लेक टोपोचे हॉलिडे कॅम्पिंग.. ३
२९. ०१. २०२६
हेमंत नाईक
‘बंजी जंपिंग” हा एक साहसी खेळ आहे ज्यामध्ये उंच इमारतीवरून (पूल, क्रेन, कड्यावर) फ्री-फॉल उडी मारली जाते, जी घोट्याला किंवा हार्नेसला जोडलेल्या लांब, लवचिक दोरीने जोडलेली असते. दोरी ऊर्जा शोषण्यासाठी ताणली जाते, ज्यामुळे जंपर वर आणि खाली होतो.
आज बंजीजांपिंग बद्दल लिहितो आहे. नदीत उंचावरून पुलावरून उडी मारून जीव दिलेले किस्से आपण आपल्याकडे ऐकलेआहेत . हाच नदीत उडी घेण्याचा प्रकार, साहसी खेळाची न्यूझीलंड या देशाने सुरुवात केली आहे.
पुलावरतून अशीच उडी मारून नदीच्या पाण्याला स्पर्श करायचा साहसी खेळाची जगात सुरुवात न्यूझीलंड मध्ये कवीन्सटाऊन येथे प्रथम सुरु झाली..
टोपोला वैकाटो नदीवर हा साहसी खेळ अनुभवता येतो.
हॉलिडे कॅम्पला येतांना टोपो तळ्यातून उगम पावलेल्या वाईकाटो नदीवरचे सुमारे दोनशे फुट उंचीचे बंजीजंम्प स्पॉट पाहिला.पण ते करण्याची हिम्मत झाली नाही यात दोरीला दोन्ही पाय बांधून उंचावरून नदीच्या पात्रात तुम्ही उडी मारतात. खाली डोके बार पाय अशी स्थिती असते.नदीच्या पाण्याला स्पर्श होतो.मग तुम्हाला वर ओढले जाते.एका जॅम्प साठी ३०० NZD म्हणजे सुमारे १५००० रुपये आकारले जातात. या लोकेशनचा सिनिक फोटो सोबत जोडत आहे.
टोपो तळ्यातून उगम पावलेल्या वैकाटो नदीकाठी सुंदर वॉक वे आहे तों हिरव्या डोंगरावरून वळणदार पाऊल वाटेने पुढे खाली उतरून आल्यावर नदीच्या किनाऱ्यावर नदीची साथ घेत ती मंजुळ खळखळ ऐकत सुंदर निसर्गाच्या सानिध्यात पक्षांच्या किलबिलीत थंड हवेत आपण कितीही चाललो तरी जाणवत नाही. चालत चालत आम्ही पुढे टोपो तळयांतून उगम पावलेल्या वैकटो नदीवरचा हुका फॉल या धबधब्या पर्यत पोहचलो.
हुका ( फोम) हे माउरी नाव पाण्याचा पांढरा शुभ्र फेस होत असल्याने हे नाव आहे.) बघून आम्ही परत हॉलिडे कॅम्पिंगला परतलो. येथे अतिशय वेगवान अशा जेट बोट्स राईड्स तुम्ही अनुभवू शकतात.
हे दोन्ही स्पॉट.. इथले मस्ट स्पॉट आहेत.
“_चार दिवस कॅम्पिंग मध्ये बरोबर परत येतांना या सुंदर सुखद अविस्मरणीय स्मृती आमच्या ओंजळीत होत्या.. अप्रतिम निसर्ग चित्रे मनावर कोरली गेली असतांना आम्हाला स्पष्ट दिसत होती सौरभ श्रीनिवास आणि मंगेश मित्रांची घट्ट मैत्री.._”
*त्यांच्या मैत्रीला सलाम त्यांना सर्वांना सुयश चिंतून आजच लिहिणं थांबावतो..*
सोबत मैत्रीचे जीवनातील महत्व सांगणारी आमच्या COEP च्या गेट टुगेदरसाठी वाचलेली मी लिहिलेली कविता आठवली.
*मैत्री….*
_मैत्रीची मोठी गंम्मत असतें,_
_थॅन्क यु..सॉरी त्यात नसते._.
_नसतो कोणता कसला शिष्टाचार,`
_प्रेम दाखवे शिव्याचा भडीमार.._
_कितीही मोठा झाला तरी,_
_बालपणीचाच अंड्या असतो.._
_करी हाक कानी पडता ,_
_मागे उभा मित्र तो असतो.._
_मैत्रीत नाही स्पर्धा कुठली,_
_नाही कोणतेही हेवे दावे.._
_सुखदुःख, नी यशापयश,_
_एकमेकांचे असतें सारे.._
_मैत्रीत सर्व असे सारखे,_
_नाही कोणी राजा वा रंक.._
_उत्तम उदाहरणं आहे याचे,_
_सुदाम्याचे पाय धुतो कृष्ण.._
_गुपित जीवनामधले आपल्या,_
_फक्त मित्रा ठाऊक असे .._
_तो पण सांगे ते न कुणास,_
_जीवनाचाच जणू भाग असे .._
_मिळता धन, विद्या,मानमरातब,_
_लौकिकार्थी संपन्न तुम्ही.._
_मित्र नसता जेव्हा तुम्हा,_
_तुम्हापेक्षा गरीब नाही कुणी_ ..
_मित्र जेव्हा सोडून जातो,_
_काळजाचाच तुकडा पडतो._.
_आठवणीच उरतात तेव्हा,_
_मैत्रीची सदैव स्मरते गाथा.._
_मैत्रीच्या या अतूट नात्याची,_
_कशी लिहावी तिची थोरवी.._
_शब्द सामर्थ्य कमी पडतंसे,_
_थांबली हेमंताची लेखणी.._
… ✍️हेमंत नाईक
२९. ०१.२०२६
#सुरपाखरू#३०दिवसात ३०#प्रयोग२०२६