महिना: एफ वाय

कधी कधी वास्तव हे परिकल्पनेपेक्षा सुंदर असते आणि कधी कधी परिकल्पनाही वास्तवापेक्षा सुंदर असते या दोन्हींच्या मध्ये...
१९६०च्या दशकात अमेरिकेच्या नासाने चंद्रावर उतरण्यासाठी अपोलो मोहिम आखली. त्यात प्रचंड प्रमाणात तांत्रिक माहिती आणि विविध प्रक्रिया...
जो पर्यंत आपल्याला स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाची व्यवस्थित जाण असून आपण स्वतःला जसे आहोत तसं स्वीकार केलेलं नसतं तो...
लक्ष्मणराव गुरुजी मोठ्या आनंदाने दिवाळीचा फराळ करत होते. तेवढ्यात स्वयंपाकघरातून त्यांच्या पत्नी सुमनबाईंचा आवाज आला. जरा धीर...
ईश्वराकडे गेलेल्या आप्ताना, जन्मदात्यांना, पूर्वजांना स्मरण करून त्याच्या बद्दल कृतज्ञता,  आदर व्यक्त करण्यासाठीचा  पंधरवाडा म्हणजे पितृपक्ष. हे...
लहानपणी ओळख झालेला आणि आता सहसा दुर्मिळ झालेला हा प्रकार …. अतिशय बुद्धी चातुर्य, भाषालालित्य अन शब्दप्रभुत्वाचं अमोघ दर्शन घडवून आणणारा….   सहसा एखाद्या राजाच्या दरबारात एक ओळ दिली जाई. उदाहरणार्थ ….. “सिन्दूरबिन्दु विधवा ललाटे” म्हणजे विधवेच्या कपाळी कुंकवाचा टिळा. त्या काळी अत्यंत आश्यर्य चकित करणारी अशी एखादी घटना असे किंवा अगदी निरर्थक चरण दिला जाई, उदा. “ठंठं ठठंठं ठठठं ठठंठ:”  आणि शीघ्र कवींना आव्हान दिले जाई.   आणि  उपस्थित कवींना आव्हान असे की ह्याला धरून कमीत कमी चार चरणांचा एक बंध लिहावा. ह्यात दिलेली ओळ यावी पण कुठेही अर्थाचा अनर्थ नसावा. सर्व श्लीलाश्लीलतेचे, सामाजिक नीतिनियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे. तयार बन्ध हा आनंदायी व चमत्कृतीपूर्ण असावा. शक्यतोवर सहजस्फूर्त परंतू  निरर्थक नसावा.   आता उदाहरणादाखल सांगायचं झाला तर “सिन्दूरबिन्दु विधवा ललाटे”…. ह्यासाठी कवी लिहितात.   किं भूषणं सुन्दर सुन्दरीणाम । किं दूषणं पान्थ जनस्य नित्यम ॥ कस्मिन विधात्रा लिखितम जनानाम । सिन्दूरबिन्दु विधवा ललाटे ॥   अर्थ : सुंदर स्त्रियांचे भूषण काय असते? वाटसरूंना तक्रार, अडथळा काय? विधाता लोकांचे भविष्य कोठे लिहितो? कुंकवाचा टिळा विधवेच्या कपाळी. ...