समूह-स्वकिय,
डॉ अतुल गवांदे हे अमेरिकेतील सर्जन, त्यांचं २००२ साली प्रकाशित झालेलं इंग्रजीतलं पुस्तक “काॅम्प्लिकेशन्स
नोट्स फ्राॅम द लाईफ आॅफ अ यंग सर्जन” दोन वर्षांपूर्वी वाचलं होतं.
मला फार आवडलं हे पुस्तक. डॉ अतुल गवांदेंची लेखनशैली प्रवाही आहे, मेडिकल क्षेत्रातले हे लेख सगळ्यांनाच समजतील अशा रितीने लिहिले आहेत. लेखांचे विषयही छान आकर्षक आहेत.
त्यातल्या एक लेख “द पेन परप्लेक्स” , परत एकदा वाचताना वाटलं, हा लेख “सुरपाखरू” ह्या उपक्रमात पटलावर लावावा.
… तर वेदनेचं गौडबंगाल उमगलं तसं आपल्या समोर मांडतो आहे. मूळ लेख १५ पृष्ठांवर पसरलेला आहे.
'वेदना' ह्या विषयावर लिहितो आहे खरं, पण ह लेखच आपल्या डोकेदुखीचं कारण होऊ नये, म्हणजे मिळवलं!
… तर पहा आपणा सगळ्यांना हे लिखाण कसं वाटतं ते.