Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

लेक टोपोचे हॉलिडे कॅम्पिंग.. ३

हेमंत नाईक जानेवारी 29, 2026 1 minute read
0
CTJ3323888940844692500.jpg
लेक टोपोचे हॉलिडे कॅम्पिंग.. ३
२९. ०१. २०२६
हेमंत नाईक
‘बंजी जंपिंग” हा एक साहसी खेळ आहे ज्यामध्ये उंच इमारतीवरून (पूल, क्रेन, कड्यावर) फ्री-फॉल उडी मारली जाते, जी घोट्याला किंवा हार्नेसला जोडलेल्या लांब, लवचिक दोरीने जोडलेली असते. दोरी ऊर्जा शोषण्यासाठी ताणली जाते, ज्यामुळे जंपर वर आणि खाली  होतो. 
आज बंजीजांपिंग बद्दल लिहितो आहे. नदीत उंचावरून पुलावरून उडी मारून जीव दिलेले किस्से आपण आपल्याकडे ऐकलेआहेत . हाच नदीत उडी घेण्याचा प्रकार,  साहसी खेळाची न्यूझीलंड या देशाने सुरुवात केली आहे.
पुलावरतून अशीच उडी मारून नदीच्या पाण्याला स्पर्श करायचा साहसी खेळाची जगात सुरुवात न्यूझीलंड मध्ये कवीन्सटाऊन येथे प्रथम सुरु झाली..
टोपोला वैकाटो नदीवर हा साहसी खेळ अनुभवता येतो.
हॉलिडे कॅम्पला येतांना टोपो तळ्यातून उगम पावलेल्या वाईकाटो नदीवरचे सुमारे दोनशे फुट उंचीचे बंजीजंम्प स्पॉट पाहिला.पण ते करण्याची हिम्मत झाली नाही यात दोरीला दोन्ही पाय बांधून उंचावरून नदीच्या पात्रात तुम्ही उडी मारतात. खाली डोके बार पाय अशी स्थिती असते.नदीच्या पाण्याला स्पर्श होतो.मग तुम्हाला वर ओढले जाते.एका जॅम्प साठी ३०० NZD म्हणजे सुमारे १५००० रुपये आकारले जातात.  या लोकेशनचा सिनिक फोटो सोबत जोडत आहे.
टोपो तळ्यातून उगम पावलेल्या वैकाटो नदीकाठी सुंदर वॉक वे आहे तों हिरव्या डोंगरावरून वळणदार पाऊल वाटेने पुढे खाली उतरून आल्यावर नदीच्या किनाऱ्यावर नदीची साथ घेत ती मंजुळ खळखळ ऐकत सुंदर निसर्गाच्या सानिध्यात पक्षांच्या किलबिलीत थंड हवेत आपण कितीही चाललो तरी जाणवत नाही. चालत चालत आम्ही पुढे टोपो तळयांतून उगम पावलेल्या वैकटो नदीवरचा हुका फॉल  या धबधब्या पर्यत पोहचलो.
हुका ( फोम) हे माउरी नाव पाण्याचा पांढरा शुभ्र फेस होत असल्याने हे नाव आहे.) बघून आम्ही परत हॉलिडे कॅम्पिंगला परतलो. येथे अतिशय वेगवान अशा जेट बोट्स राईड्स तुम्ही अनुभवू शकतात. 
हे दोन्ही स्पॉट.. इथले मस्ट स्पॉट आहेत.
“_चार दिवस कॅम्पिंग मध्ये बरोबर परत येतांना या सुंदर सुखद अविस्मरणीय स्मृती आमच्या ओंजळीत होत्या.. अप्रतिम निसर्ग चित्रे मनावर कोरली गेली असतांना  आम्हाला स्पष्ट दिसत होती  सौरभ   श्रीनिवास आणि मंगेश  मित्रांची घट्ट  मैत्री.._”
*त्यांच्या मैत्रीला सलाम त्यांना सर्वांना सुयश चिंतून आजच लिहिणं थांबावतो..*
सोबत मैत्रीचे जीवनातील महत्व सांगणारी आमच्या COEP च्या गेट टुगेदरसाठी वाचलेली मी लिहिलेली कविता आठवली.
*मैत्री….*
_मैत्रीची मोठी गंम्मत असतें,_
_थॅन्क यु..सॉरी त्यात नसते._.
_नसतो कोणता कसला शिष्टाचार,`
_प्रेम दाखवे शिव्याचा भडीमार.._ 
 
_कितीही मोठा झाला तरी,_
_बालपणीचाच अंड्या असतो.._
_करी हाक कानी पडता ,_
_मागे उभा मित्र तो असतो.._
_मैत्रीत नाही स्पर्धा कुठली,_
_नाही कोणतेही हेवे दावे.._
_सुखदुःख, नी यशापयश,_
_एकमेकांचे असतें सारे.._
_मैत्रीत सर्व असे सारखे,_
_नाही कोणी राजा वा रंक.._ 
_उत्तम उदाहरणं आहे याचे,_
_सुदाम्याचे पाय धुतो कृष्ण.._
_गुपित जीवनामधले आपल्या,_ 
_फक्त मित्रा ठाऊक असे .._
_तो पण सांगे ते न कुणास,_
_जीवनाचाच जणू भाग असे .._
_मिळता धन, विद्या,मानमरातब,_
_लौकिकार्थी  संपन्न तुम्ही.._
_मित्र नसता जेव्हा तुम्हा,_
_तुम्हापेक्षा गरीब नाही कुणी_ ..
_मित्र जेव्हा सोडून जातो,_
_काळजाचाच तुकडा पडतो._.
_आठवणीच उरतात तेव्हा,_
_मैत्रीची सदैव स्मरते गाथा.._
_मैत्रीच्या या अतूट नात्याची,_
_कशी लिहावी तिची थोरवी.._
_शब्द सामर्थ्य कमी पडतंसे,_
_थांबली हेमंताची लेखणी.._
… ✍️हेमंत नाईक
२९. ०१.२०२६
#सुरपाखरू#३०दिवसात ३०#प्रयोग२०२६
Yahoo Mail: Search, organise, conquer

लेखक

  • हेमंत नाईक

    COEP१९८४ चा विद्यार्थी, पेशाने स्थापत्य इंजिनीअर असल्याने घराची सुंदर रचना करताकरता वयाची साठी गाठल्यावर नकळत शब्दांचीही रचना करू लागलो.मित्राच्या प्रोत्साहनाने अशाच एका लिहिण्याची कलेची पर्यटनांची संस्कृती जोपासणाऱ्या मंचावर लिहिण्यास सुरुवात केली.. प्रथम वावर हा :+1::rose::ok_hand::grinning_face_with_smiling_eyes: असा सांकेतिक चिन्हातच होता. मग एखादा शब्द मग आख्खी ओळ पुढे चारोळी मग एखादी कविता पोस्ट करता करता लेखा पर्यंत पोहचलो.या दोन वर्षात निवांत वेळ मिळाल्याने बरंच काही लिहीलं गेलं…

    माझा लेखन प्रवास:

    १. “उरल्या त्या आठवणी…” ही अकरा लेखांची लेखमाला मित्रांच्या मंचावर लिहिली. त्यात आमच्या गल्लीतील बंद पडलेल्या गणेशोत्सवाबद्दल लिहीले होते. कधी काळी जितेंद्र अभिषेकी, अरुण दाते, श्रीधर फडके, आशा खाडिलकर, जयवंत कुलकर्णी, अजित कडकडे, द.मा. मिरसदार, प्रभाकर कारेकर व. पू काळे, अशा अनेक दिग्गज कलाकाराच्या उपस्थितीने त्यांच्या गायनाने, कथाकथनाने आणि मुख्य म्हणजे दिवसभराच्या सहवासाने मला झालेला आनंदानुभव लिहिला होता.

    २. "काहीही!"ही एकवीस ललीत लेखनाची लेखमाला.

    ३. “COEP चे सहजीवन” हा माझ्या अभियात्रिकी महाविदयालयीन आयुष्यच्या सोनेरी स्मृतिचा स्मृतिगंध… मित्रांना खूप आवडला.

    ४. मित्र मैत्रिणीवर तयाच्या वाढदिवशी केलेल्या, आणि इतर प्रासंगिक कविता आणि लेख.

    ५. न्यूझीलंड डायरी हे मित्रांच्या आग्रहाने मार्च २०२४ ते मे २०२५ दरम्यान मित्राच्या मंचावर लिहिलेले न्यूझीलंडचे प्रवासवर्णन सध्या मायबोलीवर पोस्ट करत आहे.

    ६. २०२६च्या नववर्ष दिनापासून मी एक “सुरपाखरू” होऊन त्यांच्या “३० दिवसात ३० प्रयोग २०२६” या थव्यामधे दाखल हौवून लिहिण्याचा आणि वाचनाचा आनंद लुटतो आहे

Post navigation

Previous: लेक टोपोचे हॉलिडे कॅम्पिंग..२
Next: लेखन सोहळ्याची “सांगता!!”
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

gumohor-water
  • ललित

आत्मबल – कवि वि.दा.सावरकर

ऐश्वर्या डगांवकर मे 28, 2026 0
gumohor-water
  • ललित

साप्ताहिक लेखन

ऐश्वर्या डगांवकर मे 21, 2026 0
WhatsApp-Image-2026-05-18-at-5.38.42-PM.jpeg
  • ललित

माणूस बदलतो की फक्त त्याचे मुखवटे बदलतात?

वर्षा पतके थोटे मे 18, 2026 0

ताजे लेख

  • आत्मबल – कवि वि.दा.सावरकर
  • साप्ताहिक लेखन
  • माणूस बदलतो की फक्त त्याचे मुखवटे बदलतात?
  • खिडकीतले आकाश
  • श्रावणबाळ!

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

gumohor-water
  • ललित

आत्मबल – कवि वि.दा.सावरकर

ऐश्वर्या डगांवकर मे 28, 2026 0
gumohor-water
  • ललित

साप्ताहिक लेखन

ऐश्वर्या डगांवकर मे 21, 2026 0
WhatsApp-Image-2026-05-18-at-5.38.42-PM.jpeg
  • ललित

माणूस बदलतो की फक्त त्याचे मुखवटे बदलतात?

वर्षा पतके थोटे मे 18, 2026 0
gumohor-water
  • ललित

खिडकीतले आकाश

ऐश्वर्या डगांवकर मे 14, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.