Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

“मी???”

हेमंत नाईक जुलै 23, 2026 1 minute read
0
1001111671.jpg
मी माझे हे काही शब्द
नकळत देई तो अहंकार..
मी फक्त्त आहे कारणमात्र
जीवनी अंती हा साक्षात्कार..
जळले जरी ते सर्वं काही
अहं जळण्या आहे भारी..
नात्याचाही  गर्व नको तो
ओंडक्याना लाट दूर नेई..
जाणकार जाणे सर्वं काही
मी पासून नाही तरी सुटका..
संतत्व  येण्याकरीता मात्र
विसरा प्रथम स्वतः स्वतःला..
मी मानवाचे आहे लक्षण
नसता तयाला येईल देवपण..
मी जेव्हा तो नष्ट पावता 
तत्परतेने होईल ईश्वरभेट..
मी तूनच  दुःखाचा उगम,
विसरता सर्वं आनंदी आनंद..
विसरणे त्यास अति कठीण,
जरी येतात ते अंतिम क्षण..
कार्य करविता वरती  एक
आपण करतो मनी आभास..
स्वतः मध्ये उगाच गुरफुटता 
बुद्धीचा ‘स्वार्थ” करितॊ नाश..
        “मी” बरोबर येणाऱ्या स्वार्थ भावना आणि अहंकार वर ओळीत अधोरेखित करणारी ही कविता लिहिली खरी.. पण लिहिताना माझ्या मनात विचार आला मी म्हणजे नेमका कोण? आणि नकळत तोच लेखाचा विषय घेऊन लिहिता झालो.
    मी कोण आहे?  हे पूर्ण मला माहित आहे असे छातीठोकपणे कुणी सांगत असेल तर स्वतःशीच प्रतारणा करतो आहे.
    आमच्या शाळेचे घोषवाक्य होते “मीच माझा भाग्यविधाता.” मुलांना खूप आदर्श वाटावे असच होते ते . पण त्यावेळी बहुतेकांची मेडिकलला जाण्याची इच्छा असूनही दोन तीन वगळता बाकी सर्व इतर मार्गाला लागली. असं बघितलं की ते त्यांचे भाग्य स्वतः घडवू शकले नाही हे अधोरेखित होते. बहुतेक सर्वजण प्रवाहपतित जीवन जगतात. 
“मी कोण?”
     हा प्रश्न स्वतःला विचारून पहा. तुमच्यात काय दडले आहे हे अजूनही तुम्हालाच माहिती नसते. एखादा चांगला गायक असल्याची जाणीव निवृत्तीनंतर होते. आपण काहीतरी लिहू शकतो हे बऱ्याच जणांना कळतही नाही आणि मग उतारवयात सुरपाखरूसारख्या मंचावर प्रतिभेस पंख फुटतात.अगदी  वाटसुरूना लुटणारा वाल्या कोळी आयुष्याच्या उत्तरार्धात रामायण लिहून वाल्मिकी ऋषीं बनतो. शाळेत टारगट मुलं मोठेपणी आदर्श बनतात आणि आदर्श ठरलेला विदयार्थी दारुडा व्यसनाधीन बनतो असे अनेक उदाहरणं आपण बघतो.थोडक्यात आपल्यातला मी ही परिस्थितीनुसार बदलणारा असतो हे मात्र नक्की.
     बोमन इराणी वयाच्या चाळीस वर्षपर्यत फोटग्राफर म्हणून कार्य करीत होते त्यांच्यात एक अद्भुत सिनेनट  दडला आहे हे त्यांनाही माहित नव्हते.
    
     आपल्यातला “मी” जाणंण खूप कठीण आहे… अगदी देव म्हणजे नेमके कोण? या प्रश्नासारखाच मी म्हणजे कोण? हा प्रश्न आहे. म्हणूनच की काय देवालाही स्वतःत शोधा असे म्हणतात. 
       मी कोण? याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर अनेक अगणित उत्तर मिळतील  परिस्थिती नुसार रंग बदलणाऱ्या या दुनियेत आपल्यातला “मी” पण आहे.
       पण मी यातला नव्हे असा अहं घेऊन सर्व वागत असतो. दुसऱ्याला सहज दुषण देणारे आम्ही दुसऱ्याकडे बोट दाखवताना स्वतःकडे चार बोट आहेत हे सर्रास विसरतात.
      “मी” हिमनगासारखा आहे जेमतेम काही टक्के भाग तुम्हास दिसणारा… आणि उरलेला अनाकलनीय गूढ असा.  जसं फुल उमलते आणि एकेक पाकळी नवीन रूप दाखवते तसेच काहीसे आहे.
     काही घटना अशा घडतात कधी आदर्श वाटणारी व्यक्ती असे वागू शकेल असं वाटत नसताना विचित्र वागून चांगुलपणावराचा विश्वास उडवते. संत असल्याचा बुरखा पांघरून बोकाळलेले भोंदूबाबा जागोजागी आहे आणि त्याचे असंख्य अंधभक्त त्यांच्यातल्या “मी” ला सर्रास विसरून बाबा म्हणतात ती पूर्व दिशा असे समजून वागतात आणि मोठी फसवणूक होते तेव्हा उशीर झाला असतो.
“मी” नेमका कोण तो 
माहित कुणास नाही 
शोध घेताना त्याचा 
रूप मात्र अनेक  दावी!!
लिहिलं नव्हते कधीही 
उभ्या आयुष्यात काही 
एक शब्द पुरेसा आता 
लिहिण्यास हो खूप काही!! 
वागलो होतो तेव्हा कसा 
पश्च्याताप होतो उतारवयी 
वेळ लगेच ती निघून जाते 
माफी मागण्या तो नाही!!
मी कोण?  हे अद्भुत कोडे 
शोधात आयुष्य ते सरते 
चितेवर अंती लेटतानाही 
प्रश्नचिन्ह कायम असतें !!
ना मिळाले उत्तर 
या जन्मी तर 
जन्म पुन्हा नक्की मिळणार 
मी कोणचे उत्तर शोधण्या 
“मी”  पुनः अवतारणार!!

लेखक

  • हेमंत नाईक

    COEP१९८४ चा विद्यार्थी, पेशाने स्थापत्य इंजिनीअर असल्याने घराची सुंदर रचना करताकरता वयाची साठी गाठल्यावर नकळत शब्दांचीही रचना करू लागलो.मित्राच्या प्रोत्साहनाने अशाच एका लिहिण्याची कलेची पर्यटनांची संस्कृती जोपासणाऱ्या मंचावर लिहिण्यास सुरुवात केली.. प्रथम वावर हा  असा सांकेतिक चिन्हातच होता. मग एखादा शब्द मग आख्खी ओळ पुढे चारोळी मग एखादी कविता पोस्ट करता करता लेखा पर्यंत पोहचलो.या दोन वर्षात निवांत वेळ मिळाल्याने बरंच काही लिहीलं गेलं…

    माझा लेखन प्रवास:

    १. “उरल्या त्या आठवणी…” ही अकरा लेखांची लेखमाला मित्रांच्या मंचावर लिहिली. त्यात आमच्या गल्लीतील बंद पडलेल्या गणेशोत्सवाबद्दल लिहीले होते. कधी काळी जितेंद्र अभिषेकी, अरुण दाते, श्रीधर फडके, आशा खाडिलकर, जयवंत कुलकर्णी, अजित कडकडे, द.मा. मिरसदार, प्रभाकर कारेकर व. पू काळे, अशा अनेक दिग्गज कलाकाराच्या उपस्थितीने त्यांच्या गायनाने, कथाकथनाने आणि मुख्य म्हणजे दिवसभराच्या सहवासाने मला झालेला आनंदानुभव लिहिला होता.

    २. "काहीही!"ही एकवीस ललीत लेखनाची लेखमाला.

    ३. “COEP चे सहजीवन” हा माझ्या अभियात्रिकी महाविदयालयीन आयुष्यच्या सोनेरी स्मृतिचा स्मृतिगंध… मित्रांना खूप आवडला.

    ४. मित्र मैत्रिणीवर तयाच्या वाढदिवशी केलेल्या, आणि इतर प्रासंगिक कविता आणि लेख.

    ५. न्यूझीलंड डायरी हे मित्रांच्या आग्रहाने मार्च २०२४ ते मे २०२५ दरम्यान मित्राच्या मंचावर लिहिलेले न्यूझीलंडचे प्रवासवर्णन सध्या मायबोलीवर पोस्ट करत आहे.

    ६. २०२६च्या नववर्ष दिनापासून मी एक “सुरपाखरू” होऊन त्यांच्या “३० दिवसात ३० प्रयोग २०२६” या थव्यामधे दाखल हौवून लिहिण्याचा आणि वाचनाचा आनंद लुटतो आहे

Post navigation

Previous: श्रीरामचरित्र
Next: साठीनंतर आता तरी खर्च करायला शिका
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.