नागपूरचा इतिहास २६ जुलै २०२६
नागपूरकर भोसले सांस्कृतीक वारसा
१ तान्हा पोळा
तान्हा पोळयाचे साजरीकरण हि विदर्भाची खासियत!महाराज रघुजीराजे.२यांनी तान्हा पोळयाचे उत्सवास सुरवात केली.महाराज रघुजींरांजे यांना बालगोपांळाप्रती विशेष लगाव होता.आपल्या लहान्ग्या प्रजाजनांकरता त्यांनी खास तान्हया पोळयाचे उत्सवाचा इ.स.१७८४चे सुमारासप्रारंभ केला.बैल पोळयाचे दुसरे दिवशी बाशिंग व हारतुरयांनी सजविलेल्या लाकडी नंदी बैलांचा राजवाडयाचें प्रागंणात पोळा भरविण्यात आला.प्रथम राज उपाध्यायांनी बाळंराजे पुरंसोजींराजांचे भल्यामोठया नंदीचे पुजन केले.नंतर प्रांगणात जमलेल्या सर्वहि नंदींचे पुजन करून बोजारा देण्यात आला.खिरापत वाटल्या मिरवणूक निघाली नतंर पोळा फुटला मग बैल पोळयाप्रमाणे घरोंघरी जावून खिरापत व बोजारा मिळविण्यात बालगोपांळानां भारीच गंमत वाटली!आज हि तान्हया पोळयाचा उत्सव विदर्भात थाटात साजरा केला जातो. वंशागत चालत आलेल्या लाकडी नंदी बैलांची रंग-रंगोटी करून नातु वा पंतु तान्हया पोळयात उत्सहाने सहभागी होत असतात.वंशागत लाकडी नंदी वाटयाला न आल्यास प्रथम पोळयास आजी आजोबांनी नातवंडाना लाकडी नंदी भेट देण्याची प्रथा प्रचलित आहे. विदर्भाच्या शाळा ,बालमंदिर, संस्कारवर्ग, सहनिवास