स्वप्न या विषयावर खूप लिहिता येईल अगदी एक पुस्तक देखील होऊ शकेल.जागेपणाची स्वप्न...
हेमंत नाईक
COEP१९८४ चा विद्यार्थी, पेशाने स्थापत्य इंजिनीअर असल्याने घराची सुंदर रचना करताकरता वयाची साठी गाठल्यावर नकळत शब्दांचीही रचना करू लागलो.मित्राच्या प्रोत्साहनाने अशाच एका लिहिण्याची कलेची पर्यटनांची संस्कृती जोपासणाऱ्या मंचावर लिहिण्यास सुरुवात केली.. प्रथम वावर हा असा सांकेतिक चिन्हातच होता. मग एखादा शब्द मग आख्खी ओळ पुढे चारोळी मग एखादी कविता पोस्ट करता करता लेखा पर्यंत पोहचलो.या दोन वर्षात निवांत वेळ मिळाल्याने बरंच काही लिहीलं गेलं…
माझा लेखन प्रवास:
१. “उरल्या त्या आठवणी…” ही अकरा लेखांची लेखमाला मित्रांच्या मंचावर लिहिली. त्यात आमच्या गल्लीतील बंद पडलेल्या गणेशोत्सवाबद्दल लिहीले होते. कधी काळी जितेंद्र अभिषेकी, अरुण दाते, श्रीधर फडके, आशा खाडिलकर, जयवंत कुलकर्णी, अजित कडकडे, द.मा. मिरसदार, प्रभाकर कारेकर व. पू काळे, अशा अनेक दिग्गज कलाकाराच्या उपस्थितीने त्यांच्या गायनाने, कथाकथनाने आणि मुख्य म्हणजे दिवसभराच्या सहवासाने मला झालेला आनंदानुभव लिहिला होता.
२. "काहीही!"ही एकवीस ललीत लेखनाची लेखमाला.
३. “COEP चे सहजीवन” हा माझ्या अभियात्रिकी महाविदयालयीन आयुष्यच्या सोनेरी स्मृतिचा स्मृतिगंध… मित्रांना खूप आवडला.
४. मित्र मैत्रिणीवर तयाच्या वाढदिवशी केलेल्या, आणि इतर प्रासंगिक कविता आणि लेख.
५. न्यूझीलंड डायरी हे मित्रांच्या आग्रहाने मार्च २०२४ ते मे २०२५ दरम्यान मित्राच्या मंचावर लिहिलेले न्यूझीलंडचे प्रवासवर्णन सध्या मायबोलीवर पोस्ट करत आहे.
६. २०२६च्या नववर्ष दिनापासून मी एक “सुरपाखरू” होऊन त्यांच्या “३० दिवसात ३० प्रयोग २०२६” या थव्यामधे दाखल हौवून लिहिण्याचा आणि वाचनाचा आनंद लुटतो आहे
“सुरपाखरू” या समुदायाच्या डीपी वर असलेल्या सुंदर फुलपाखरावरून.. मला फुलपाखरू कविता...
*”ड्रॉईंग इज द लँग्वेज ऑफ इंजिनिअर्स”* असे आम्हाला इंजिनीरिंग ड्रॉईंगचे महत्व सांगताना इंजिनीअरिंग असताना...
“आई सारखे परमदैवत जगतावर नाही म्हणून श्रीकाराचे नंतर शिकणे आ आई..” हे गाणं माझ्या आईने टीव्हीवर यूट्यूबवर...
कालच “मनपाखरू” हा सुंदर लेख वाचण्यात आला.. आणि मग मलाही मनावर लिहिण्याचा मोह...
महिन्यापूर्वी ” हास्य ” विषय घेऊन लिहीत असताना मनात विचार आला सर्व गुणाचे दिवस...
” जशा नाण्याला दोन बाजू असतात तशा प्रत्येक गोष्टीला किमान दोन दृष्टीकोन असतात. सुख दुःख, फायदा तोटा,...
व्हाट्सअपवर काल एक इंग्लिश कथा वाचण्यात आली, एव्हरेस्ट वर चढाई करणाऱ्या या चार मित्रांबरोबर अजून बरेच गिर्यारोहक...
जय गंगे भागिरथी ! हर-गंगे भागिरथी ! चिदानंद-शिव-सुंदरतेची पावनतेची तू मूर्ती म्हणुनि घेउनी तुला शिरावर गाइ महेश्वर...
ईश्वराकडे गेलेल्या आप्ताना, जन्मदात्यांना, पूर्वजांना स्मरण करून त्याच्या बद्दल कृतज्ञता, आदर व्यक्त करण्यासाठीचा पंधरवाडा म्हणजे पितृपक्ष. हे...