Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

कोटकायन भाग – ०२

वैभव शिरखेडकर जुलै 23, 2026 1 minute read
0
gumohor-water
कधी जास्त तर कधी कमी काम ह्याची सवय असल्याने काही विशेष ताण वगैरे आता राहील असे काही कोटक क्रेडिट कार्ड चे ऑफिस आमच्याकडे आल्याने वाटले नाही. ऑफिस कार्य करतांना विविध प्रकारची कार्ये आणि आव्हाने राहणारच हे गृहीत धरून आम्ही चालत राहिलो. याआधी सुद्धा ह्या इंडस्ट्री संबंधित क्लायंट ला सेवा देण्याचे कार्य केल्याने तो एक मोठा अनुभव आमच्या बिजनेस सेंटर ला होता. पण आताचे कार्य हे थोडे वेगळे होते. बिजनेस सेंटरमधील नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त जागा आम्ही कोटक ला दिलेली होती. त्यांना विविध प्रकारच्या मोफत सेवा जसे झेरॉक्स, प्रिंटिंग, दोन्ही वेळचा चहा, वायफाय, वेल फ़र्निश ऑफिस इ.

बाहेर जाऊन क्रेडिट कार्ड मार्केटिंग करणाऱ्या २० पेक्षा जास्त विक्री प्रतिनिधींची रोज सकाळी १० ला मिटिंग होत. तसे जे काही दिवसांनी फक्त टेलिमार्केटिंगसाठी आमच्याकडे आलेले होते, त्यांचाही एवढाच स्टाफ होता. रोजचे टार्गेट, साप्ताहिक आणि मासिक टार्गेट हे विक्री प्रतिनिधींना दिल्या जात असे. तेव्हा लक्षात आले मार्केटिंग जेवढे सोपे वाटते तेवढे नाही. पण मेहनत घेतल्यास, प्रॉडक्ट चा व्यवस्थित अभ्यास केल्यास, चांगली मार्केटिंग स्किल अंगी असल्यास हे शक्य आहे. हे कोटकमधील विक्री प्रतिनिधींकडून लक्षात आले. कारण त्यांचे जे मूळ वेतन असते त्यापेक्षा जास्त पैसे ते  विक्री केलेल्या प्रॉडक्टवर मिळणाऱ्या इन्सेन्टिव्ह मधून  कमावतात. त्यामध्येही अटी आणि शर्ती लागू असतात त्या वेगळ्याच.

जर कुणी टार्गेट पूर्ण केले किंवा त्यापेक्षा जास्त काही विशेष केले तर त्याला पुरस्कार, विशेष कौतुक आणि त्यानेच जर पुढच्या वेळेस याउलट केले तर त्याच्यावर आरडाओरड आणि शिव्यांची बरसात. जर कुणी पुन्हा पुन्हा दिलेले टार्गेट पूर्ण करण्यात अपयशी ठरत असेल तर,

तुमसे नहीं जम रहा तो पेपर डालो और निकलो यहाँ से।  

अगर वो भी नहीं जमता तो टर्मिनेशन के लिए तैयार रहो।  हे सर्व अत्यंत कठोर आणि ओरडून विक्री व्यवस्थापक सांगत असे.
एकंदरीत Sales  मधे एकीकडे विक्री व्यवस्थापक विक्री प्रतिनिधींवर टार्गेट साठी दबाव बनवतात, तर विक्री व्यवस्थापकावर त्याच्या वरचे बॉस दबाव बनवत असतात. ज्यांची अफाट मेहनत, स्मार्ट वर्क करण्याची तयारी आणि सोबतच शिव्या आणि ओरडा खाण्याची तयारी असते ते यात यशस्वी होतात हे ही खरे.  

लेखक

  • वैभव शिरखेडकर

    वैभव शिरखेडकर, नागपूर
    नागपूरला खासगी क्षेत्रात नौकरी. विविध विषयांवरचे पुस्तके वाचनाची आणि हिंदी, मराठी कविता लिखाणाची आवड. नागपूर विश्वविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी.

Post navigation

Previous: नोंद
Next: कोटकायन भाग – ०३
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.