Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

आनंद कि सुख ? भाग २

अभिषेक किन्हेकर जुलै 5, 2026
0
gumohor-water

मागच्या लेखात आनंद आणि सुख ह्यांच्या व्याख्या आणि अनुभव घेण्याचा प्रयत्न केला. कितपत  बरोबर ते सांगता नाही येणार पण अजून खोलात जाताना अनेक गोष्टी काळात गेल्या….

म्हणे आनंदाचे ठळक ३ प्रकार असतात. आत्मानंद, ब्रम्हानंद आणि परमानंद. 

आता आली पंचाईत ….. आताकुठे आनंदाच्या शोधात निघालो होतो…. हे ३ प्रकार दत्त म्हणून उभे राहिले. ठीक है….. येऊ दे अंगावर…..

आत्मानंद…. आत्म्याचा आनंद….. बोंबला…. आत्मा कुठे शोधायचा? कुठे असतो? कसा दिसतो?….. शोधाशोध सुरू….

इकडे तिकडे मुशाफिरी करताना प.पू. सुदर्शनजींचे भाषण ऐकलं होतं ….. त्यांनी एक उदाहरण दिलेलं होतं … 

समजा तुम्ही खूप शारीरिक बौद्धिक श्रम करून, थकून शांत झोपले आहात. शरीर अगदी निपचित आहे….. अजिबात हालचाल नाही. स्वप्न पण पडत नाहीये. मन शांत आहे. कुठलाच विचार मनाला शिवत नाहीये. छान लांबलचक झोप झाल्यावर आपण म्हणतो, “व्वा…. काय झोप झाली. मजा आली.” 

आता प्रश्न असा आहे की मजा तर आली, पण कुणाला? शरीराला? ते तर निपचित पडलं होत? मनाला? ते तर शांत होतं. बुद्धीला? ती पण निष्क्रिय होती. स्वप्न पण पडत नव्हती. मग मजा आली कुणाला?  शरीर, मन, बुद्धी  तिन्ही शांत, निष्क्रिय होते. मग मजा आली तरी कुणाला? 

ह्याचाच अर्थ हा की शरीर, मन, बुद्धीच्या शिवाय सुद्धा काहीतरी असा आहे ज्याला मजा आली. असं काहीतरी, जे सगळे ज्ञानेंनद्रिय, कर्मेंद्रिये निष्क्रिय असताना पण सक्रिय होतं.  सगळे निष्क्रिय असताना पूर्ण ताकदीनिशी नुसताच सक्रिय होतं नव्हे अनवरत आणि सफलतापूर्वक कार्यरत होतं … इतकं की त्याला मजा आली. 

मला वाटतं तेच तत्व आत्मतत्व असावं ….

त्याला झालेला आनंद हा आत्मानंद….

तो केव्हा मिळतो? फक्त झोपेत मिळतो का? मला वाटतं… झोपेनंतर तो झाला होता ह्याची अनुभूती होते. पण तो आनंद होताना अनुभवायचा असेल तर? जागृतावस्थेत शरीर निश्चल, मन शांत आणि बुद्धी स्थिर करावी लागेल नाही का? कसं करायच? 

सोप्पं उपाय…. ध्यान….

एकदम ध्यान जमेल का? कठीण आहे…. ध्यान हे स्टेप बाय स्टेप प्रोसेस चा सातव्या स्टेप वर आहे. पहिल्या सहा स्टेप्स आणि शेवटची आठवी स्टेप खालीलप्रमाणे आहे. 

१. यम 

२. नियम 

३. आसन 

४. प्राणायाम 

५. प्रत्याहार 

६. धारणा 

७. ध्यान 

८. समाधी 

 आजसाठी इतका डोस पुरे… बाकी पुढे बघू…..

लेखक

  • अभिषेक किन्हेकर

Post navigation

Previous: कदर जाने ना..
Next: अण्णा – भाग 3
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.