Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

लेक टोपो हॉलिडे रिसॉर्ट कॅम्पिंग.. १

हेमंत नाईक जानेवारी 27, 2026
CTJ6610220009154290438.jpg

.

*लेक टोपो*

*हॉलिडे रिसॉर्ट कॅम्पिंग.. १!!* ..
२७. ०१. २०२५
हेमंत नाईक
लहानपणी स्काऊटचे कॅपिंग केले होते नंतर पन्नास वर्षानी योग आला आणि तोही नयनरम्य लेक टोपोच्या हॉलिडे रिसॉर्ट न्यूझीलंड येथे!!
आम्ही तब्बल अठराजण  होतो.
सौरभ, आणि त्याचे मित्र येथील फ्लेचर यास सर्वात मोठ्या सिव्हील कंपनीत कार्यरत असलेला श्रीनिवास,  फार्मसीत ओटागो इथे PHD केलेला डॉ.मंगेश हे देखील  कुटुंबासोबत असल्याने विशेष मजा आली.सोबत नावाप्रमाणे आनंदी असलेला MS Structure असलेला श्रीनिवासचा मामेभाऊ हर्ष होता.
या वेळी सौरभने दोन गाड्या घेतल्याने मला ऑकलंड टू टोपो सिनिक वळणदार रस्ता ड्राइव्ह करायला मिळाला.११० चा स्पीड चक्क वळणावर देखील मेंटेन रहात होता. मंगेशची निसान मी चालवत होतो..या गाडीत मी स्वाती आणि इथं पुढे शिकण्यासाठी आमचे शेंडेफळ डॉ. प्राजक्ता होती. 
संपूर्ण रस्त्यात कुठेही एक देखील खड्डा नव्हता! कारण इथे  रस्ते खरोखरचे इंजिनिअर्स बांधतात.. 
आपल्या ईथे राजकीय वरदहस्त असलेले राजकीय ठेकेदार मंडळी ही कामे करतात तशी मंडळी इथे नाही..वाढीव आयटम.. वाढीव एस्टीमेट.. वाढीव वेळ  इथं नाही!  अलीकडेच ऑकलँडला पाकूरंगा येथे एस्टीमेटपेक्षा कमी खर्चात आणि सहा महिने आधी फ्लाय ओव्हर पूर्ण केल्याची बातमी वाचली.
आता लागून सुट्या असल्याने भरपूर ट्रॅफिक असला तरी सुमारे तीनशे किमी अंतर अवघ्या  तीन तासात पोहचलो.
हॉलिडे कॅम्प मध्ये बंगले, व्हीला, केबीन्स, आणि तंबू उभारण्याचे पर्याय उपलब्ध होते.एक वेगळा अनुभव  म्हणून टेन्टचा ऑप्शनआम्ही निवडला होता.. प्रत्येकाने आपापला टेन्ट गाडीत आणला होता.
साधारणत: ४० x४० ची हिरवळ असलेला प्लॉट  आणि सोबत सेल्फ कंटेंड टॉयलेट, पॉवर कनेक्शन आणि असलेला..त्याच्या फोटो सोबत देत आहे.
टेन्ट म्हणजे दोन बेड आणि बैठक असे अर्ध्यातासात उभे होणारे सुमारे  पाचशे फुटाचे एक छोटे घरचं !! अगदी मिनी कूलर हिटर लाईंट स्ट्रोलर  फोल्डिंग चेअर्स टेबल्स अशी सर्व साहित्यही  टेन्ट कंपिंगसाठी बरोबर घेऊन येतात. मुलांना खेळण्यासाठी अनेक प्ले पार्क आणि सर्वांनाच मनोसोक्त डुंबण्यासाठी.. मधोमध बार कॉउंटर असलेला गरम पाण्याचा स्विमिन्गपुल हे इथले आकर्षण.
चि कबीर चि कियान पुलच्या बाहेर येण्यास सहजासहजी तयार नसतं त्यामुळे चक्क तिन्ही दिवस तीन तास पुल मध्ये मनोसोक्त डुंबलो.. थोडा पोहलोही.. पण पोहणारे कमीच होते सर्व आपापल्या कुटुंबाबरोबर मजा करत होते.
तीन दिवसात ब्रेकफास्ट पासून डिनर पर्यंत काय खाणे करायचे याचे सुंदर प्लँनिंग महिला वर्गाने केले होते.. तशी जय्यत तयारी त्यांनी आधीपासून केली होती… अशा ठिकाणी एकत्र स्वयंपाक करून गप्पा मारत निसर्ग सौदर्याचा आस्वाद घेणे हा खूप दुर्मिळ योग होता.. इंडियन सुपर शॉपमधून आणलेले गुजराती ठेपले अप्रतिम होते.रात्री गप्पा आणि मग चि. मीरा अन चि कियानने कंडक्ट केलेली हाऊजी!!
वृषालीच्या हाताचा थंडीतला सकाळचा फक्कड अमृततुल्य चहास,  हल्ली चहा न घेणारे, मी व सौं. स्वाती नाही म्हणू शकलो नाही.
आर्यन कबीरची जोडी.. मीरा माही आणि कियान चे त्रिकुट त्यांच्या खेळात मग्न होते.. इथेच शिकलेला  आर्यनचे इंग्लिश  आणि मराठी दोन्हीही ऐकताना मजा येत होती.. अडीच वर्षाचा टिल्लू कबीर पण मोठ्या स्पष्ट आवाजात  येस..नों.. म्हणून आपलेa मत प्रदर्शीत करत दादागिरी करत होता.त्याचे बोबडे इंग्लिश हळूहळू आम्हाला कळायला लागले होते. चि.मीराने टिचरच्या भूमिकेत जाऊन कियान आणि  माही कडून गणिताचा पेपर सोडवून घेतला..
असे तीन कुटुंबाचे एकत्र कॅम्पिंग मी प्रथमच अनुभवत होतो. उद्या आम्ही टोपोचे साईट सीईन्ग करणार आहे.
क्रमश:
हेमंत नाईक
२७. ०१. २६
#सुरपाखरू#३० दिवसात३०#प्रयोग२०२६
Yahoo Mail: Search, organise, conquer

लेखक

  • हेमंत नाईक

    COEP१९८४ चा विद्यार्थी, पेशाने स्थापत्य इंजिनीअर असल्याने घराची सुंदर रचना करताकरता वयाची साठी गाठल्यावर नकळत शब्दांचीही रचना करू लागलो.मित्राच्या प्रोत्साहनाने अशाच एका लिहिण्याची कलेची पर्यटनांची संस्कृती जोपासणाऱ्या मंचावर लिहिण्यास सुरुवात केली.. प्रथम वावर हा :+1::rose::ok_hand::grinning_face_with_smiling_eyes: असा सांकेतिक चिन्हातच होता. मग एखादा शब्द मग आख्खी ओळ पुढे चारोळी मग एखादी कविता पोस्ट करता करता लेखा पर्यंत पोहचलो.या दोन वर्षात निवांत वेळ मिळाल्याने बरंच काही लिहीलं गेलं…

    माझा लेखन प्रवास:

    १. “उरल्या त्या आठवणी…” ही अकरा लेखांची लेखमाला मित्रांच्या मंचावर लिहिली. त्यात आमच्या गल्लीतील बंद पडलेल्या गणेशोत्सवाबद्दल लिहीले होते. कधी काळी जितेंद्र अभिषेकी, अरुण दाते, श्रीधर फडके, आशा खाडिलकर, जयवंत कुलकर्णी, अजित कडकडे, द.मा. मिरसदार, प्रभाकर कारेकर व. पू काळे, अशा अनेक दिग्गज कलाकाराच्या उपस्थितीने त्यांच्या गायनाने, कथाकथनाने आणि मुख्य म्हणजे दिवसभराच्या सहवासाने मला झालेला आनंदानुभव लिहिला होता.

    २. "काहीही!"ही एकवीस ललीत लेखनाची लेखमाला.

    ३. “COEP चे सहजीवन” हा माझ्या अभियात्रिकी महाविदयालयीन आयुष्यच्या सोनेरी स्मृतिचा स्मृतिगंध… मित्रांना खूप आवडला.

    ४. मित्र मैत्रिणीवर तयाच्या वाढदिवशी केलेल्या, आणि इतर प्रासंगिक कविता आणि लेख.

    ५. न्यूझीलंड डायरी हे मित्रांच्या आग्रहाने मार्च २०२४ ते मे २०२५ दरम्यान मित्राच्या मंचावर लिहिलेले न्यूझीलंडचे प्रवासवर्णन सध्या मायबोलीवर पोस्ट करत आहे.

    ६. २०२६च्या नववर्ष दिनापासून मी एक “सुरपाखरू” होऊन त्यांच्या “३० दिवसात ३० प्रयोग २०२६” या थव्यामधे दाखल हौवून लिहिण्याचा आणि वाचनाचा आनंद लुटतो आहे

Tags: सुरपाखरू ३०दिवसात३० प्रयोग२०२६

Continue Reading

Previous: मराठी छापील मिडीया जात्यात मराठी इलेक्ट्रॉनिक मिडीया सुपात.
Next: लेक टोपोचे हॉलिडे कॅम्पिंग..२
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

WhatsApp-Image-2026-02-28-at-17.59.33.jpeg
  • ललित

“पुस्तक वाचणारा माणूस कमी का होत चाललाय?”

वर्षा पतके थोटे मार्च 2, 2026
Gemini_Generated_Image_hgaprihgaprihgap
  • ललित

धांदरटपणा की कामाचा ताण 

वंदना लोखंडे फेब्रुवारी 27, 2026
1000544594.jpg
  • ललित

पसारा

अपर्णा शेंबेकर फेब्रुवारी 25, 2026

ताजे लेख

  • “पुस्तक वाचणारा माणूस कमी का होत चाललाय?”
  • धांदरटपणा की कामाचा ताण 
  • पसारा
  • *प्रस्थान*
  • लाईक्सच्या युगात आत्ममूल्य कुठे हरवतंय?

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

WhatsApp-Image-2026-02-28-at-17.59.33.jpeg
  • ललित

“पुस्तक वाचणारा माणूस कमी का होत चाललाय?”

वर्षा पतके थोटे मार्च 2, 2026
Gemini_Generated_Image_hgaprihgaprihgap
  • ललित

धांदरटपणा की कामाचा ताण 

वंदना लोखंडे फेब्रुवारी 27, 2026
1000544594.jpg
  • ललित

पसारा

अपर्णा शेंबेकर फेब्रुवारी 25, 2026
54E7974C-2C73-4DFF-A984-DD6DA199BD13.jpeg
  • ललित

*प्रस्थान*

सुषमा ठाकूर फेब्रुवारी 24, 2026
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.