Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

४-बर्नर’ सिद्धांत (4-Burners Theory)

गौतम सोमण जुलै 15, 2026 1 minute read
0
GautamSoman_20260715.png
स्व-उत्पादकता (self-productivity) किंवा कार्यक्षमता वाढवण्याबाबत अनेक सिद्धांत आणि संकल्पना मांडल्या जात असतात. त्यापैकी मोजकेच टिकून राहतात, आपल्याला मनापासून पटतात.

मी अलीकडेच एक सिद्धांत वाचला जो खूप रंजक आणि व्यावहारिकदृष्ट्या पटण्याजोगा वाटला. याला '४-बर्नर सिद्धांत' (4-Burners Theory) असे म्हणतात आणि तो डेव्हिड सेडारिस (David Sedaris) यांनी मांडला आहे.

आपल्यापैकी जवळपास सगळ्यांनीच आपल्या पालकांच्या स्वयंपाकघरातील २-बर्नरच्या गॅस शेगड्या पाहिल्या आहेत.  हळूहळू आपण ३-बर्नरच्या शेगड्यांकडे वळलो आणि आता तर ४-बर्नरच्या शेगड्याही अनेकजण वापरतात.

डेव्हिड सेडारिस आपल्या आयुष्यासाठी याच ४-बर्नरच्या शेगडीचे उदाहरण देतात . ते म्हणतात की आपल्या आयुष्यातही असे ४ बर्नर्स  असतात:

१. कुटुंब: आई-वडील, जोडीदार, मुले
२. काम: नोकरी किंवा व्यवसायातील कारकीर्द
३. आरोग्य: मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक
४. फावल्या वेळातील गोष्टी (Leisure): छंद, आवडीनिवडी, मित्र-मैत्रिणी

आपल्या संपूर्ण आयुष्यात हे चारही बर्नर्स चालू असतात. अर्थातच ज्याप्रमाणे प्रत्येक बर्नर चालवण्यासाठी गॅसची (इंधनाची) गरज असते त्याचप्रमाणे आपल्याला वरील प्रत्येक गोष्टीसाठी वेळ, पैसा आणि परीश्रम करावे लागतात.

पण गॅसचा (पर्यायाने वेळ/पैसा/परीश्रम यांचा ) साठा तर मर्यादित असतो. ४-बर्नर थिअरी असे सांगते की तुम्ही एकाचवेळी चारही बर्नर्स पूर्ण क्षमतेने दीर्घकाळ चालवू शकतच नाही. तुम्ही जर तसे करायचा प्रयत्न केलाच तर इंधन लवकरच संपून जाईल.

त्यामुळे जर यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला एखादा बर्नर कमी करावा लागतो.
आणि *अत्यंत* यशस्वी होण्यासाठी… तुम्हाला दोन बर्नर्स कमी करावे लागतात.

बहुतेक यशस्वी लोक सहसा १ आणि ४ क्रमांकाचे बर्नर्स कमी करतात.
डेव्हिड सेडारिस यांनी याची काही उदाहरणे दिली आहेत.
एलन मस्क (Elon Musk) यांचे उदाहरण घ्या. ते त्यांच्या क्षेत्रात जगप्रसिद्ध  आहेत, अफाट श्रीमंत आहेत. म्हणजेच त्यांचा बर्नर क्रमांक १ पूर्ण जोमाने सुरु आहे…
… पण कामाव्यतिरिक्त त्यांचे जिवलग मित्र नाहीत, त्यांना कोणते छंदही नाहीत. त्यांच्या कुटुंबाला ते फार मर्यादीत वेळ देतात.

बिल गेट्स हे अत्यंत श्रीमंत आहेत आणि शारीरिकदृष्ट्याही तंदुरुस्त आहेत. ते आपले छंदही व्यवस्थित जोपासतात. पण त्यांचे कौटुंबिक आयुष्य विस्कळीत झाले आहे.

मग आपण काय करू शकतो?
डेव्हिड सेडारिस म्हणतात: तुम्ही या चारही बर्नर्सना एकावेळी पूर्ण क्षमतेने चालवू शकत नाही हे तर खरेच… पण तुम्ही त्यांना आळीपाळीने फुल्ल स्पीडने तर नक्कीच वापरू शकता ना (rotate करू शकता)!
म्हणजे असं बघा –
ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात कामाचा ताण आहे? फावल्या वेळातील गोष्टी (छंद/मित्र) आणि आरोग्याकडे थोडे कमी लक्ष द्या (पण त्या पूर्णपणे बंद करू नका).

मुलांचे संगोपन करायचे आहे? काही काळासाठी कामाचा वेग किंवा वेळ कमी करा.

मानसिक किंवा शारीरिक थकवा (burnout) जाणवतोय? आरोग्य आणि मित्र-मैत्रिणीं, छंद जोपासण्यास प्राधान्य द्या.

थोडक्यात सांगायचं तर एखादी कुशल गृहिणी जशी चारही बर्नर्सचा समन्वय राखून पूर्ण स्वयंपाक चुटकीसरशी बनवते त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील या चारही महत्वाच्या घटकांचा, त्या-त्या वेळी गरज असेल त्याप्रमाणे, योग्य समतोल राखला जातोय ना हेच आपण पाहायचे.
मला स्वतःला ही थिअरी आवडलीय… तुम्हाला पटते का बघा!

GautamSoman_20260715.png

लेखक

  • गौतम सोमण
    गौतम सोमण

Post navigation

Previous: चलबिचल
Next: ||तुळजाभवानी एक शक्तिपीठ||
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.