Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

उधार उसनवार

सायली कराडे जुलै 13, 2026 1 minute read
0
199462.png
तुळशीच्या लग्नाच्या दिवशीची गोष्ट. पौर्णिमेला तुळशीचे लग्न लावायचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे आमच्या घरी आणि आणखीही ज्यांच्या घरी तुळशीचं लग्न लावायचं राहिलं होतं त्यांना पौर्णिमेचाच दिवस शिल्लक होता.
आमचे मंगलाष्टक व आरत्या संपून, प्रसाद वगैरे वाटून आम्ही निवांत होत नाही तोच दारात एक मुलगा येऊन म्हणाला, “ताई, अमूकतमूक काकूंनी बोर, भाजी आणि आवळा आहे का असं विचारलं”. मग काय, आम्ही सुद्धा कट्टर शेजारधर्मी बनून आमच्या शेजाऱ्यांचा हट्ट पुरवला. तसं त्यांचं घर आमच्यापेक्षा सुखवस्तू. त्यामुळे न राहवून मनात विचार आला, ‘लोक बोर, भाजी, आवळा जर शेजारी मागतात, तर पैसे नेमके कशासाठी कमावतात?’
या एका प्रसंगामुळे भूतकाळातले असेच काही गमतीशीर उधारीचे प्रसंग स्मृतीपटलावर तरळून गेले. एकदा उन्हाळ्यातल्या भर दुपारी एक काकू आल्या, म्हणाल्या – “माझ्या मुलाचा शाळेचा प्रकल्प करायचा आहे आणि त्याच्या बहिणीचा खोडरबरच सापडत नाहीय. तुझ्या बहिणीचा मागवून देतेस का? मी परत आणून देईन.” अर्थात इथेही आम्ही आमच्या कर्तव्याला जागलो आणि दिला बरं का खोडरबर. आता तो खोडरबर काही परत आला नाही ही गोष्ट निराळी. तसंही तो खोडरबर परत मागितल्यानं आमच्या शेजारधर्माला काळीमा फासल्यासारखं झालं असतं त्यामुळे ते राहूनच गेलं. याव्यतिरिक्तही आमच्या घरुन अख्ख्या वेटाळाला गोडलिंबाची पानं, दुर्वा, हरितालिकेच्या पत्री, आंब्याची पाने, श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी बेल, लिंबं, पुदिन्याची पानं असलं काय काय सतत पुरवल्या जातंच असतं.
असाच एक प्रसंग मी शिकत असतानाचा. बाहेरगावी भाड्याने खोली करुन राहायचं म्हणजे अगदी मोजकं सामान सोबत असतं. तेव्हा आमच्या घरमालक काकूंनी आमच्या शेजारच्या खोलीत राहणाऱ्या मुलीकडे श्रावणातली शिवमूठ वाहण्यासाठी ‘तीळ’ मागितले. मला जाम नवल वाटलं. त्यापेक्षाही नवलाची गोष्ट म्हणजे तिच्या खोलीवर तीळ उपलब्ध होते. त्याच आमच्या घरमालक काकूंनी पुढे मकरसंक्रांतीला तिळगुळाचा एक चमचाही आमच्या कोणाच्याच हातावर उलटा केला नाही. पुढे काही दिवसांनी आम्ही असंही ऐकलं की त्यांच्या घरच्या डबाभर तिळगुळाला बुरशी लागल्याने त्यांच्या लाडक्या सुनबाईंनी तेवढंही तिळगुळ फेकून दिलं म्हणे – नवलच ना!
असो. बाकी काहीही असलं तरी आम्ही मात्र कट्टर शेजारधर्मी आहोत आणि आमचा हा धर्म आम्ही ईमाने-इतबारे पाळणार बरं का!
#सूरपाखरू #३०दिवसात३० #प्रयोग२०२६

लेखक

  • सायली कराडे
    सायली कराडे

Post navigation

Previous: लक्ष्मणराव आणि कुटुंब – १२ ‘आणि एक अध्याय संपला’
Next: तंबोरा एक जिवलग……८
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.