*अनिश्चितता सांगणारा कॅसिनो!!* ✍️हेमंत नाईक अनिश्चितता म्हणजे काय? हे समजावणाऱ्या येथील स्काय टॉवरच्या स्कायसिटीतील कॅसीनो बद्दल लिहीताना,पसायदानातील,...
हेमंत नाईक
COEP१९८४ चा विद्यार्थी, पेशाने स्थापत्य इंजिनीअर असल्याने घराची सुंदर रचना करताकरता वयाची साठी गाठल्यावर नकळत शब्दांचीही रचना करू लागलो.मित्राच्या प्रोत्साहनाने अशाच एका लिहिण्याची कलेची पर्यटनांची संस्कृती जोपासणाऱ्या मंचावर लिहिण्यास सुरुवात केली.. प्रथम वावर हा असा सांकेतिक चिन्हातच होता. मग एखादा शब्द मग आख्खी ओळ पुढे चारोळी मग एखादी कविता पोस्ट करता करता लेखा पर्यंत पोहचलो.या दोन वर्षात निवांत वेळ मिळाल्याने बरंच काही लिहीलं गेलं…
माझा लेखन प्रवास:
१. “उरल्या त्या आठवणी…” ही अकरा लेखांची लेखमाला मित्रांच्या मंचावर लिहिली. त्यात आमच्या गल्लीतील बंद पडलेल्या गणेशोत्सवाबद्दल लिहीले होते. कधी काळी जितेंद्र अभिषेकी, अरुण दाते, श्रीधर फडके, आशा खाडिलकर, जयवंत कुलकर्णी, अजित कडकडे, द.मा. मिरसदार, प्रभाकर कारेकर व. पू काळे, अशा अनेक दिग्गज कलाकाराच्या उपस्थितीने त्यांच्या गायनाने, कथाकथनाने आणि मुख्य म्हणजे दिवसभराच्या सहवासाने मला झालेला आनंदानुभव लिहिला होता.
२. "काहीही!"ही एकवीस ललीत लेखनाची लेखमाला.
३. “COEP चे सहजीवन” हा माझ्या अभियात्रिकी महाविदयालयीन आयुष्यच्या सोनेरी स्मृतिचा स्मृतिगंध… मित्रांना खूप आवडला.
४. मित्र मैत्रिणीवर तयाच्या वाढदिवशी केलेल्या, आणि इतर प्रासंगिक कविता आणि लेख.
५. न्यूझीलंड डायरी हे मित्रांच्या आग्रहाने मार्च २०२४ ते मे २०२५ दरम्यान मित्राच्या मंचावर लिहिलेले न्यूझीलंडचे प्रवासवर्णन सध्या मायबोलीवर पोस्ट करत आहे.
६. २०२६च्या नववर्ष दिनापासून मी एक “सुरपाखरू” होऊन त्यांच्या “३० दिवसात ३० प्रयोग २०२६” या थव्यामधे दाखल हौवून लिहिण्याचा आणि वाचनाचा आनंद लुटतो आहे
संत तुकाराम आपल्या एका अभंगात लिहितात,”असाध्य तें साध्य करितां सायास । कारण अभ्यास तुका म्हणे ll “...
*वर्तुळ* ✍️ हेमंत नाईक लहानपणी शाळेत कंपासने जेव्हा कोऱ्या कागदावर पहिलं वर्तुळ काढलं तेव्हा त्याची दोन टोक...
ll लग्नगाठ ll ✍️ हेमंत नाईक २३. ०२. २०२६ पुलंच व्यक्ती आणि वल्ली बऱ्याच वेळा वाचल असलं...
“आमचा व्हॅलेंटाईन डे !! ✍️हेमंत नाईक १६.०२.२०२६ सोमवार. हल्ली नविन पिढीत लव्ह मॅरेज सर्रास होतात पण आमच्या...
लेखन सोहळ्याची “सांगता!!” .. हेमंत नाईक ३०. ०१. २०२५ संगीत क्षेत्रात ‘राग भैरवी’ हा सकाळचा अत्यंत लोकप्रिय,...
लेक टोपोचे हॉलिडे कॅम्पिंग.. ३ २९. ०१. २०२६ हेमंत नाईक ‘बंजी जंपिंग” हा एक साहसी खेळ आहे...
*लेक टोपोचे हॉलिडे कॅम्पिंग..२* २८. ०१. २०२६ हेमंत नाईक दोन दिवस कॅम्प साईटवर धमाल केल्यावर आज मात्र...
. *लेक टोपो* *हॉलिडे रिसॉर्ट कॅम्पिंग.. १!!* .. २७. ०१. २०२५ हेमंत नाईक लहानपणी स्काऊटचे कॅपिंग केले...
*ll२६, जानेवारी….* *अर्थात प्रजासत्ताक दिन ll* 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 ✍️हेमंत नाईक २६. ०१. २६ *जनैः जनहितार्थाय जनानाम् एव निर्मितम्।*...