Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

माफ करायला शिका, कारण जग आपलेच आहे.

वैभव शिरखेडकर जुलै 30, 2026
0
gumohor-water
एखाद्यावर टीका, टिप्पणी करणे आयुष्यातील सर्वात सोपे काम असते. त्यातही एखाद्याला न ओळखता त्याला गृहीत धरून तो असा, तो तसा म्हणजे तसाच असणार हे सुद्धा एक वेगळेच. 
असाच एक अनुभव मला माझ्याही आयुष्यात आलेला आहे. 
माझी असलेली एक सवय म्हणजे, मी लोकांकडून कोणत्याही छोट्या मोठ्या कामाचा फॉलो अप घेत राहतो. अमुक काम झाले की नाही वगैरे वगैरे. त्या सवयीमुळे म्हणा किंवा आणखी काही पण एक अत्यंत वाईट असा अनुभव येऊनही जे याला जबाबदार आहेत त्यांना कधीच क्षमा सुद्धा करून टाकलीय. शेवटी ते गाठोडे कुठे घेऊन जायचे ना. 
तो अनुभव म्हणजे माझ्या एका ओळखीतल्या मुलीला नोकरीची गरज होती. तिने थेट मला फोन करून याविषयी सांगितले. मी सुद्धा तिला याबाबतीत मदत करेल म्हणून सांगितले. त्या उद्देशाने तिच्या आणि माझ्या दोघांच्याही ओळखीच्या एक व्यक्ती ज्यांच्याशी तिने बोलावे म्हणजे तिला नोकरी मिळू शकेल असे ठरले.
ठरल्यानुसार प्रथम मी त्या व्यक्तीसोबत बोलून, जिला नोकरी हवी आहे तिच्याविषयी सांगितले. खरं म्हणजे आम्ही तिघेही एकमेकांना ओळखत असलो तरी माझे त्या दोघांशीही अधून मधून बोलणे व्हायचे. ते दोघे फार संपर्कात नव्हते याची कल्पना मला होती. आणि समोरची व्यक्ती मदत करू शकते म्हणून मी त्यांना त्या भगिनीविषयी सांगितले. आता इथे माझी भूमिका फार काही राहिली नव्हती. फक्त तिला नोकरी लागली की नाही हे तिला विचारणे आणि ज्यांच्याकडे ती गेली होती त्यांच्याशी बोलणे. 
तसे याबाबतीत त्यांच्याशी दोनदा बोलणे झालेले होते. त्या भगिनीला तर नोकरी लागली नव्हती. मात्र जिच्यासाठी मी आमच्या दोघांच्या सुद्धा त्या ओळखीच्या व्यक्तींना तिच्या नोकरीविषयी बोललो त्यांनी माझ्यावरच संशय घेतला. 
त्यांनी स्पष्टपणे म्हटले, अरे तुझं आणि तिचं काही आपसात सुरू तर नाही ना. 
खरं म्हणजे मला या गोष्टीचा अजिबात राग वगैरे आलेला नव्हता. मी तसे त्यांना असे काही नाही म्हणून स्पष्ट केले. हा विषय आता येथे संपलेला असतांना, त्या व्यक्तीने पुढे माझ्या ओळखीच्या लोकांना तिच्या आणि माझ्याविषयी सांगायला सुरुवात केली. म्हणजे मी त्यांना स्पष्ट करून सुद्धा त्यांचे समाधान झालेले नव्हते. 
मला त्यांना जाब विचारायची इच्छा झालेली होती. पण मी तसे केले नाही. कारण मला वाद नको होता. पण हे जे त्यांनी चालवले होते ते त्यांनी का चालवले आहे याचे उत्तर कधीच भेटले नाही. 
ज्या व्यक्तीला नोकरीची गरज होती, ती व्यक्ती आताही कुठे भेटली तर तिचा एकच प्रश्न असतो, 
दादा कसा आहेस तू ? 
पुढे मी माझ्या आईला हा प्रसंग सांगितला तेव्हा ती तर आश्चर्यच करत राहिली. 
ज्या आजींनी आम्हाला आसरा दिलाय त्या पण आश्चर्य करत राहिल्या. 
तेव्हा आयुष्यात एक गोष्ट लक्षात आली. 
अख्ख विश्व तुमच्यावर विश्वास नसेल ठेवत तरी चालेल मात्र तुमचे कुटुंब ठेवते ना हे महत्त्वाचे. 
दुसरे म्हणजे तो विषय मला पुढे नेता आला असता पण जिथे आपली चूक नाही तिथे कशाला स्वतःला डिफेंड करायला जायचे आणि वाद घालायचा. 
ह्या विषयाचा मी दुसऱ्या बाजूने पण विचार केला त्यामुळे मला त्याचा फार त्रास झाला नाही. आपल्या कुण्या तरी जन्मातील कर्माचे ते फळ असू शकते ते स्वीकारून पुढे जायचे.
एखाद्याविषयी चुकीची धारणा केल्याने आणि त्याची बदनामी केल्याने त्यातून काही पण घडू शकते. म्हणून एखाद्याला आपण खरच किती ओळखतो हे स्वतःला कधीतरी शांतपणे विचारून बघितले तर संशय आणि धारणा बनविण्याला स्वतःच्या मनाला वाव मिळत नाही. 

लेखक

  • वैभव शिरखेडकर

    वैभव शिरखेडकर, नागपूर
    नागपूरला खासगी क्षेत्रात नौकरी. विविध विषयांवरचे पुस्तके वाचनाची आणि हिंदी, मराठी कविता लिखाणाची आवड. नागपूर विश्वविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी.

Post navigation

Previous: ज्योतिपुंज सरदार अजीतसिंह : भाग ३ – यातना, संघर्ष, आणि स्वातंत्र्याचा सूर्योदय
Next: सूरपाखरू चा समारोप
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.