Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

स्व ची ओळख आणि स्वीकार

सई देशपांडे जुलै 2, 2026 1 minute read
0
Oplus_131072

Oplus_131072

जो पर्यंत आपल्याला स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाची व्यवस्थित जाण असून आपण स्वतःला जसे आहोत तसं स्वीकार केलेलं नसतं तो पर्यंत आपण इतरांच्या मर्जीनुसार जगत राहतो, लोक काय म्हणतील ह्याचा किंवा सगळे जे करताहेत तेच आपणही केलं पाहिजे ह्या फोमो (FOMO – Fear of missing out – समुहातून बाहेर फेकल्या जाण्याची भिती) मुळे आपल्यासाठी जे योग्य नाही ते देखील आपण करत राहतो. त्याचा पुढे जाऊन आपल्याला त्रासच जास्त होत असतो. हे रोखण्यासाठी स्वतःचं व्यक्तीमत्व कसं समजून घ्यायचं? 
ह्यात बरेच पहलू असतात. 
1.लहानपणापासून झालेले संस्कार, जडण घडण, आसपासचं वातावरण. 
बौद्धिक क्षमता आणि मिळवलेलं ज्ञान किंवा स्किल हे ह्या पहलू वर अवलंबून असतं. 
हे प्रत्येकाला त्याचं त्याचं माहीत असतं. ते जसं आहे तसं स्वीकार करावं आणि त्यात सकारात्मक बदल कसा घडवता येईल हा विचार करावा आणि त्या दिशेने प्रयत्न करावे. 
2. स्वभाव, सायकोलॉजी, मानसिक आरोग्य.
 
3.शारीरिक आरोग्य. 
ह्या सगळ्यांमुळे आपलं व्यक्तिमत्व घडत असतं पण ह्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य. हे दोन्ही एकमेकात बऱ्या पैकी गुंतलेले असतात. म्हणून शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी आपलं मन, स्वभाव आणि आपलं शरीर हे जाणून घेणं फार गरजेचं आहे. 
आपल्या संस्कृतीतल्या गुरूकुल पद्धति मधे गुरू, शिष्यांना ह्या सगळ्याचं प्राथमिक ज्ञान सगळ्यांनाच देत असत पण आता आपण एखाद्याच विषयात शिक्षण घेतो आणि इतर विषयांशी माझं काही घेणंदेणं नाही म्हणून मोकळे होतो, पण आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की जो पर्यंत आपल्याला आपलं शरीर, मन कसं आहे कळणार नाही तोपर्यंत आपण स्वतःचं व्यक्तिमत्व योग्य प्रकारे घडवू शकणार नाही आणि स्वतःसाठीचे योग्य निर्णय घेऊ शकणार नाही. 
थोडं ही काही दुखलं की लगेच डॉक्टर कडे जाणं योग्य नाही. थोडंही काही मनाविरुद्ध झालं की राग येणं किंवा डिप्रेशन मधे जाणं योग्य नाही. ह्या साठी मानवीय शारीरिक संरचना कशी असते हे, आणि मन कसं काम करतं, आपलं मानसिक आरोग्य कसं आहे हे प्रत्येकाने शिकून घेतलं पाहिजे. म्हणजे स्वतःसाठीचे योग्य निर्णय घेताना इतरांवर अवलंबून राहावं लागणार नाही. 
ह्या शिवाय आपल्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पाडणारा एक अजून महत्वाचा पहलू म्हणजे जन्माच्या वेळी आकाशातील ग्रह ताऱ्यांची खगोलीय स्थिती म्हणजेच जन्म पत्रिका. ह्यावर माझा ही फार विश्वास नव्हता पण गेल्या वर्षी पासून मी ज्योतिष शिकते आहे आणि ह्याचं प्राथमिक ज्ञान प्रत्येकाला असावं असं मनापासून वाटतंय. जन्मपत्रिका म्हणजे काय हे माझ्या उद्याच्या लेखात सांगणार आहे. 
अश्याप्रकारे स्व ची ओळख होऊन त्याचा स्वीकार केला तर आयुष्य खूप सुकर आणि समृद्ध होतं. 

लेखक

  • सई देशपांडे

Post navigation

Previous: सगळं ठिक आहे
Next: चला, मिशन रुल्स वापरूयात!

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.