नागपूरचा इतिहास २० जुलै २०२६
नागपूरकर भोसले काशीबाईंचे मंदिर
नागपूरच्या राजघाटावर राणीसाहेब काशीबाईंचे समाधी मंदिर आहे. महाराज मुधोजीराजे यांनी इ. स. १८१७ मध्ये हे समाधी मंदिर बांधले. महाराज काशीबाईं यां पुरसोजीराजांचे राणीसाहेब होत्या महाराज पुरसोजीराजे यांनी अल्पकाळ नागपूरचे राज्य केले. त्यांचा जन्म इ.स.१७७८ मध्ये नागपूर येथे झाला. नातु बाळंराजे पुरसोजीचे जन्मानिमित्य नागपूरात सेना धुरंधर मुधोजीराजे यांनी आंनदोत्सवाचे आयोजन केले. चिमाबाईंसाहेब यांनी नातवाकरता माहुरचे देवीला नवस केला होता व त्यांनी इ.स. १७८७मध्ये महाराणी गजराबाईं व पुरसोजीराजे यांचेसह देवीचे दर्शन करून हा नवस फेडला. नंतर तत्कालिन रितीप्रमाणे १२ वर्षाच्या पुरसोजीराजांचे काशीबाईंशी ६ मार्च इ.स. १७९१ रोजी नागपूरात लग्न झाले.
महाराज रघुजीराजांनी मृत्युपत्रात पुरसोजीराजांना आपले उत्ताराधीकारी नेमले होते. पण तेव्हा पुरसोजीराजे राज्यकारभार करण्यास अपात्र असल्याने महाराज रघुजीराजांनी त्यांचे पुतणे मुधोजीराजे यांची मुख्यत्यार म्हणुन नेमणूक करून त्यांचेकरता चार सल्लागार नेमले होते. नंतर मुधोजीराजांनी पुरसोंजीराजांना १४एप्रिल १८१६रोजी पुरसोंजीराजांना समारंभपूर्वक गादीवर बसविले व कारभारांची सुत्र हाती घेतली.
पण १ फेब्रुवारी इ. स. १८१७ रोजी आजारपणामूळे ३७ वर्षिय महाराज पुरसोजीराजे मरण पावले.नंतर राणीसाहेब काशीबाईंनी सती जाऊन पुरसोंजीराजांसोबत सहगमन केले नंतर महाराज मुधोजीराजे यांनी पुरसोजीराजे व काशीबाईं यांचे समाधी मंदिर बांधले. आज हि काशीबाई व पुरसोजीराजें याचे अजोड प्रेम कथेची साक्ष त्यांचे समाधी मदिंर देत आहे. नागपूरचा राजघाट हा श्रीमंत राणीसाहेबकाशीबाई भोसले घाट म्हणूनच प्रचलीत आहे