Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

तंबोरा एक जिवलग……८

गौरीबाई गोवेकर जुलै 13, 2026
0
gumohor-water
तालिम सुरू झाली इथपर्यंत लिहिले होते. काही हकिकतीही सांगितल्या होत्या. गाणार्‍याच्या आयुष्यात असे किस्से हकिकती असायच्याच. त्या प्रसंगानुरूप येतीलच पण बर्‍याच जणांच्या प्रतिक्रिया आल्या की हिंदुस्थानी शास्त्रीय गायन कलेबद्दल म्हणजेच शास्त्राबद्दलही लिखाणात काही येईल तर बरे. म्हणजे ही लेखमालिका केवळ हकिकती आणि किश्श्यांची न होता त्यात मुलभूत असे काही या कलेबद्दल येईल. तेही खरंच आहे. शास्त्राशिवाय कला नसतेच. जिथे जिथे सौंदर्य तिथे तिथे शास्त्र आलेच. आमच्या कलेचा पाया म्हणजे कंठातला सूर. तो तयार हवा. तयार म्हणजे काय? तर सूराला काही गुणवत्ता/क्वालिटी असायला हवी. ठराविक मर्यादेपर्यंत ती सरावाने आणता येते. मुळात सूर म्हणजे तरी काय? कंठातून निघणारा ध्वनी. तो पल्लेदार हवा, एकसमान आला पाहिजे, त्यात गोलाई आणि गोडवा असायला हवा त्या शिवाय तो ध्वनी, त्याच्या मानलेल्या मूळ स्थानापासून ठराविक अंतर वर आणि खाली केला असता त्याच्या वर लिहिलेल्या गुणवत्तेत फरक पडता कामा नये. ठराविक काळापर्यंत हा ध्वनी कंठातून सलग काढता आला पाहिजे. पुढे तो ध्वनी सर्व स्वरात म्हणजे अ, आ, इ, ई , उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, या स्वरांच्या रूपामध्ये वरील गुणवत्तेचा र्‍हास न होता काढता आला पाहिजे हे सर्व आले म्हणजे तयार सूर! दुसरे म्हणजे स्वरज्ञान. वर सांगितलेला जो ध्वनी म्हणजेच सूर त्याच्या मोजपट्टिवर ठरलेल्या बारा स्थानांवर अचूक पणे व स्थानांच्या कोणत्याही क्रमाअनुसार हुकमी काढता येणे किंवा कानावर पडलेल्या स्वराचे अचूक स्थान ओळखता येणे हेच स्वरज्ञान होय! ही ठरलेली बारा स्थाने म्हणजेच हिंदुस्थानी कंठसंगीतातले बारा स्वर. दोन स्थानांमधले आणखी सूक्ष्म बावीस थांबे म्हणजेच बावीस श्रुती. हे सर्व मेंदूचे काम. तिसरे म्हणजे वरील दोन गोष्टींनंतर या स्वरस्थानांच्या कसरती. हे म्हणजे सौंदर्यीकरण. यात मिंड, खटका, मुरक्या, ताना, आलाप, पलटे झमझमा इत्यादी येतात. हे म्हणजे संगीतातले जिमनॅशियमच. मी ज्या घराण्यांचे शिक्षण घेतले त्यामध्ये या तीनही गोष्टींना अत्यंत महत्व आहे. तसे ते सगळ्याच घराण्यात आहे म्हणा. या तीन गोष्टी आल्या की म्हणतात 'आवाज तयार आहे' त्या पुढे राग रागिण्या येतात. या तीन गोष्टी नसतील तर पुढच्या शिक्षणाला काही अर्थ नाही. आता एक गोष्ट सांगते की, वरील तीन गोष्टी येऊन सुद्धा एखादा गाणारा प्रसिध्दिस येत नाही. तर ते प्रकरण आणखी वेगळे आहे. मी लहानपणापासून आईकडे शिकल्यामुळे या तीनही गोष्टी तिनं मला प्रथम शिकवल्या म्हणून तयार होत्या. मग पुढच्या गोष्टी शिकायला खांसाहेबांच्याकडे सुरुवात केली. तरीसुद्धा त्यांनी एकदम शिकवले नाहीच. आधि या तीन गोष्टी माझ्याकडे आहेत की नाही याची चाचपणीच चालली होती कित्येक दिवस. मेहनतीत कसूर चालायची नाही. ही विद्या खरोखरच अत्यंत कष्टसाध्य आहे. कित्येकदा आपण उमेद हरतो, पुरे. बस्स झाले, या पुढे नाहीच जमणार. असेही होते शिकताना. पण योग्य गुरू आणि चिकाटी असेल तर या अडचणींवर सहज मात करता येते. खरा गुरू तोच की जो तुम्हाला तुमच्या नैसर्गीक क्षमतांचा वेध घेऊन जमेल की नाही हे आधी हेरतो. नैसर्गीकच कमतरता असेल तर पुढची मेहनत फूकट आहे हे जाणून तुमचा व त्याचा कालापव्यय करीत नाही. आणि क्षमता असेल असे आढळले तर मेहनतीची योग्य आणि अचूक दिशा दाखवतो. क्रमशः 


गौरीबाई गोवेकर.

लेखक

  • गौरीबाई गोवेकर
    गौरीबाई गोवेकर

Post navigation

Previous: उधार उसनवार
Next: तंबोरा एक जिवलग…….९
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.