Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

सूरपाखरू चा समारोप

मोहन जोशी जुलै 31, 2026
0
gumohor-water

मी आतापर्यंत अनेक वेळा हिमालयात भटकंती केली आहे,आणि त्यात मला एक गोष्ट नक्की समजलेली आहे की, आपल्याला अश्या कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी तेथूनच बोलावणे यावे लागते , असेच काहीसे आमच्याबाबतीत सुरपाखराबाबत झाले. आमच्या एका व्हॉट्सअप ग्रुपवर दीपकने फक्त एक साधे निमंत्रण पाठविले , आणि का म्हणून माहीत नाही पण, आम्ही दोघांनी तेथे जायचे ठरविले. ह्याआधी माझा लेखन क्षेत्राशी दूरदूरपर्यंत संबंध नव्हता ,पण ह्या नवदृष्टी सभागृहातील दोन तासानंतर मला खरेच काहीतरी नवदृष्टी मिळाली असावी , असे वाटते आणि आम्ही दोघांनी महिनाभर व्यक्त होण्याचे व्रत घ्यायचे ठरविले. 

Image.png

हे व्रत तर घेतले , पण दवाखाना, शेती,गाव,घरची कामे सगळे सांभाळून लेखन करायचे, म्हणजे थोड धाडसच वाटत होते. हे धनुष्य पेलवेल की नाही, ह्याबाबत मन शाशंक होते . त्यात तुषार जोशींचा धाकही वाटत होता , पण पाहता पाहता हे व्रत पूर्ण झाले आणि आता मी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. 

हे व्रत पूर्णत्वाला नेण्यासाठी , जसे मला तुषारचे वेळोवेळी प्रोत्साहन मिळाले, तसेच प्रोत्साहन मला माझ्या फेसबुक मित्रांकडून मिळाले आहे . माझा एक मित्र गुजराथी तर दुसरा दक्षिण भारतीय, ह्या दोघांनी तर , तू आमची मराठीची शिकवणी घेतलीच पाहिजे, अशी विनंती केली आहे. माझ्या माय मराठीला माझे परप्रांतीय मित्र स्वतः हुन स्वीकारीत आहेत , ह्यापेक्षा काय आनंद असावा !

माझे व्याही मराठीत डॉक्टरेट आहेत , त्यांनी सुद्धा मला चांगले लिहीत असल्याचे प्रशस्तीपत्र दिले आहे. माझ्या एम.डी.चे गाईड श्री भातकुले सर , ह्यांनी सुद्धा माझे कौतुक केले आहे . माझ्या कितीतरी मित्रांनी आणि माझ्या खुप नातलगांनी , माझ्यावर कौतुकाचा सतत वर्षाव करीत, मला पूर्ण महिनाभर हे व्रत पूर्णत्वाला नेण्यासाठी प्रोत्साहित केले आहे  . माझ्या सहधर्मचारिणीने माझ्या ह्या वेळीअवेळी सुरू असलेल्या लेखनकार्याला सहिष्णुता पूर्वक पाठिंबा दिला आहे, त्यासाठी वरील सर्व जणांचे , मी मनापासून आभार मानतो आहे. 

ह्या सुरपाखराने केलेल्या परीस स्पर्शानंतर , आणि एव्हाना माझा आत्मविश्वास आता सातव्या ढगावर पोहचल्यामुळे , पुढे तुमच्यासाठी , काय काय मांडून ठेवले असणार , ह्याची कल्पना तुम्हीच करू शकता ! तर भेटूया मग @ अक्षरयात्री साप्ताहिक # सुरपाखरू  येथे दर आठवड्याला

लेखक

  • मोहन जोशी

Post navigation

Previous: माफ करायला शिका, कारण जग आपलेच आहे.
Next: समापन
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.