Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

लेक टोपोचे हॉलिडे कॅम्पिंग..२

हेमंत नाईक जानेवारी 28, 2026 1 minute read
0
gumohor-water

*लेक टोपोचे हॉलिडे कॅम्पिंग..२*
२८. ०१. २०२६
हेमंत नाईक
दोन दिवस कॅम्प साईटवर धमाल केल्यावर आज मात्र आमचा जवळपास असलेली प्रेक्षणीय स्थळ पाहण्याचे नियोजन होते.
ज्या लेख वरून या गावाचे नाव टोपो पडले त्या समुद्रासम तळ्यास  भेट  देण्यासाठी निघालो.
मोटार बोट, कयाकिंग, सेलबोट, स्टीमबोट असे अनेक बोटिंगचे पर्याय इथे आहेत. टोपो लेकला यावेळी आम्ही Dough Boating हा पर्याय निवडला . ६२३ चौ किमी क्षेत्रात सुमारे १६० मी खोल ज्वालामुखीच्या caledara मध्ये समुद्रासम असलेल्या या अजस्त्र लेक मध्ये या गुलाबी रंगाच्या वर्तुळाकार  बोटीच्या मधोमध ब्रेकफास्ट इत्यादीसाठी ..  राऊंड टेबलं सभोंवती सहा जणांची बैठक व्यवस्था सोबत वर पांढऱ्या कापडाने झाकलेले छत.. सोबत स्पीकर.. रात्रीसाठी एल इ डी लायटिंग..बॅटरी ऑपेरेटेड सुकाणु आणि ती बोट स्वतः ड्राइव्ह करत एकमेकाशी गप्पा मारत या निळ्याशार  लेक मध्ये दोन तीन तासाची राईड करण्याची मजा काही औरच होती.. किवी मंडळी  तर हो बोट दूरवर नेवून खोल तळ्याच्या थंडगार पाण्यात स्विमिन्गचा आनंदही लुटतात. कोणत्या मार्गाने फिरायचे हा नकाशा मोबाईल वर होता तुम्ही चुकले तर  gmap द्वारे त्या रूट वर यायचे होते. मला COEP च्या बोटक्लबच्या पंट बोटिंगची आठवण झाली.
आम्ही तीन बोटी घेतल्या होत्या..येतांना सौरभच्या बोटीच्या बॅटरीला प्रॉब्लेम आला त्यावेळी ती नांगर टाकून स्थिर ठेवावीं लागते नाहीतर छताला कापड असल्याने वाऱ्याच्या वेगाने ते भरकटते..सौरभने लागलीच नांगर टाकून बोगस स्थिर केली. बोट ऑपेरेटरला फोन केला. त्या ऑपेरेटरने  स्पीडबोटने येऊन  लागलीच बॅटरी बदलवून दिली..पण तो काही मिनिटाचा काळ टेन्शन देऊन गेला.
या तळयांतल्या पाण्यातूनच आकाशात झेपावणारे व आकाशात भरारी मारल्यावर परत तिथे उतरणाऱ्या विमानात भ्रमंती करण्याची सोय उपलब्ध आहे.
“रुपेहू” या बर्फच्या माउंटनचे (ऍक्टिव्ह क्रेटरचे) सुंदर बॅकग्राउंड असलेल्या टोपो लेक हे चित्र मेदूत साठवून ठेवतो आहे. खूपच अप्रतिम आहे ते! टोपोचा जन्माचा इतिहास खाली देत आहे. 
टोपो सरोवर मानवनिर्मित नाही; हे एक नैसर्गिक सरोवर आहे जे एका सक्रिय ज्वालामुखीच्या कॅल्डेरा (खूप काळ झालेल्या अतिरेकी उद्रेकामुळे   मुळे कोसळलेले ज्वालामुखीचे क्रेटरला  caledera म्हणतात.) मध्ये झीप काळ मोठ्या प्रमाणात ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर तयार झाले आहे, सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुमारे २७,००० वर्षांपूर्वी ओरुआनुई नावाने ओळखला जाणारा ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता, ज्यामुळे हे पाण्याने भरलेले एक मोठे अवाढव्य निळेशार पिण्यायोग्य पाण्याचे लेक निर्माण झाले. यात चक्क समुद्रासारख्या लाटा आम्ही अनुभवल्या.
असे दोन अडीच तासाचे साहसी बोटिंग  झाल्यावर    तळ्याकाठच्या ”  LOVE TOUPO ” या आयकॉनिक स्पॉट वर फोटो काढले आणि या सुंदर देखव्याचा आस्वाद घेत आम्ही सरोवराच्या काठच्या हॉटेलच्या टेरेसवर भोजनाचा आस्वाद घेतला.
इथं मॅकडोनाल्डने मोठया कल्पकतेने एका लढावू विमानाचे रेस्टॉरंट मध्ये रूपांतर केले आहे. मुलांसाठी तिथेही जाऊन आलो. पुन्हा एकदा लहान होऊन तळ्याकाठी असलेल्या लायन्स क्लबच्या गार्डन मध्ये छोटी टॉय ट्रेन नातवांबरोबर आम्हीही एन्जॉय केली.
तळे अथांग निळे 
जणू एक सागर असे..
हिरवे रंग बाजूला 
मऊशार हिरवळ दिसें.. 
लाटा इथे उसळल्या
समुद्रात त्या जशा 
बोट हेलकावे घेता
जीव जाई टांगणीला..
गोलाकार बोट होती
टेबल मधोमध गोल..
सभोंवती बसलो गोल
रंगला गप्पांचा डाव..
ज्वालामुखीचा स्फोट मोठा
लाव्हा खूप तो वाहिला..
पूर्वी याच तळ्यात होती
धगधगती तप्त ज्वाला..
बदल  धरेवरही जाहला
टोपोचा इतिहास सांगतो..
“परिवर्तन हेच जीवन..”
लिहून आज मी थांबतो..
क्रमश:
✍️हेमंत नाईक 
२८. ०१. २०२६
 #सुरपाखरू#३०दिवसात ३०#प्रयोग२०२६
Yahoo Mail: Search, organise, conquer

लेखक

  • हेमंत नाईक

    COEP१९८४ चा विद्यार्थी, पेशाने स्थापत्य इंजिनीअर असल्याने घराची सुंदर रचना करताकरता वयाची साठी गाठल्यावर नकळत शब्दांचीही रचना करू लागलो.मित्राच्या प्रोत्साहनाने अशाच एका लिहिण्याची कलेची पर्यटनांची संस्कृती जोपासणाऱ्या मंचावर लिहिण्यास सुरुवात केली.. प्रथम वावर हा :+1::rose::ok_hand::grinning_face_with_smiling_eyes: असा सांकेतिक चिन्हातच होता. मग एखादा शब्द मग आख्खी ओळ पुढे चारोळी मग एखादी कविता पोस्ट करता करता लेखा पर्यंत पोहचलो.या दोन वर्षात निवांत वेळ मिळाल्याने बरंच काही लिहीलं गेलं…

    माझा लेखन प्रवास:

    १. “उरल्या त्या आठवणी…” ही अकरा लेखांची लेखमाला मित्रांच्या मंचावर लिहिली. त्यात आमच्या गल्लीतील बंद पडलेल्या गणेशोत्सवाबद्दल लिहीले होते. कधी काळी जितेंद्र अभिषेकी, अरुण दाते, श्रीधर फडके, आशा खाडिलकर, जयवंत कुलकर्णी, अजित कडकडे, द.मा. मिरसदार, प्रभाकर कारेकर व. पू काळे, अशा अनेक दिग्गज कलाकाराच्या उपस्थितीने त्यांच्या गायनाने, कथाकथनाने आणि मुख्य म्हणजे दिवसभराच्या सहवासाने मला झालेला आनंदानुभव लिहिला होता.

    २. "काहीही!"ही एकवीस ललीत लेखनाची लेखमाला.

    ३. “COEP चे सहजीवन” हा माझ्या अभियात्रिकी महाविदयालयीन आयुष्यच्या सोनेरी स्मृतिचा स्मृतिगंध… मित्रांना खूप आवडला.

    ४. मित्र मैत्रिणीवर तयाच्या वाढदिवशी केलेल्या, आणि इतर प्रासंगिक कविता आणि लेख.

    ५. न्यूझीलंड डायरी हे मित्रांच्या आग्रहाने मार्च २०२४ ते मे २०२५ दरम्यान मित्राच्या मंचावर लिहिलेले न्यूझीलंडचे प्रवासवर्णन सध्या मायबोलीवर पोस्ट करत आहे.

    ६. २०२६च्या नववर्ष दिनापासून मी एक “सुरपाखरू” होऊन त्यांच्या “३० दिवसात ३० प्रयोग २०२६” या थव्यामधे दाखल हौवून लिहिण्याचा आणि वाचनाचा आनंद लुटतो आहे

Post navigation

Previous: लेक टोपो हॉलिडे रिसॉर्ट कॅम्पिंग.. १
Next: लेक टोपोचे हॉलिडे कॅम्पिंग.. ३
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

gumohor-water
  • ललित

आत्मबल – कवि वि.दा.सावरकर

ऐश्वर्या डगांवकर मे 28, 2026 0
gumohor-water
  • ललित

साप्ताहिक लेखन

ऐश्वर्या डगांवकर मे 21, 2026 0
WhatsApp-Image-2026-05-18-at-5.38.42-PM.jpeg
  • ललित

माणूस बदलतो की फक्त त्याचे मुखवटे बदलतात?

वर्षा पतके थोटे मे 18, 2026 0

ताजे लेख

  • आत्मबल – कवि वि.दा.सावरकर
  • साप्ताहिक लेखन
  • माणूस बदलतो की फक्त त्याचे मुखवटे बदलतात?
  • खिडकीतले आकाश
  • श्रावणबाळ!

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

gumohor-water
  • ललित

आत्मबल – कवि वि.दा.सावरकर

ऐश्वर्या डगांवकर मे 28, 2026 0
gumohor-water
  • ललित

साप्ताहिक लेखन

ऐश्वर्या डगांवकर मे 21, 2026 0
WhatsApp-Image-2026-05-18-at-5.38.42-PM.jpeg
  • ललित

माणूस बदलतो की फक्त त्याचे मुखवटे बदलतात?

वर्षा पतके थोटे मे 18, 2026 0
gumohor-water
  • ललित

खिडकीतले आकाश

ऐश्वर्या डगांवकर मे 14, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.