Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

नकळत मिळालेली ‘ती’ शाबासकीची थाप आणि नव्या संकल्पांची पहाट.

दिपाली लाभे जानेवारी 1, 2026 1 minute read
0
deepali-reflection

झाले गेले विसरूनी जावे, नवीन आशा नवीन स्वप्ने… घेऊनी चलू … नव्या सूर्यकिरणांसवे….

नवीन वर्षामधे पदार्पण करतांना, मागे वळून मागच्या वर्षात सहजच बघितल्या जाते. स्वतःच केलेल्या चुका चाचपडून बघितल्या जातात. नक्की आपलं काय चुकलंय..?बोलतांना, कृती करताना की.. नक्की कशामुळे. आपल्या अपेक्षा जास्त होत्या का..? की, कोणितरी आपल्याला गृहीत धरल्या मुळे तर आपणच आपल्या वर ह्या सगळ्यांचे ओझे आपणूनहून घेतले. 

होऊ शकते समोरच्याचे अपेक्षांचे ओझे आपण जास्तच घेतले… नकळत पणे.

पण ठीक आहे. असे होऊ शकते.. चुकतंच माणूस, मी तर म्हणते चुकायला हवेचं. त्याशिवाय का… आपण सुधारतो…?

आणि हो, अहो नुसत्याच चुका किंवा वाईटच घडतं असेही नाही.. स्वतःच स्वतःला आधीच्या वर्षातल्या चांगल्या वाईट गोष्टींसाठी पडताळून पहावे… मग आठवतं,अरे..! या सगळ्या वाईट गोष्टींपेक्षा लाख मोलाच्या गोष्टी आपण केल्या की…

लहानपणापासून एक इच्छा होती..भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार ज्यांनी केला, तसेच मराठी भाषेला अनेक नवीन शब्द ज्यांनी दिले आणि हिंदुत्वाचे तत्त्वज्ञान ज्यांनी मांडले, ज्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली फक्त आपल्या भारतमाते साठी.. त्यांना अभिवादन देण्यासाठी, एकदा तरी त्या अंदमाच्या तुरुंगाला भेट द्यावी… नतमस्तक व्हावं तीही पूर्ण झाली..

मनात वर्षानुवर्षे  विठूमाऊलीच्या भेटीची आस होती, तीही दिंडीच्या साथसंगतीने जायची..झालीच की ती पूर्ण. अर्थात बोलवणारा दुसरा तिसरा कोणी नाही तोच सावळा पांडुरंग होता की…

इतकंच काय देवीच्या समोर नवरात्रात भक्तीगीतांची मैफिल व्हाव्ही आणि त्यात निवेदन करावं.. एक छोटंसं स्वप्न तेही पूर्ण केलं स्वप्न..जगदंबेनं..

कित्येक दूर गेलेली नाती.. परत जवळ आली. कधीतरी सहज रस्त्यात कोणीतरी भेटतं.. आणि म्हणतं

” तुम्ही दिलेल रोपट आता छान वाढलंय.. छान फुलं येतायेत हो.. खूप खूप धन्यवाद.”

हाही आनंद काय कमी.. आपल्या सोबत चार जणांना आनंद नक्कीच देऊ शकतो आपण या छोटयाश्या रोपट्यातून. 

त्या तुम्हीच ना.. ग्रुप वर मधून मधून लेख टाकत असता… आवडतं हं.. छान असतं साधं सोपं.. मनाला सहज भावणारं.. अशाच लिहीत रहा हो… अशी छानशी       शाबासकीची थाप देणाराहि कधी कधी भेटतोच.. मग वाटतं जे मनात आहे ते उतरवावं… आपल्यासाठी आपल्या आनंदासाठी…

त्यात आमच्या “#सुरपाखरूची” सोबत आहेच… मग काय..! करूयात नवीन संकल्प.. लिहिण्याचा.. मनातले उतरवण्याचा…या #सुरपाखरू सोबत.

दिपाली प्रशांत लाभे.

लेखक

  • दिपाली लाभे
    दिपाली लाभे
Tags: सुरपाखरू ३०दिवसात३० प्रयोग२०२६

Post navigation

Previous: दिग्दर्शक ‘साब’ आणि आमचं तारांगण: मंतरलेल्या दिवसांची गोष्ट
Next: कॉर्पोरेट जग: २००६ ते २०२५ – एक प्रवास
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

gumohor-water
  • ललित

खिडकीतले आकाश

ऐश्वर्या डगांवकर मे 14, 2026 0
Screenshot_20260514_094809_Blogger.jpg
  • ललित

श्रावणबाळ!

हेमंत नाईक मे 14, 2026 0
Screenshot_20260504_161004_Blogger.jpg
  • ललित

हास्य!!

हेमंत नाईक मे 4, 2026 0

ताजे लेख

  • खिडकीतले आकाश
  • श्रावणबाळ!
  • हास्य!!
  • मुकी होत चाललेली घरे
  • २३ एप्रिल…

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

gumohor-water
  • ललित

खिडकीतले आकाश

ऐश्वर्या डगांवकर मे 14, 2026 0
Screenshot_20260514_094809_Blogger.jpg
  • ललित

श्रावणबाळ!

हेमंत नाईक मे 14, 2026 0
Screenshot_20260504_161004_Blogger.jpg
  • ललित

हास्य!!

हेमंत नाईक मे 4, 2026 0
gumohor-water
  • ललित

मुकी होत चाललेली घरे

ऐश्वर्या डगांवकर एप्रिल 30, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.