आनंद भारतात उसळला..२_
_चित्ररथ संस्कृती प्रगतीचा,_
_राजपथा दिमाखात निघे.._
_मिग राफेल जग्वार उडे नभी_
_सेना सामर्थ्य आमुचे दिसें..३_
_तिरंगे असंख्य घरी फडकले,_
_जसे उंच राष्ट्रपतीभवनावरी.._
_देशप्रेम सर्वाचे आज दिसें_
_विषय तोच आज मंचावरी..४_
_प्रगत भारत देशासाठी,_
_जाज्वल्य देशभक्ती रुजो .._
_सीमेवरच्या जवानांसम_
_सर्वस्व त्यागवृत्ती असो ..५_
_क्रांतिवीरांच्या बलिदानाने_
_स्वातंत्र्य प्राप्त जाहले.._
_वंदूनी स्मरता त्या सर्वांना_
_अश्रू दोन ते ढळले रे..६_
_*अखंड राहो देश आमुचा*_
_*चंद्र सूर्य गगनात जो वरी..*_
_*शुभेच्छा आजच्या सर्वांना*_
_*”निरंतर आपुली व्हावी प्रगती..८”*_
सर्वाना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. २६ जानेवारी पासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना लागू होऊन भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित केले गेले. प्रजेची सत्ता असा शब्दश: अर्थ होत असला तरी प्रत्यक्षात आज ७७ वर्षानी मात्र चित्र वेगळे दिसते आहे निवडून आलेल्यांची सत्ता असे म्हणावे लागेल.
२९ ऑगस्ट १९४७: घटना मसुदा समिती नेमली, तिचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते, तर या समितीचे इतर सदस्य के.एम.मुंशी, मोहम्मद सादुलाह, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, गोपाळ स्वामी अय्यंगार, एन. माधव राव , टी.टी. कृष्णामचारी ही सर्व जाणकार मंडळी होती. धर्मनिरपेक्षता,न्याय , समता, व्यक्तीस्वातंत्र्य, बंधुत्व जोपासणारी आणि लोकतांत्रिक असे भारतीय प्रजासत्ताक २६ जानेवारीला अस्तित्वात आले.
१९५४ पासून प्रजासत्ताकदिनी भारतात नागरी पुरस्कार दिले जातात. हे विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीसाठी भारत सरकारकडून दिले जाणारे सर्वोच्च सन्मान आहेत. यामध्ये ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, त्यानंतर पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या पुरस्कारांचा क्रमांक लागतो. हे पुरस्कार कला, विज्ञान, साहित्य, समाजसेवा, क्रीडा अशा अनेक क्षेत्रांतील उत्कृष्ट कार्यासाठी दरवर्षी प्रजासत्ताक दिनी जाहीर केले जातात.भारतीय संस्कृतीची ओळख दर्शवणारे सर राज्यांचे, सरकारी संस्थाचे चित्ररथ आणि लष्कऱी सामर्थ्य दर्शवणारी शस्त्र सामुग्रीची परेड हे एक प्रमुख आकर्षण असते.राष्ट्रपती या दिवशी राष्ट्रास उद्देशून भाषण करतात आणि तिन्ही सेनादलाकडून सलामी स्वीकारता.
७७ वर्षे प्रजासत्ताक दिनास पूर्ण झाले असली तरी राजकीय गोंधळ सर्वत्र वाढतो आहे.. घटनेचा सोयीस्कर अर्थ काढणारे स्वार्थी राजकारणी पाहिले की मन उद्वीग्न होते.
_घटनेच्या अंमलाची घटना_
_झाली ७७ वर्षाची आज.._
_किस त्या घटनेचा काढतात,_
_रोज देशाच्या न्याय मंदिरात .१_
_अर्थ बाबासाहेबांच्या घटनेचा_
_जरी साधा सोपा अन सरळ.._
_लावुनी अन्वयार्थ स्वार्थासाठी,_
_न्यायमंदिरी नेते ओकती गरळ..२_
_नेत्यांची होते पळवा पळवी_
_कोण कुठे , ही कठीण कोडी.._
_आता तर पक्षही जातात पळवले,_
_बरोबर नेतात जुनी ती चिन्हे ..३_
_सत्ताकारण मानूनी ते राजकारण_
_धुरंधर नेते विसरले समाजकारण_
_पक्ष माझा की पक्ष हा तुमचा_
_वादात पेटले या भूमीवर रण.. ४_
_मुकी गरीब जरी आज जनता_
_ओळखे ती आपुल्या नेत्याला.._
_पाच वर्षातून तिचे राज्य ते एकदा_
_त्या दिनी हिशोब होतो सर्वं चुकता..५_
_असे हिशोब अनेक वेळा झाले_
_सत्तेत नेते परत तेच अन ते राहिले._.
_गुण दोष जोखणे बाजू सारे सरले_
_विजयांचे कसेही फक्त्त महत्व राहिले..६_
_हीच सत्ता म्हणता का प्रजेची?,_
_राज्यघराण्याजागी सत्तेची घराणी.._
_नेतेराजे नवे आले उदयी ,_
_प्रजा गायी लोकशाहीची विराणी..७_
क्रांतिकारकांच्या त्यागाने, बलिदानाने मिळालेले प्रजासत्ताक म्हणजे स्वैराचार नाही. लोकशाही म्हणजे फक्त आकड्यांचा खेळ नव्हे. जेव्हा सत्ताधारी, विरोधी असे विभाजन होते,तेव्हा सत्ता प्राप्ती साठी रस्सीखेच अविरत सुरु राहते. त्यावेळी सर्व विसरतात सारी निवडणुकीतील आश्वासन, समाजकारणही बाजूला पडते , सुरु होते फक्त्त सत्ताकारण. मग एकमेकांचे सर्व पक्ष खच्चीकरण करण्यात गुंतले असतात. लोक आणि त्यांच्या समस्याही बाजूला रहातात.
अनेक कोटींचे घोटाळे करून, न्यायालयात शिक्षा घेऊन,समर्थक ,त्या नेत्याचे सुटकेची दिवाळी मनवतात. घरोघरी पेढे वाटले ढोलताशात जल्लोष होतो, सुवासिनी दारोदारी तिलक लावून ओवाळतात आणि तो अजून मोठे घोटाळे करण्यासाठी निवडून येतो,आणि म्हणतो, “लोकांच्या न्यायालयात न्याय मिळाला, फारच विदारक चित्र आहे, भारतीय लोकशाहीचे!”
विसरलोआपण तत्व आणि सारे विचार सर्व काही! निवडणुकीत बरोबर मत मागून, एकत्र लढून जिंकल्यावर कुण्या दुसऱ्याबरोबर संसार मांडून खुशाल सत्तेचे गणित मांडले जाते.
ना आम्हास कोणते सोयरेसुतक, नाही लज्जा, लोकमतांचा, भावनांचा मात्र उडवतो फज्जा!!
कोण आता बरोबर राहील किंवा कोणा संगे जाईल? याची साक्षात ईश्वरही आता ग्वाही देऊ शकणार नाही.कोणास झाकावे नी कोणास काढावे? हा सुद्धा प्रश्नच आहे.
राजकारण,फक्त आणि फक्त तडजोड नव्हे.नेते म्हणतात, “राजकारणात ना मित्र ना शत्रू!”
असे म्हणून, ते काहीही गोंधळ घालू शकतात.खरंतर, मित्रता किंवा शत्रूत्वता ठरवणारी
राजकारण म्हणजे वैयक्तिक बाब कदापी नव्हे किंवा वारसाने मिळणारी वांशिक, राज्यसत्ताही नव्हे .
असं म्हणता, “Every thing is fair in love and war!””
पण राजकारण, ना युद्ध आहे ना आंधळं पुत्रप्रेम राजकारणात., शिस्त आणि तारतम्य नक्की हवेचं..राजकारण आहे, सहकार..मैत्रीचे फक्त समाजकारण! स्वतः ला विसरून, निस्वार्थीपणे सर्व समाज उन्नत्ती साठी, सर्वांनी प्रामाणिकपणे केलेला सामूहिक प्रयत्न!!
आज सर्व नेमके हेच विसरले आहेत..त्याचीच ही आजच्या प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारीला पुन्हा एकदा *आठवण!!*
सध्या राजकारण सत्ताकारण झाले असले तरी यात आपण सर्व बदल घडवू शकतो. वाईट वृत्तीला निवडणुकीत घरचा रस्ता दाखवायला पाहिजे मग तो कोणत्याही पक्षाचा उमेदवार असो. फक्त्त तीव्र इच्छा शक्तीची गरज आहे. हा आशावाद माझ्या सकट आपल्या सर्वांच्या मनात आहे.
तीच “मनिषा” या रचनेत लिहून थांबतो.
_*ll मनिषा ll*_
_चंद्र सूर्य नभात जो वरी_
_सदैव सत्ता राहो प्रजेची.._
_देशप्रेमाची ती ओथंबलेली,_
_मनामनात सर्वत्र लाट दिसें..१_
_नाही कुणी हो सत्ताधारी,_
_नसेल कुणी असे विरोधी.._
_समाजाच्या उन्नत्ती साठी_
_ध्यास फक्त मनी असे..२_
_नसेल महत्व कुणी पदाला,_
_सर्व जपतसे लोकहिताला.._
_उमेदवारही तो जिंकणारा_,
_हरणाऱ्याचा खरा मित्र बने ..३_
_प्रत्येक कामास लाभे प्रतिष्ठा,_
_सरली जावो सारी विषमता.._
_सुखदायी दिन येवो सर्वांना,_
_जे वांछील ते सर्वकाही मिळे..४_
_बलसागर देश इच्छा आमुची_,
_खाण त्यात आहे बुद्धिवंतांची.._
_कोण कशाला जाई परदेशीं,_
_स्वर्ग भुतली इथेच असे ..५_
_संस्कृतीचा आम्हा वारसा_
_जपा अनमोल त्या परंपरा_
_अनुकरण्या सर्व जगताला_
_दिपस्तंभ आमुचे राष्ट्र असे..६_
_मुल्ये आदर्श मानवतेची .._
_सदा जपा हो या देशाची,_
_नेतृत्व जगाचे करेल भारत_
_तो दिन आता दूर नसे ..७_
_राहा सर्व गुण्या गोविंदे_,
_सोडा सर्व ते भांडण तंटे.._
_हद्दपार जात करा हो,_
_*राष्ट्रधर्म एकच “भारतीय” असे..*_
_*फक्त सर्व “भारतीय ” असे..८*_
“मिले सुर मेरा तुम्हारा
तो सुर बने हमारा
सुर की नदिया हर दिशा से
बह के सागर में मिले
बादलों का रूप ले कर
बरसे हल्के हल्के
मिले सुर मेरा तुम्हारा
तो सुर बने हमारा
मिले सुर मेरा तुम्हारा!!”
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
✍️हेमंत नाईक
२६. ०१. २०२६
#सुरपाखरू#३०दिवसात ३०#, प्रयोग२०२६