Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

अर्धा तास

अपर्णा शेंबेकर मार्च 31, 2026
0
gumohor-water
भाग चौथा
रिक्षात बसलेल्या सानिकाच्या मनात विचारांचे काहूर माजले होते.तिला त्या पुस्तकाचे गूढ काही केल्या उमजत नव्हते.
पुस्तक कोणते ?
मला का दिसले?
मग अचानक कपाटातून नाहीसे झाले…
दुसऱ्या दिवशी माझ्या टेबलवर दिसले….
तो आशिषचा वाटलेला फोन…आशिषचा फोन न केल्याचा खुलासा….
हे काय सुरू आहे…काय करावे आता…
रिक्षा थांबला.ती खाली उतरली.समोर काही पावले चालत गेली.तिला आठवले…रिक्षाचे पैसे द्यायचे राहिले…ती मागे वळली.रिक्षा निघून गेला होता.
ती परत फिरली.समोर चालत गेली.नजर वर गेली तर जिथे ती आली ते वेगळेच घर होते.आपण इथे का आलो?
तिला काहीच कळेना.
ती भारल्यागत आत गेली.आत थोडा उजेड बाकी अंधार होता.नीट ठेवलेले साधे घर.समोर सोफा.एक वाचनाचे मेज.लाकडी खुर्ची.मेजावर पाण्याचे तांब्या भांडे.एक चष्मा आणि एक पुस्तक व पेन.सानिका पुढ्यातल्या खुर्चीवर बसली.तिला खूप तहान लागली होती.तिने तांब्यातले पाणी भांड्यात ओतले. एका दमात तिने भांडभर पाणी पिले.थोडे बरे वाटले तिच्या जीवाला.तेवढ्यात आतल्या खोलीतून चपला घालून कोणीतरी चालत येत असल्याची चाहूल लागली.ती सावध झाली.तिला एक क्षणभर वाटले की तिथून वेगाने पळून जावे.पण दुसऱ्या क्षणी आता काय होईल ते होवो.बघूच.असे तिचे अंतर्मन म्हणाले.
….कधी कधी एखादा निर्णय घेताना त्यामागे कोणती प्रेरणा असते…आपल्यालाही कळत नाही.पण तो निर्णय अगदी पक्का असतो…इतका पक्का की तो आपल्यालाही बदलवता येत नाही…
असेच काहीसे सानिकाचे झाले.ती सावधपणे पण काहीश्या भीतीने आवाजाचा अंदाज घेत होती.दोनच क्षणात आतल्या खोलीतला पडदा हलला आणि एका व्यक्तीने बैठकीत प्रवेश केला.त्या व्यक्तीला बघून सानिका निःशब्द…!
क्रमश:….

लेखक

  • अपर्णा शेंबेकर

    अपर्णा शेंबेकर या नागपुरातील सोमलवार शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.

Post navigation

Previous: नोकरी की नातं? आधुनिक स्त्रीसमोरचा गुप्त संघर्ष
Next: सुरपाखरू(मानसिकता)जून २०२६
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

gumohor-water
  • ललित

आत्मबल – कवि वि.दा.सावरकर

ऐश्वर्या डगांवकर मे 28, 2026 0
gumohor-water
  • ललित

साप्ताहिक लेखन

ऐश्वर्या डगांवकर मे 21, 2026 0
WhatsApp-Image-2026-05-18-at-5.38.42-PM.jpeg
  • ललित

माणूस बदलतो की फक्त त्याचे मुखवटे बदलतात?

वर्षा पतके थोटे मे 18, 2026 0

ताजे लेख

  • आत्मबल – कवि वि.दा.सावरकर
  • साप्ताहिक लेखन
  • माणूस बदलतो की फक्त त्याचे मुखवटे बदलतात?
  • खिडकीतले आकाश
  • श्रावणबाळ!

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

gumohor-water
  • ललित

आत्मबल – कवि वि.दा.सावरकर

ऐश्वर्या डगांवकर मे 28, 2026 0
gumohor-water
  • ललित

साप्ताहिक लेखन

ऐश्वर्या डगांवकर मे 21, 2026 0
WhatsApp-Image-2026-05-18-at-5.38.42-PM.jpeg
  • ललित

माणूस बदलतो की फक्त त्याचे मुखवटे बदलतात?

वर्षा पतके थोटे मे 18, 2026 0
gumohor-water
  • ललित

खिडकीतले आकाश

ऐश्वर्या डगांवकर मे 14, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.