Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

Live From The Field

राधा जोशी जुलै 21, 2026 1 minute read
0
gumohor-water

नागपूरचा इतिहास                             २१जुलै २०२६

           सेना बहादुर खंडोजीराजे भोसले

खंडोजीराजे हे सेना धुरंधर मुधोजीराजे आणी चिमाबाईसाहेब यांचे पुत्र असून त्यांचा  जन्म १८ जानेवारी इ.स.१७६३ रोजी चंद्रपूर येथे झाला होता. खंडोजीराजे धाडसी व पराक्रमी होते. मातृभक्त होते.

इ.स.१७७९ मध्ये स्वराज्याचे बाराभाई मंडळाने इंग्रजविरूद्ध अभियान घेण्याची योजना केली. हेस्टिंग्जला  बंगालच्या कोलकता येथिल कंपनीच्या वखारीतून भूमीमार्गाने अथवा समुद्रमार्गाने साष्टीच्या इंग्रजांना लष्करी मदत पाठवता येऊ नये आणी इंग्रजांच्या फौजा बंगाल प्रांतात गुंतून राहाव्यात याकरता नागपूरकर भोसल्यांनी बंगालची मोहिम घ्यावी असे योजनेत ठरले होते. त्याप्रमाणे नागपूरकर भोसल्यांनी गनिमी काव्याने इंग्रजांना  मात देण्याची रणनिती योजली. चैाथाई करता सेनापती खंडोजीराजे विजयादशमिस बंगलाची मोहिम घेतिल असे नागपूरकर भोसल्यांनी  जाहिर केले. तेव्हाभोसल्यांच्या आक्रमणाच्या भिती पायी  मदत  पाठविण्याची खटपट सोडून कंपनी प्रमुख हेस्टिंग्ज स्वतःच्या जानमालाच्या रक्षणाकरता फौज जुळवू लागला.  

मात्र नागपूरकर भोसल्यांचे सेनापती खंडोजीराजे विस हजार स्वारांसह १५ नोव्हेबंर इ.स.१७७९ रोजी नागपूराहून रवाना झाले आणी सात महिन्यानंतर मे महिन्यात संबलपूर संस्थानात दाखल झालेत!  नंतर कटक प्रांतात दाखल होवून पराक्रमी  खंडोजीराजांनी सैन्यासह ७ मार्च रोजी बंगाल सुभ्यावर आक्रमण करून घुसखोर इंग्रजांचे ठिकांणावर हल्ले केले!

नागपूरकर भोसल्यांचे आक्रमणाची खबर समजताच हेस्टिंग्जने अन्डरसनला तह करण्यकरता कटक प्रांतात पाठविले.

तेव्हा ६एप्रिल इ.स. १७८१ रोजी संधी झाली.नागपूरकर भोसले यांचे दोन हजार घोड दळ इंग्रजांचे फौजे मिळल्यानंतर आधी गढ-मंडला प्रांतावर स्वारी करून प्रांत भोसल्यांचे स्वाधिन करतिल मग नागपूरकर भोसंल्यांचे घोडदळ इंग्रजांच्या फौजेसह कंपनीच्या कामगिरीवर जातिल आणि मोहिम संपेपर्यन्त इंग्रज दरमहा ५० हजार याप्रमाणे नागपूरकर भोसल्यांना दोन हजार घोडळाचा खर्च देतिल असे संधीत ठरले .

 संधीत ठरल्याप्रमाणे खंडोजीराजे चैाथ घेऊन मुख्य सैन्यासह निघून गेले. नागपूरकर भोसल्यांचे २००० घोडदळाबरोबर इंग्रजांचे  घोडदळ गढ-मंडलाकडे रवाना झाले. हेस्टिंग्जने जनरल कुटच्या फौजेस  कर्नल गोगार्डच्या मदतीकरता समुद्रमार्गाने पाठवून दिले  

पण सैन्याचा खर्च मिळाला नाही अशी सबब करून पिर्यस बरोबर गेले सैन्य गढ- मंडलाकडे न जाता बिहार प्रांताच्या  बेंदु खिंडीच्या मार्गाने नागपूरास परतले.१५ खंडोजीराजांचे गनिमी काव्यामूळे हेस्टिंग्जने पिर्यसबरोबर पाठविले इंग्रजांची फौज गोर्गाडचे मदतीकरता दक्षिणेकडे न जाता नर्मदेकडे गेली. कुटची फौज हि वेळत पोहचली नाही  व बोरघाटाच्यानिर्णायक लढाईत २८ एप्रिल इ स १७८१ रोजीइंग्रजांचा भयंकर पराभव झाला! 

हेस्टिंग्जने  सालवाईचा येथे शिंदयाशी १७ मे इ.स.१७८२ रोजी तह केला नंतर इंग्रजांनी शिंद्यांमार्फत भोसल्यांशीही सुलूख केला. विजयाप्रीत्यर्थ नागपूरात आनंदोत्सव साजरा झाला!

विजयी खंडोजीराजे बंगालची मोहिम यशस्वी करून नागपुरात परतल्यानंतर  भाद्रपद अंगारक चतुर्थीस  गणपती उत्सव साजरा झाला . यास हाडपका गणपती उत्सव असे म्हणतात

बदामीची लढाई २० मे इ.स. १७८५ बदामीचे लढाईत पराक्रमी खंडोजीराजांनी  उत्कृष्ट कामगिरी केली. या कामगिरीकरता खंडोजीराजे भोसंले यांना बाराभाई मंडळाकडून  सेना बहादुर हि उपाधी व पेशव्यांच्या गढ-मंडला प्रांताची सनद प्राप्त झाली! पण १६ आगस्ट इ.स.१७८९ रोजी खंडोजीराजांचा हृदय विकाराने आकस्मित मृत्यू झाला!  

महाराज रघुजीराजांनी नागपूरच्या थडगेबागेत खंडोजीराजांचे  समाधी मंदिर बांधले.

लेखक

  • राधा जोशी
    राधा जोशी

Post navigation

Previous: वेदना एक कोडं
Next: शायर चकबस्त आणि ‘लाम’चा किस्सा
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.