Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

पुस्तकाचे सौंदर्य

मोहन जोशी जुलै 19, 2026
0
gumohor-water

मी माझे शालेय शिक्षण आटोपून , जेव्हा अकरावी प्रवेशासाठी , धरमपेठ विज्ञान महाविद्यालयात आलो , तेव्हा कॉलेजच्या अगदी पहिल्याच दिवशी , माझी शिरीष गोपाळ देशपांडे ह्या मराठीच्या प्राध्यापकाशी गाठ पडली. मला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने त्यादिवसापासून नेहमीकरता आकर्षित केले असावे , असे वाटते . दहावीपर्यंत शाळेमधील शिक्षकांना फक्त शिक्षक म्हणतात, आणि अकरावीत त्याच शिक्षकांना महाविद्यालयात , प्राध्यापक का म्हणतात, हे देशपांडे सरांकडे पाहिले की , आपोआप लक्षात यायचे . देशपांडे सरांचा बांधा खूप उंच होता, शिवाय , शरीर सुदृढ , त्यात ते छान रंगीत कपडे घालायचे , बेल बॉटम असलेली त्यांची पँट , शर्ट खोचकेला असता , कंबरेच्या बेल्टचे बकल अगदी छातीपर्यंत असायचे, त्यांचे चालणे, बोलणे आणि एकंदरीत वागणे, खूप आकर्षक असे , मी तर पहिल्याच दिवशी त्यांच्या प्रेमात पडलो होतो. 

अगदी पहिल्याच दिवशी , आमचा पहिलाच वर्ग मराठीचा होता . देशपांडे सर वर्गात आले , तेव्हा त्यांच्या हातात अकरावीचे मराठीचे नवीन कोरे पाठ्यपुस्तक होते. आणि त्यांनी आमचा पहिला वर्ग घेणे सुरु केले. नवीन पुस्तक हातात घेऊन , ते कसे वाचायचे असते, ह्याचे ते प्रात्यक्षिक सुद्धा करून दाखवीत होते . 

नवीन पुस्तक हे एखाद्या अपरिचित सुंदर ललनेसारखे असते, 

हे ऐकताच वर्गात हास्याचे फवारे . 

नुसते हसू नका, पण तुम्ही तशी कल्पना करा, 

आणि मग तुम्ही त्या पुस्तकाशी कसे वागाल , ते सांगा !

सर सांगत होते आणि आम्ही मनाने दाद देत होतो.

नवीन पुस्तकाला आपले एक सौंदर्य असते, त्याला हातात धरून हळुवारपणे हाताने स्पर्श करता , तुम्ही ते मिळवू शकता, पण , पुस्तकाला आधश्यासारखे लगेच उघडून वाचू नका .

पुस्तक हळुवारपणे हातात धरून , आधी डोळ्यांनी समोरील आणि मागील बाजूला न्याहाळून घ्या, मधली जाडी ची बाजू , त्यावर हळुवार बोट फिरवून घ्या.

पुस्तक जेव्हा नवीन असते तेव्हा त्याला एक आगळा सुगंध असतो, पुढे तो नंतर तुम्हाला मिळणार नाही, पुस्तक नाकासमोर धरून, लांब श्वास घेऊन , तो मिळवा . 

नंतर, हे पुस्तक कोणी लिहिले, कोणी छापले, केव्हा तयार झाले, त्याचे वय किती,त्याची किंमत किती ? सर्व माहिती घ्या . 

नंतर समोरचे कव्हरचे पान पलटवून त्यामागे असलेली, त्याच्या लेखकाविषयीची माहिती घ्या, लेखकाचे मनोगत वाचा, त्या पुस्तकाला प्रस्तावना दिलेली असेल , ती वाचा , त्यानंतर अनुक्रमणिका आहे, ती सविस्तर वाचा. 

मग मागचे म्हणजेच शेवटचे पान उघडा, त्याआधी असलेली संदर्भ सुची वाचा , काही चित्रे असतील तर ती पहा. 

इतकी सर्व प्रक्रिया झाल्यानंतर , आता तुम्हाला पुस्तक ओळख झाली आहे , असे तुम्ही समजू शकता, नंतर तुम्ही त्या पुस्तकाचे पहिले पासून शेवटपर्यंत वाचन करू शकता !

एव्हाना वर्ग संपल्याची घंटी वाजली होती, पण पुस्तकाचेच नव्हे तर , जीवनातील प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचे सौंदर्य , आपण कसे अनुभवले पाहिजे, हे ह्या वर्गानंतर आमच्या नेहमीकरता स्मरणात राहिले .

१९ जुलै २०२६ ला मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे ह्यांचा जीवन गौरव सोहळा सरोजिनी अकैडमी तर्फे आयोजित केला आहे , त्यानिमित्ताने 

लेखक

  • मोहन जोशी

Post navigation

Previous: ||नोकरी की व्यवसाय || भाग तीन अभिनंदनाचा वर्षाव🙏
Next: आषाढ पाऊस अंधार ढवळे
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.