व्यक्तता म्हणजे आपले विचार, भावना किंवा मत स्पष्टपणे मांडण्याची क्षमता किंवा प्रक्रिया होय. भाषेच्या किंवा कलांच्या माध्यमातून...
हेमंत नाईक
COEP१९८४ चा विद्यार्थी, पेशाने स्थापत्य इंजिनीअर असल्याने घराची सुंदर रचना करताकरता वयाची साठी गाठल्यावर नकळत शब्दांचीही रचना करू लागलो.मित्राच्या प्रोत्साहनाने अशाच एका लिहिण्याची कलेची पर्यटनांची संस्कृती जोपासणाऱ्या मंचावर लिहिण्यास सुरुवात केली.. प्रथम वावर हा असा सांकेतिक चिन्हातच होता. मग एखादा शब्द मग आख्खी ओळ पुढे चारोळी मग एखादी कविता पोस्ट करता करता लेखा पर्यंत पोहचलो.या दोन वर्षात निवांत वेळ मिळाल्याने बरंच काही लिहीलं गेलं…
माझा लेखन प्रवास:
१. “उरल्या त्या आठवणी…” ही अकरा लेखांची लेखमाला मित्रांच्या मंचावर लिहिली. त्यात आमच्या गल्लीतील बंद पडलेल्या गणेशोत्सवाबद्दल लिहीले होते. कधी काळी जितेंद्र अभिषेकी, अरुण दाते, श्रीधर फडके, आशा खाडिलकर, जयवंत कुलकर्णी, अजित कडकडे, द.मा. मिरसदार, प्रभाकर कारेकर व. पू काळे, अशा अनेक दिग्गज कलाकाराच्या उपस्थितीने त्यांच्या गायनाने, कथाकथनाने आणि मुख्य म्हणजे दिवसभराच्या सहवासाने मला झालेला आनंदानुभव लिहिला होता.
२. "काहीही!"ही एकवीस ललीत लेखनाची लेखमाला.
३. “COEP चे सहजीवन” हा माझ्या अभियात्रिकी महाविदयालयीन आयुष्यच्या सोनेरी स्मृतिचा स्मृतिगंध… मित्रांना खूप आवडला.
४. मित्र मैत्रिणीवर तयाच्या वाढदिवशी केलेल्या, आणि इतर प्रासंगिक कविता आणि लेख.
५. न्यूझीलंड डायरी हे मित्रांच्या आग्रहाने मार्च २०२४ ते मे २०२५ दरम्यान मित्राच्या मंचावर लिहिलेले न्यूझीलंडचे प्रवासवर्णन सध्या मायबोलीवर पोस्ट करत आहे.
६. २०२६च्या नववर्ष दिनापासून मी एक “सुरपाखरू” होऊन त्यांच्या “३० दिवसात ३० प्रयोग २०२६” या थव्यामधे दाखल हौवून लिहिण्याचा आणि वाचनाचा आनंद लुटतो आहे
*जो जे वांछील तो ते लिहो..* मराठीत लिहून व्यक्त होणासाठी मार्गदर्शक ठरणारा कालचा नागपूर येथे आयोजिलेला कार्यक्रम...
*केल्याने पर्यटन!!!* ✍️हेमंत नाईक *’सृष्टीमध्ये बहु लोक।* *परिभ्रमणे कळे कौतुक* *चुकोनी उदंड आढळते।’* देशाटनाने सृष्टीची रहस्ये कळतात....
श्रावणबाळ! जिच्या हाती पाळण्याची दोरी जगाची ती उद्धारकर्ती.. सानुल्याना घेऊनी पाठी रक्षणकर्ती ती झाशीची राणी.. विश्व तिचे ...
हास्य! ०५. ०४. २६ *औषधेष्वपि सर्वेषुहास्यं* *श्रेष्ठं वदन्ति ह।* *स्वाधीनं सुलभं चापि आरोग्यानन्दवर्धनम्॥* भावार्थ :- सर्व औषधांमध्ये...
*२३ एप्रिल…* (२३ तारखेला पुस्तकं दिन साजरा झाला.. त्या निमित्त हा लेख लिहिला.) माझी आई ९२ वर्षाची...
*तुम्ही जे समजतात..* *तो मी नव्हे !!* ✍️हेमंत नाईक दोन जेव्हा दिसें सारखे साम्य त्यांस म्हणता रे...
*स्वरस्वामिनी आशा!!* .. ✍️ हेमंत नाईक काल संगीत शिखरावर असलेला एक तेजस्वी तारा निखळला… सर्वांच्या आवडत्या आशाजींचे...
*”विसरणं एक दैवी वरदान!!!”* ✍️हेमंत नाईक आज काहीतरी वेगळं, पण सर्वांच्या जीवनाशी निगडित कधी गुण तर कधी...
सोमवार, ३०. ०३. २६ नुकताच रामनवमीचा राम जन्मोत्सव आपण सर्वांनी जोरदार साजरा केला असेल . अयोध्येतही राममंदिरात...