Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

माझा रुद्राभ्यास

मोहन जोशी जुलै 16, 2026
0
gumohor-water

माझे वडील दर महिन्यात शिवरात्रीला उपवास करायचे आणि तेव्हा ते आमचे घरी एक दगडी नंदीसह शंकराची पिंड आहे , त्याला रुद्राभिषेक करायचे .पुढे ही दगडी पिंड , पुस्तेनी इस्टेट ,म्हणून मला मिळाली , आणि त्यासोबत आमच्या घरचा वार्षिक महाशिवरात्रीचा सण . मी सुद्धा वर्षानुवर्षे हे व्रत पाळीत राहलो. सुरुवातीला आमचे दीक्षित गुरुजी दरवर्षी महाशिवरात्रीला यायचे आणि अभिषेक करून जायचे. पुढे वयोमानाने त्यांनी असमर्थता दाखवली,आणि तूच स्वतः रुद्राभिषेक करत जा ,असा सल्ला दिला. आणि त्यांनी अश्याप्रकारे माझ्या मनात रुद्राभ्यासाचे बीज पेरून ठेवले. 

मला रुद्र लयीत म्हणतांना ऐकणे, खूप आवडायचे, पण स्वतः ला म्हणणे , काही जमत नसे. पुढे २०१३ ला मी कैलास मानस यात्रेला जायचे ठरविले, आणि तेथे कैलास समोर रुद्रपाठ करायचे ठरविले. स्वप्न तर ठीक होते , पण कसे पूर्ण करणार, ह्या विवंचनेत असतांना मला परांजपे काकू भेटल्या. त्या माझ्या मित्राची आई होत्या आणि त्या बऱ्याच धार्मिक विधींचे शिक्षण नियमितपणे स्त्री वर्गाला करीत असे. मी माझा नंबर लागतो का, म्हणून विचारले , तर त्या लगेच हो म्हणाल्या , आणि अश्याप्रकारे माझा रुद्राभ्यासाचा मार्ग मोकळा झाला. 

आता रुद्र शिकायचे तर रोज नियमितपने जावे लागेल, पण दवाखाना आणि कॉलेज करून सोयीची वेळ कोणती ? , मग त्यात परांजपे काकूंनी माझी अडचण समजून , मला सायंकाळचा दवाखाना झाल्यावरची वेळ दिली . मी रोज दवाखाना आटोपून त्यांचे घरी जायचो , अरे, तू खूप थकला असशील, असे म्हणत , मला थोडा वेळ बसवून घेत, मग नुसत पाणी प्यायचे नसते, म्हणून मला रोज कधी खारीक, तर कधी बदाम, काजू, खडीसाखर, शेंगदाणे असे काहीसे प्रसाद मिळत असे, मग आधीच्या दिवशी पर्यंतचे शिकलेले श्लोक परत म्हणायचे ,आणि मग रोज नवीन श्लोक म्हणायचे , अशी माझी शिकवणी चालायची. आणि पाहता पाहता , दोन महिन्यात , तुझे शिक्षण पूर्ण झाले , आणि तू परीक्षेत पास झाला आहे , असे परांजपे काकूंनी मला सांगितले . 

मग मी स्वतः त्याचे नियमितपणे वाचन करीत असे आणि मग मी पहिले घरी , मग तेलेनखेडी, मग तुंगनाथ, पशुपतीनाथ , मानस सरोवर आणि मग कैलास पर्वतासमोर रुद्राचे वाचन पठण करीत होतो.आता  हे असे रुद्रपाठ करून काय मिळते , असा प्रश्न तुम्हाला पडला असेल , पण ह्याबाबत माझे अनुभव काहीसे जगावेगळे वेगळेच आहे. 

माझे आणि रुद्राचे नाते एक वेगळ्याच स्तरावरचे झाले आहे, मी जेव्हाही कधी काही अडचणीत येतो, केव्हा मला कधी देवाला प्रार्थना करून काही मागायचे असते, तेव्हा मी रुद्रपाठ करतो,आणि माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मला आपोआप मिळतात , अगदी कोणाला खोटे वाटावे असे, पण मला तसे खूप अनुभव येतात. माझी मुले मुली तर मला गमतीने म्हणतात , चला, बाबा ,आता “कॉस्मिक सेटिंग “ करा .आणि खरेच तसे होते. पहाडांमध्ये जेव्हा काही संकटे येतात , तेव्हा गिर्यारोहक सामुदायिक प्रार्थना करतात, आणि त्यातून मार्ग निघतो, असे “पॉवर ऑफ प्रेयर “ ह्या प्रसिद्ध पुस्तकात एव्हरेस्ट गिर्यारोहकाने नमूद केले आहे. पण अशी प्रार्थना करताना , ती अगदी मनापासून आणि निस्सीम श्रद्धेने झाली पाहिजे, असेही नमूद केले आहे. मला अनुभव आहे, तुम्हीही करून पहा. 

लेखक

  • मोहन जोशी

Post navigation

Previous: संवाद – मी चा मी सोबत…
Next: महाकवी
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.