Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

शोध

हेमंत नाईक जुलै 28, 2026 1 minute read
0
1001118934.jpg
      गरज ही शोधाची जननी असतें. शोध हा नवीन वस्तूंचा  शास्त्राचा आणि अगदी स्वतःचा सुद्धा निरंतर सुरु असतो. आपली पिढी त्या मानाने इतर पिढ्यापेक्षा खूप नशीबवान आहे खूप शोध बघण्याचे भाग्य लाभले आहे आपणाला.
      आतापर्यत अनेक शोध लागले चाकाचा लागला तर जीवनाची गती वाढली..  मुंबई ते ठाणे ही रेल्वे धावली तर लोक आश्चर्याने थक्क झाली होती,त्यावेळी ते म्हणायचेत,
“साहेबाच्या पोराची 
अक्कल भारी 
बिनबैलांनी जोरात 
गाडी हाकली!!”
   जॉन लोगी बेयर्ड ने लावलेला टीव्ही चा सिद्ध, एडिसनचा लाईटचा, न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा… अशी ही लांब न संपणारी यादी मोबाईल पर्यत येऊन पोहचली. नवीन मोबाईल निघाले तेव्हा आपल्या स्वातंत्र्यावर गदा येईल,  आपल्याला चोवीस तास उत्तर देण्यास उपलब्ध रहावे लागेल या भीतीने काही जण ते घेणं टाळत होते आणि आता मोबाईल किती गरजेचा हे सांगायलाच नको.
   GPay!! अर्थात डिजिटल पेमेंट आता या स्तरा पर्यंत वापरलं जाईल असं पंतप्रधान मोदींनाच काय पण GPay किंवा तत्सम पेमेंट प्लॅटफॉर्म्स बनवणाऱ्यांनाही वाटलं ही नसेल..
      मित्रांच्या ग्रुपवर एक चलचित्र आले होती. त्यात नवरदेवाची वरात चालली होती आणि त्याचे मित्र नाच करण्यात मग्न होते… बँडवाले सुंदर धून वाजवत होते अशा वेळी त्याना नाचणाऱ्या भोंवती काही नोटा ओवाळून खुशीने रक्कम वाजवणाऱ्या जवळ देण्याची पद्धत आहे आणि त्या नोटाची जागा चित्रात चक्कमोबाईलने घेतली होती मोबाईल ओवाळून  बँडवाल्याच्या गळ्यात लटकावलेलं क्यू आर कोडं स्कॅन करून ओवाळणीचे पेमेंट होत होते. हे बघितल्यावर मोबाईलचे आयुष्यात किती महत्वाचं स्थान झालं आहे हे लक्षात येते.. कोणी घराबाहेर पडल तर एक वेळ खिशात पाकीट नसल तर चालत..पण मोबाईल कोणी विसरत नाही!!
      मागीलवर्षी द्वारकेला गेलो होतो. बेट द्वारकेकडे जातांना मार्गात असलेल्या प्राचीन रुक्मिणी मंदिरा समोर भिकारी लाईनीत बसलेले होते. समोर एक ऑटो स्पीकर लावलेला जो सतत ही घोषणा रिपीट करत होता..
*”एक को दान देगा तो सबको मिलेगा “*
    तिथेही एक मोठा क्यू आर कोडं लागलेला बोर्ड  होता. अशी सहकारी तत्वाने आधुनिक डिजिटल दान मागणारे भिक्षु मी प्रथम पाहत होतो.या शतकात मोबाईल आणि इंटरनेट यांनी क्रांती घडवली आहे.
       मोबाईल अर्थात भ्रमणध्वनी फक्त संदेशाचे साधनापुरता मर्यादित नसून तो जादूच्या दिव्यातील जीन्स सारखा वाटतो. जे हव ते चॅटजिपिटी वर उपलब्ध करून देणारा तासाभरात स्विगी झोमॅटोवर डिश मागवणारा, गाणे चित्रपट बातम्या दाखवणारा, दूर राहणाऱ्या मुलाच्या बरोबर विडिओवर प्रत्यक्ष वार्तालाप करणारा मोबाईल जादूची छडी सारखा वाटतो.
       आता तर ओटीपीमुळे मोबाईल हिच तुमची ओळख झाला आहे तो हरवला तर ओळख हरवल्या सारखं आहे. त्यामुळे तो सर्व जीवापाड जपतात.
     मी चुकून मोबाईल विसरलो तर अस्वस्थ होतो, गाडी वळवून घरी येतो मोबाईलला घेण्यासाठी!! 
     तो खिशात नसला तर जगाशी संपर्क तुटल्याची भावना येते!! 
      याच मोबाईलच्या जादुई स्क्रीनवर त्याचे महात्म्य सांगणाऱ्या लिहिलेल्या या काही ओळी…
*मोबाईल महात्म्य!!*
सुंदर बँड वाजवण्याची
खुशीची देण्यास बिदागी..
खिशात आता नको पैसा
साथ मिळाली जी.पेची..
धुंदीत धुंद होऊन नाचतांना 
मोबाईलच ओवाळी वराला..
दिली त्वरित जीपेनें बिदागी
ख़ुशी चेहेऱ्यांवर झळकली..
होईल का नोटांचा अंत? 
राहील का प्लास्टिकचे कार्ड?..
मोबाईलच तुमची ओळख 
हरवला तर तुम्ही गोत्यात..
बदल खूपखूप तो मोठा 
पाहणारे आम्ही भाग्यवंत..
दूर हजारो मैल तो कोणी 
बोलतो त्याच्याशी प्रत्यक्ष..
अद्भुत शोध या शतकात 
मोबाईल दाखवे विश्वरूप..
जे वाटेल ते मिळे सर्व ज्ञान 
त्यावरी ते सहज उपलब्ध..
मोबाईल सर्वज्ञानी गुरु तो 
बँकही त्यालाच ओळखे..
ओटीपी मात्र गुप्त ठेवा
नाहीतर खाली होईल खाते..
मोबाईलच माझी वही रे
आणि तोच माझा पेन..
लिहिवतो..चुका सांगतो तो 
अडलो तर तोच  विश्वकोष!!
आप्त व्यापात आपुल्या
दूर दूर जरी या धरेवर..
सर्वांना एकत्र हा बांधे
सर्वांची ठेवतो तो खबर..
तोच आमुचा रे कॅमेरा 
अनमोल देई स्मृतिगंध ..
वर्तमान भूत भविष्याची 
खिडकी खरी तो एक..
मोबाईल साथीला नसता 
सर्वजण होतो का उदास?..
ऑक्सिजन तोही दुसरा 
त्यांचेविना जीव कासावीस..

लेखक

  • हेमंत नाईक

    COEP१९८४ चा विद्यार्थी, पेशाने स्थापत्य इंजिनीअर असल्याने घराची सुंदर रचना करताकरता वयाची साठी गाठल्यावर नकळत शब्दांचीही रचना करू लागलो.मित्राच्या प्रोत्साहनाने अशाच एका लिहिण्याची कलेची पर्यटनांची संस्कृती जोपासणाऱ्या मंचावर लिहिण्यास सुरुवात केली.. प्रथम वावर हा  असा सांकेतिक चिन्हातच होता. मग एखादा शब्द मग आख्खी ओळ पुढे चारोळी मग एखादी कविता पोस्ट करता करता लेखा पर्यंत पोहचलो.या दोन वर्षात निवांत वेळ मिळाल्याने बरंच काही लिहीलं गेलं…

    माझा लेखन प्रवास:

    १. “उरल्या त्या आठवणी…” ही अकरा लेखांची लेखमाला मित्रांच्या मंचावर लिहिली. त्यात आमच्या गल्लीतील बंद पडलेल्या गणेशोत्सवाबद्दल लिहीले होते. कधी काळी जितेंद्र अभिषेकी, अरुण दाते, श्रीधर फडके, आशा खाडिलकर, जयवंत कुलकर्णी, अजित कडकडे, द.मा. मिरसदार, प्रभाकर कारेकर व. पू काळे, अशा अनेक दिग्गज कलाकाराच्या उपस्थितीने त्यांच्या गायनाने, कथाकथनाने आणि मुख्य म्हणजे दिवसभराच्या सहवासाने मला झालेला आनंदानुभव लिहिला होता.

    २. "काहीही!"ही एकवीस ललीत लेखनाची लेखमाला.

    ३. “COEP चे सहजीवन” हा माझ्या अभियात्रिकी महाविदयालयीन आयुष्यच्या सोनेरी स्मृतिचा स्मृतिगंध… मित्रांना खूप आवडला.

    ४. मित्र मैत्रिणीवर तयाच्या वाढदिवशी केलेल्या, आणि इतर प्रासंगिक कविता आणि लेख.

    ५. न्यूझीलंड डायरी हे मित्रांच्या आग्रहाने मार्च २०२४ ते मे २०२५ दरम्यान मित्राच्या मंचावर लिहिलेले न्यूझीलंडचे प्रवासवर्णन सध्या मायबोलीवर पोस्ट करत आहे.

    ६. २०२६च्या नववर्ष दिनापासून मी एक “सुरपाखरू” होऊन त्यांच्या “३० दिवसात ३० प्रयोग २०२६” या थव्यामधे दाखल हौवून लिहिण्याचा आणि वाचनाचा आनंद लुटतो आहे

Post navigation

Previous: बोन्साय
Next: अतिक्रमण
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.