हे असे का?
समोरच्या त्या दोन्ही प्रकारच्या व्यक्तींना मनातून तर काही वेदना असतीलच ना. पण ते बोलणार तरी कसे आणि कुणाजवळ. तिला असे वाटत असणारच की इतरांप्रमाणे तिला सुद्धा दोन्ही पायाने चालता आले असते तर… आणि त्या मूकबधिर विद्यार्थ्यांना सुद्धा सामान्य माणसासारखे बोलावे वाटत असणार. पण ते जे आहे त्यात समाधान मानून आनंदाने आणि हसा हसत जीवन जगात आहे हे त्यांच्यासोबत रोज बसने प्रवास करतांना लक्षात आले.
काहीतरी आपसात त्यांची चिन्हांची भाषा बोलून एकदम ते हसायला लागले की समजायचे, त्यांच्यापैकीच एकाने काही जोक वगैरे नक्की केला आहे. बरं त्याच्या ह्या हसण्यामधे ती पण साथ देते. शेवटी बस येते आणि ही सगळी मंडळी व ती आणि मी सुद्धा बसमधे बसतो. हे अगदी आता नेहमीचे झालेले असते.
बरेचदा बसमधे प्रचंड गर्दी असते. ती मात्र कधी अशी म्हणतांना दिसत नाही की, मला बसायला जागा द्या. ज्या व्यक्तीमधे माणुसकी आहे तो स्वतःची सीट खाली करून तिला देतो किंवा मग कधी कधी बसचा वाहक स्वतः याबाबतीत ओरडून सांगतो.
माझ्यासारख्या व्यक्तीकडून कुणाला जागा देण्याचे पुण्य मात्र फार कमी होते. कारण नेहमी गर्दीची बस मिळणे आणि उभ्याने प्रवास करणे हे ठरलेले असते.
एकदा असेच मला एका मूकबधिर व्यक्तीने जागा देऊ केली होती. त्याला कितीही नाही म्हटले तरी पठ्ठा ऐकायला तयार नव्हता होत. शेवटी त्याने ऐकले. तेव्हा लक्षात आलेली गोष्ट म्हणजे या व्यक्तींमधे माणुसकीचे प्रमाण जरा जास्तच असते.
ते प्रमाण मोजण्याचे यंत्र असते तर..