मॅच सुरु झाली. मेस्सी आणि वर्ल्ड कप चा भरपूर अनुभव असलेली अर्जेंटिनाची टीम आणि दक्षिण आफ्रिकेतल्या एका छोट्याश्या देशाची टीम समोरासमोर होते. सरळ सरळ एकतर्फी मॅच होईल असं दिसत होतं. हा कुठला देश आहे ? कधी ऐकलं नाही याबद्दल .. बरेचदा कुठल्याही वर्ल्ड कप च्या सुरुवातीचे सामने बघायचे रहातात. आपण सर्वोत्तम देशाचे चुरसपूर्ण सामने बघण्याला प्राधान्य देतो. किती सहज आपण काहीही माहिती नसताना पूर्वग्रहदुषीत असतो. म्हणजे छोटे देश , पहिल्यांदा वर्ल्ड कप खेळणारे .. त्यांच्या मॅचेस काय बघायच्या ?! असा आपला दृष्टिकोन असतो.
१९ वेळा फिफा वर्ल्ड कप खेळलेली अर्जेंटिना आणि अगदी पहिल्यांदा फिफा वर्ल्ड कप मध्ये क्वालिफाय झालेली केप वर्डे ची टीम ! त्यातून मेसीचा शेवटचा वर्ल्ड कप असल्याने या टीम चं आणि वर्ल्ड कप चं वजन आणखीनच वाढलेलं .. अशात मॅच सुरु झाली ..
केप वर्डे च्या एकाही टीम प्लेअर चं नाव तोपर्यंत माहीत नव्हतं. हळूहळू मॅच पुढे सरकायला लागली आणि लक्षात आलं केप व्हरडे ची टीम पूर्ण जिद्दीने आणि टीम स्पिरिट घेऊन मैदानात उतरली होती. मेसीचा प्रचंड रेकॉर्डचा इतिहास , अर्जेंटिनाची बलाढ्य आणि अनुभवी टीम या मुख्य दबाव आणणाऱ्या बाबींना केप व्हरडे टीम ड्रेसिंग रूममध्ये ठेऊन मैदानात उतरली होती हे हळूहळू स्पष्ट होत गेलं.
आता मॅच फक्त मॅच न रहाता एका खोल पातळीवर एकूण मानसशास्त्राचा विचार करायला लावणारा अनुभव बनून गेला. डिफेंडर खेळाडूंची सॉलिड फळी अर्जेंटिनाच्या आक्रमक खेळाडूंना जागोजागी अडवत होती. अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी गोलवर केलेले हल्ले , नेम यापासून गोल वाचवत होती. बॉल परतवत होती. डेरॉय डुआर्ते आणि सिडनी लोपिझ यांनी अर्जेन्टिनाच्या आत्मविश्वासाला आव्हान देणारे दोन गोल सामन्याच्या वेगवगेळ्या वेळी केले. सोबत व्हरडेअन डिफेंडर्सची जीवतोड खेळी सुरु होती . या सगळ्यात अतिशय जिकिरीची भूमिका बजावली ४० वर्षाचा व्हरडेन गोलकीपर वोझीन्हा म्हणजेच जोझिमार डियाश !!! फुटबॉल वर्ल्ड कप मध्ये एखाद्या देशाच्या पदार्पणाच्या वेळी सगळ्यात मोठ्या वयाचा गोलकिपर असण्याची नोंद वोझीन्हा च्या नावे झाली आहे. संपूर्ण मॅच मध्ये वोझीन्हाने गोल कडे आलेले ७ गोल वाचवले आणि किंग मेस्सी चे ४ आक्रमक हल्ले ब्लॉक केले. मॅच सुरु असताना संपूर्ण स्टेडियम वेडं झालं होतं. कोणीतरी मेस्सी द गोट ला यशस्वीपणे रोखलं होतं!! अर्जेंटिनाला सपोर्ट करणारे प्रेक्षक सुद्धा रडकुंडीला आले होते ..त्यांच्यासाठी ‘ सहज विजय होणार असं वाटून सुरु झालेली मॅच आता बहुतेक हरतो ‘ अशा दिशेने सुरु होती.
सगळ्यांचं लक्ष आता व्हरडे टीम च्या खेळण्याकडे जास्त आकर्षित होत होतं. वोझीन्हाने अडवलेल्या गोल मुळे जेतेपद सिद्ध करण्यासाठी टीम ना अधिक वेळ मिळाला होता. व्हरडे चे डिफेंडर जीव लावून अर्जेंटिना टीम ला अडवत होते.
शेवटी एकशे अकराव्या मिनिटाला मेस्सी ने मारलेल्या निर्णायक कॉर्नर किक वर अर्जेंटिना चा गोल झाला आणि त्यांचा मॅचमधला विजय पक्का झाला.
प्रतिस्पर्धी संघाची ताकद , वर्चस्व , जबरदस्त इतिहास , आणि मोठा अनुभव यांनी दबता मॅचच्या सुरुवातीपासून स्वतःचा नैसर्गिक खेळत व्हरडे टीम सगळ्यांची मनं जिकंत पुढे आली होती.
केप वर्डे हा दक्षिण अँफ्रिकेतल्या छोट्या देशांपैकी एक देश आहे. जेमतेम ५ लाख लोकसंख्या असलेला , नैसर्गिक साधनसंपत्तीचा तुटवडा असलेला हा देश
तीव्र पाणीटंचाई असल्यामुळे सतत पाण्यासाठी डिसॅलिनेश प्रकल्पांवर अवलंबून असतो हे शोधल्यावर कळलं. एखाद्या परिस्थितीवर मात करणं हे तुमच्या जिद्दीवर अवलंबून असतं तुमच्या पूर्व इतिहास किंवा पूर्वानुभवावर नाही .. हे व्हरडे टीम ने जगाला दाखवून दिलं. मेस्सी ने केलेल्या पहिल्या गोल नंतर खरं तर पहिल्यांदा फिफा खेळणाऱ्या व्हरडे टीम ने थोडं खचणं सहज शक्य होतं आणि त्या संभाव्य खचण्यानंतर व्हरडे टीम ला पुन्हा ताकदीने अर्जेन्टिनासमोर उभं रहाणं , आक्रमक होणं सोपं गेलं नसतं. पण मनाने कणखर असलेल्या आणि ट्रेन केलेली व्हरडे टीम लढत राहिली. मॅच च्या शेवटापर्यंत कमालीच्या जिद्दीने खेळत राहिली .
‘ अर्जेन्टिनाच जिंकणार ‘ इथपासून ‘ कोण जिंकलं हे महत्वाचं नाही’ असं वाटायला लावणाऱ्या क्षणापर्यंत मॅच नेऊन ठेवणाऱ्या व्हरडे टीमच्या विजयाला सलाम !!!
मेघा संजय देशपांडे
03/07/26
#सुरपाखारू#३०दिवसात३०#जुलै२०२६