काल “ती ” वर लिहिताना डोळ्यसमोर गृहिणी आली. आज “तो ” म्हणल...
हेमंत नाईक
COEP१९८४ चा विद्यार्थी, पेशाने स्थापत्य इंजिनीअर असल्याने घराची सुंदर रचना करताकरता वयाची साठी गाठल्यावर नकळत शब्दांचीही रचना करू लागलो.मित्राच्या प्रोत्साहनाने अशाच एका लिहिण्याची कलेची पर्यटनांची संस्कृती जोपासणाऱ्या मंचावर लिहिण्यास सुरुवात केली.. प्रथम वावर हा असा सांकेतिक चिन्हातच होता. मग एखादा शब्द मग आख्खी ओळ पुढे चारोळी मग एखादी कविता पोस्ट करता करता लेखा पर्यंत पोहचलो.या दोन वर्षात निवांत वेळ मिळाल्याने बरंच काही लिहीलं गेलं…
माझा लेखन प्रवास:
१. “उरल्या त्या आठवणी…” ही अकरा लेखांची लेखमाला मित्रांच्या मंचावर लिहिली. त्यात आमच्या गल्लीतील बंद पडलेल्या गणेशोत्सवाबद्दल लिहीले होते. कधी काळी जितेंद्र अभिषेकी, अरुण दाते, श्रीधर फडके, आशा खाडिलकर, जयवंत कुलकर्णी, अजित कडकडे, द.मा. मिरसदार, प्रभाकर कारेकर व. पू काळे, अशा अनेक दिग्गज कलाकाराच्या उपस्थितीने त्यांच्या गायनाने, कथाकथनाने आणि मुख्य म्हणजे दिवसभराच्या सहवासाने मला झालेला आनंदानुभव लिहिला होता.
२. "काहीही!"ही एकवीस ललीत लेखनाची लेखमाला.
३. “COEP चे सहजीवन” हा माझ्या अभियात्रिकी महाविदयालयीन आयुष्यच्या सोनेरी स्मृतिचा स्मृतिगंध… मित्रांना खूप आवडला.
४. मित्र मैत्रिणीवर तयाच्या वाढदिवशी केलेल्या, आणि इतर प्रासंगिक कविता आणि लेख.
५. न्यूझीलंड डायरी हे मित्रांच्या आग्रहाने मार्च २०२४ ते मे २०२५ दरम्यान मित्राच्या मंचावर लिहिलेले न्यूझीलंडचे प्रवासवर्णन सध्या मायबोलीवर पोस्ट करत आहे.
६. २०२६च्या नववर्ष दिनापासून मी एक “सुरपाखरू” होऊन त्यांच्या “३० दिवसात ३० प्रयोग २०२६” या थव्यामधे दाखल हौवून लिहिण्याचा आणि वाचनाचा आनंद लुटतो आहे
“ती” मराठी व्याकरणातील स्त्रीलिंगी शब्द उच्चारला की डोळयांपुढे गृहिणी उभी राहते. आपली वेगवेगळी नाते जपून...
प्रत्यक्ष घटनेवर लिहिण्यासाठी मराठीच्या पेपरात “वृत्तांत” लिहीण्याचा एक प्रश्न असायचा त्याचा अनुभव आज तो कामी...
“एखादी घटना घडून जाते ती कशी घडली याबद्दलचा सविस्तर आखो देखा हाल म्हणजे वृतांत.” ...
शिक्षा..हा शब्द शिक्षण या अर्थाचा असला तरी एखादी चूक झाली तर ती सुधारण्यासाठी पुन्हा ती...
‘महाकवी” हा शब्द फक्त आणि फक्त सोळाशे वर्षपूर्वीच्या आपल्या संस्कृत काव्य लेखनाने अजरामर झालेल्या कालिदासासाठी...
वर सोबत जोडलेले एक सुंदर रांगोळी चित्र आज बघण्यात आले पण एवढे सुंदर चित्र असूनही...
मोहमयी जीवन असताना आज त्याच्या विरुद्धार्थी *”निर्मोह”* हा शब्द घेऊन लिहितो आहे. एखाद्या वस्तूबद्दल वाटणारे...
पुढचा क्षण आपला आहे की नाही यांची खात्री कोणीच देऊ शकत नाही. सकाळी नाश्ता करताना चमच्यातला...
लेखाचे हे शीर्षक वाचून तुम्हाला कोडं पडलं असेल, टेलिग्राफ विभागाशी संबंध असलेल्यांना...